' ऐकावं ते नवलच! “देशविरोधी वापर” होऊ नये म्हणून पुतीनची विष्ठा भरली जाते खास बॅगेत! – InMarathi

ऐकावं ते नवलच! “देशविरोधी वापर” होऊ नये म्हणून पुतीनची विष्ठा भरली जाते खास बॅगेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारण आणि त्याच्याशी संबंधीत सगळ्याच गोष्टी कधीकधी अतिरंजीत असतात. जेवढा नेता मोठा, त्यांचे पद, त्याचा प्रभाव मोठा, तेवढ्या त्याच्याशी संबंधीत गोष्टी, किस्से, घटना आणि त्यासाठी पाळली जाणारी गोपनियता मोठी असते.

आपल्या सर्वसामान्य लोकांचे आयुष्य म्हणजे खुले पुस्तक! रोजच्या जगण्यातल्या बारीक सारीक गोष्टी देखील आपण शेअर करतो. पण या राजकीय नेत्यांचं तसं नसतं बरं का! जेवढा नेता मोठा तेवढी त्याची घेतली जाणारी सुरक्षा कडक, अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अशा मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेचे आणि त्यांच्याविषयीच्या गोपनियतेचे नियम जरा अधिकच कडक असतात.

 

modi security im

 

याचे मोठे उदाहरण म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ‘ ब्लादिमीर पुतीन हे आहेत. आता तुम्ही म्हणाल पुतीन तर आंतरराष्ट्रीय राजकारणातले मोठे नेते आहेत, त्यांना ऑलरेडी एक्सट्रिम लेव्हलची सुरक्षा पुरवली जाते.

पण मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की त्यांचे सुरक्षेचे मानक इतके कडा आहेत की पुतीन प्रवासात असताना त्यांचे मलमूत्र एका विशिष्ट बॅगेत भरून रशियाला पाठवली जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

ही गोष्ट म्हणजे गोपनीयतेचा कळस आहे पण तुम्हाला त्यामागचं कारण माहिती आहे का? ते माहिती झाले तर तुम्हाला त्यामागचे गांभीर्य नक्कीच लक्षात येईल. काय आहेत या विशिष्ट कृतीमागची कारणे?

सतत बदलत्या राजकारणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय असणार्‍या नेत्यांच्या आरोग्य, ताण-तणाव तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न सतत निर्माण होतो आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नुकतीच झालेली हत्या या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधते आणि म्हणूनच पुतीन यांची घेतली जाणारी सुरक्षा महत्वाची आहे.

पुतिन यांच्या प्रकृतीबाबत त्यांची सुरक्षा एजन्सी अत्यंत सतर्क आहे. त्यामुळे दररोज त्यांच्या स्टूलची तपासणी करून त्याच्या तब्येतीत कुठली गडबड तर नाही ना याची खातरजमा केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत चाचणीचा अहवाल कोणालाही मिळू नये, याचीही काळजी घेतली जाते.

 

 

putin ukraine war IM

 

सध्या विज्ञान इतकं प्रगत झालं आहं की लोकांबद्दलची बरीच माहिती त्यांच्या डीएनए (DNA) मधून काढता येऊ शकते. म्हणूनच जगातील बडे नेते आपला डीएनए नमुना शत्रू देशांच्या हाती न लागण्याची काळजी घेत असतात.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काही महिन्यांपूर्वी पुतीन यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनाही आपला डीएनएचा नमुना रशियाकडे जाईल याची भीती वाटत होती. म्हणूनच त्यांनी त्यांची कोविड चाचणी करून घेतली नाही.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीनही (Vladimir Putin) आपल्या डीएनए नमुन्यांबाबत अत्यंत सावध आहेत. पुतीन आपल्या डीएनए सोबतच आपली इतर कोणतीही गोष्ट शत्रू देशांना देऊ इच्छित नाहीत, ज्याद्वारे त्यांच्या आरोग्याची माहिती मिळू शकेल.

याच कारणामुळे पुतीन यांच्या परदेश दौऱ्यावेळी त्यांचे अंगरक्षक पुतिन यांचे मल-मूत्रही गोळा करतात. या गोष्टी एका बॉक्समध्ये बंद करून मॉस्कोला परत आणल्या जातात.

पत्रकार रेगिस जँते यांच्या फ्रेंच वृत्तपत्राने पुतीन यांच्या या कृतीबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, पुतिन यांचे मलमूत्र गोळा करण्यासाठी फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसचे खास एजंट आहेत.  प्रत्येक वेळी पुतिन यांचे मलमूत्र गोळा करून एका खास पिशवीत ठेवणे आणि सुटकेसमधून ते रशियाला पाठवणे हे त्यांचे काम आहे.

यासोबतच या अंगरक्षकांच्या जबाबदारीत पुतिन यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शरीराची काळजी घेणे देखील समाविष्ट आहे.

 

rassian im

 

पत्रकाराचा असा दावा आहे की त्याला या गोष्टींची माहिती २०१९ मध्ये मिळाली. पुतीन त्यावेळी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. यानंतर पत्रकाराने या प्रकरणी चौकशी केली असता, २०१७ मध्ये फ्रान्स दौऱ्यावर असतानाही त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत बाथरूममध्ये जात असल्याचे आढळून आले होते.

दरम्यान याआधी पुतीन यांच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल अनेक दावे केले गेले आहेत. पुतीन यांना कॅन्सर आणि पार्किन्सन्सचा आजार आहे जो आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचेही सांगण्यात आलं होतं.

अलिकडील फोटोंमध्ये पुतिन यांचा चेहरा लाल झालेला दिसतो, तर टीकाकार म्हणतात की आजाराचा होणारा त्रास लपवण्यासाठी सार्वजनिक ते डेस्कच्या काठाचा आधार घेतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्या संभाव्य आजारांची माहिती लपवण्यासाठी ही विचित्र प्रथा चालवली जाते.

या कथेचा पुरावा देणारा एक व्हिडिओ नंतर ऑनलाइन समोर आला होता. व्हिडिओमध्ये, दोन गार्ड वॉशरूमच्या दारातून बाहेर येताना दिसतात, त्यानंतर दुसरा गार्ड स्पेशल सूटकेस घेऊन जातो. त्यानंतर पुतीन येतात, त्याना आणखी दोन रक्षक कव्हर करतात.

 

putin im

 

रशियन दूतावासातील लोकांना या प्रथेबद्दल अत्यंत गुप्तता राखण्यासाठी FSO ने कठोरपणे निर्देश दिले होते. पुतिन यांनी कुठेही ‘ट्रेस’ ठेवू नयेत आणि सर्वकाही या मातृभूमीत परत नेले जाईल याची खात्री करण्यासाठी हे केले जाते.

रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) च्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की ७० वर्षीय राष्ट्राध्यक्षांना “त्वरीत वाढणारा कर्करोगाचा गंभीर आजार आहे.” अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की पुतिन त्यांची दृष्टी गमावत असून जिवंत राहण्यासाठी दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ नाही.”

डॉक्ट्रीन अँड स्ट्रॅटेजी कन्सल्टिंगच्या अध्यक्षा आणि डीआयएच्या माजी गुप्तचर अधिकारी रेबेका कॉफ्लर यांनी फॉक्स न्यूज डिजिटलला सांगितले की, “पुतिन यांना त्यांच्या आरोग्याविषयी कोणतीही माहिती परदेशी गुप्तचर सेवांच्या हाती लागण्याची भीती आहे. सत्ता बदलाशी संबंधित कोणतीही अराजकता रोखण्यासाठी ते अनिश्चित काळासाठी रशियावर राज्य करतील अशी प्रतिमा त्यांना तयार करायची आहे.”

कॉफ्लर पुढे म्हणाल्या की पुतिन यांना भीती वाटते की कोणीही रशियन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीच्या कमकुवतपणाचा पुरावा म्हणून मलमूत्र वापरू शकेल.

 

Vladimir-Putin-russia-inmarathi

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूप इंटरसेप्शनचा वापर बुद्धिमत्ता तंत्र म्हणून केला जात असल्याची किमान दोन उदाहरणे आहेत. २०१६ मध्ये, एका माजी सोव्हिएत एजंटने सांगितलं की जोसेफ स्टॅलिनने चीनचे अध्यक्ष माओ आणि इतर उच्च अधिकार्‍यांच्या मलमूत्राचे विश्लेषण करून हेरगिरी करण्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा त्याला सापडला आहे.

युक्रेनवरील आक्रमणानंतर पुतीन यांची लोकप्रियता गगनाला भिडली आहे, हे लक्षात घेता, दीर्घ आजारामुळे, पुतिन हे किमान २०१४ पर्यंत आणि कमाल २०३६ पर्यंत रशियाचे अध्यक्ष असतील.” असा अंदाज वर्तवला जात आहे. असे होणार असेल तर पुतीन यांची अशा निकषांवर आधारित सुरक्षा करणे क्रमप्राप्तच आहे नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?