' पंडित नेहरूंवर भर संसदेत माफी मागण्याची वेळ आली होती....

पंडित नेहरूंवर भर संसदेत माफी मागण्याची वेळ आली होती….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय इतिहासातील एक मोठं आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. चाचा नेहरू या नावाने ओळखलं जाणारं आणि लहान मुलांवर नितांत प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान सुद्धा होते.

भारताच्या या पहिल्या पंतप्रधानांनी एकदा भर संसदेत चक्क श्यामाप्रसाद मुखर्जी यांची माफी मागितली होती.

नेहरू यांच्या मंत्रिमंडळात, उद्योग मंत्री म्हणून काम पाहणाऱ्या बॅरिस्टर आणि एक उत्तम राजकारणी असणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांची नेहरूंना माफी का मागावी लागली होती, हा मात्र एक रंजक किस्सा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चला आज जाणून घेऊया याच घटनेबद्दल आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी…

लहान वयातच कुलगुरूपद भूषवण्याची संधी…

श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक अभ्यासू आणि हुशार राजकारणी होते. ६ जुलै १९०१ रोजी श्यामाप्रसाद यांचा कलकत्त्यात जन्म झाला. त्यांच्या वडिलांची एक बुद्धीजीवी आणि विद्वान म्हणून खाती होती. त्यामुळेच शिक्षणाची आवड त्यांना लहानपणापासूनच निर्माण झाली होती.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षीच त्यांनी सिनेटमध्ये प्रवेश केला. एवढंच नाही तर १९२७ साली त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण करत बॅरिस्टरची पदवी मिळवली.

शिक्षणाची आवड असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी वयाच्या केवळ ३३ व्या वर्षीच कुलगुरुपदी विराजमान झाले. ४ वर्षं कलकत्ता विश्वविद्यालयाचं कुलगुरूपद भूषवल्यानंतर त्यांनी राजकारणाची वाट स्वीकारली.

मंत्रिमंडळात होते मात्र…

 

shyamaprasad mukharjee im

 

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद यांना संधी मिळाली. मात्र काही काळातच त्यांनी या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

इंग्रजांनी वापरलेली फोड आणि राज्य करा हीच नीती नेहरू सुद्धा वापरत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळेच या मंत्रिमंडळात काम करू शकणारा नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

जनसंघाची स्थापना

नेहरू आणि मुखर्जी यांच्यातील संबंध पुढे खूपच बिघडले. ते केवळ राजीनामा देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी १९५१ साली आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली.

जनसंघाची स्थापना केल्यानंतर आरएसएसचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याशी सुद्धा सल्लामसलत केली होती. पुढे जनसंघ जनता पार्टीमध्ये विलीन करण्यात आला आणि जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर आजचा भाजप अस्तित्वात आला.

विनापरवानगी काश्मीरमध्ये प्रवेश केला म्हणून…

 

shyamaprasad mukharjee im1

 

आज कलम ३७० हटलेलं असल्याने, जम्मूकाश्मीरकडे पूर्वी असणारा विशेष राज्याचा दर्जा रद्द झालेला असला, तरी तो काळ मात्र फार वेगळा होता. केवळ काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा भारतीयांनाच परवानगी घेण्याची गरज भासत असे. अशी परवानगी घ्यायला लागू नये, असं शयामप्रसाद मुखर्जी यांचं मत होतं.

८ मे १९५३ रोजी दिल्लीहून थेट काश्मीर गाठत त्यांनी क्रांतिकारी पाऊल उचललं. “जम्मूकाश्मीरमध्ये विनापरवाना प्रवेश करता येणं हा भारतीयांचा मूलभूत अधिकार असायला हवा.” असं प्रतिपादन त्यांनी १० मे रोजी केलं होतं. त्यामुळे ११ मे रोजी त्यांना श्रीनगरला जात असताना अटक करण्यात आली. या अटकेमुळे त्यांना काही काळ तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता.

…आणि नेहरूंनी मागितली त्यांची माफी

श्यामाप्रसाद आणि त्यांचे सहकारी अशा दोन मंत्र्यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. त्यानंतर जनसंघाची स्थापना झाली. दिल्लीतील नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि जनसंघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

संसदेत बोलत असताना, काँग्रेस वाईन आणि पैसे यांचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी करत असल्यचा आरोप मुखर्जी यांनी केला. साहजिकच नेहरूंनी यावर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी या आरोपाचा अथय प्रमाणात विरोध केला.

खरंतर नेहरू यांची ऐकण्यात चूक झाली होती. वाईन आणि मनी हे शब्द वाईन आणि वूमन असे ऐकल्यामुळे नेहरू अधिक नाराज झाले होते.

इतके खालच्या थराचे आरोप काँग्रेसवर करण्यात आले असल्यामुळे, नेहरू यांनी या वाक्याचा फारच तीव्रपणे निषेध केला होता. त्यानंतर मात्र आपण चुकीचं ऐकलं असल्याचं नेहरूंच्या लक्षात आलं.

आपली चूक लक्षात येताच, नेहरूंनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांची माफी मागायचं ठरवलं. संसदेतच हा सारा प्रसंग घडला असल्यामुळे, तिथेच सगळ्यांसमक्ष माफी मागण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सदनात उभं राहून नेहरू यांनी मुखर्जी यांची माफी मागितली. मोठ्या मनानं नेहरूंना माफ करणाऱ्या श्यामाप्रसाद यांनी “माफी मागण्याची आवश्यकता नाही, मात्र मी चुकीचं काही बोनार नाही एवढंच म्हणतो.” अशी प्रतिक्रिया यावर दिली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?