' माती, पेट्रोलचा गंध आवडतो? त्यामागे असणारं मानसशास्त्रीय कारण जाणून घ्या! – InMarathi

माती, पेट्रोलचा गंध आवडतो? त्यामागे असणारं मानसशास्त्रीय कारण जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुगंध आणि मानवी मन याचं खूप जवळचं नातं आहे. प्रत्येक सुगंधाशी काही न काही आठवण निगडीत असते. बघा..

थोडीशी टेस्ट घ्या. विशिष्ट वासाची उदबत्ती जर तुमच्या लहानपणी मंदिरात किंवा तुमच्या घरातील देवघरात लावली असेल आणि कधीतरी बाहेर गेल्यानंतर त्याच उदबत्तीचा वास आला तर तुमचं मन देवघरात पोहोचतं.

उन्हाळ्यात मोगरा फुलतो. अनेकजण मोगऱ्याची फुले पाण्यात टाकतात. तसा वास आला की आठवतं का ते पाणी? कधी दक्षिणेकडील मंदिरात गेल्यावर तिथे तीर्थ देतात ते कापूर, तुळशीची पाने याचा वास असलेलं असतं तसा वास जरी आला तरी मन लगेच त्या मंदिरात जाऊन येतं.

तुम्ही देव वगैरे मानत नसाल तर एक विशिष्ट हवा पडली की त्यावेळी घडलेली घटना लगेच समोर उभी राहते.. किंवा मनाने तुम्ही त्या दिवसात जाऊन पोचता. असं झालं आहे का कधी?

 

flower im

 

बहुतेक सगळ्यांचे हेच अनुभव आहेत. कडक उन्हाळ्यात अचानक वळीवाचा पाऊस पडून घेला की मातीचा जो सुगंध येतो त्याची बरोबरी आजवर जगातील कुठलेही अत्तर करू शकलेले नाही. तो वास बहुतेक सगळ्यांनाच आवडतो. पण काही लोक असे असतात त्यांना विचित्र वास आवडतात. जसे झंडू बाम, अमृतांजन, आयोडेक्स, पेट्रोल, ऑईल पेंट.

काही जण पुस्तकं आणली की त्याची पाने नाकाशी धरून वास अगदी उरात भरून घेतात, इतका तो वास त्यांना आवडतो. कुणाला मेंदीचा वास खूप आवडतो. लिंबू कापलं की त्याचा वास पण किती वेगळा वाटतो.

 

books smell im

 

आता हे झालं सामान्य निरीक्षण. पण काही लोकांना आयोडेक्स, नेलपेंट, थिनर अशा विचित्र वासांची पण आवड असते. ती इतक्या टोकाची असते की तो वास घेतल्याशिवाय त्यांना झोप सुद्धा येत नाही.

काय कारण आहे की आपल्याला वेगवेगळे सुगंध आवडतात ? यावर संशोधन केलं गेलं. त्या संशोधकांच्या मते कोणताही गंध हा चांगला किंवा वाईट नसतो. जेव्हा आपण एखादा गंध घेतो त्यावेळी जो अनुभव मनाला येतो त्यावरून आपण ती धारणा बनवतो.

तसं नसतं तर एखाद्या अगरबत्तीचा वास एका माणसाला आवडतो आणि तोच दुसऱ्याला आवडत नाही असं का झालं असतं? जोवर त्या वासाशी आपल्या मनाचं कनेक्शन जुळत नाही तोवर त्या वासाबद्दल आपलं मत अनुकूल होत नाही.

खूप वेळा असंही म्हटलं जातं की, आपल्याला आवडणारे गंध हे आपल्या लहानपणाशी संबंधीत असतात. पण संशोधनाने ते ही सिद्ध झालं की त्याचा काहीही संबंध नसतो.

कित्येक प्रकारचे सुगंध आपल्याला आवडतात त्याचं कारण म्हणजे त्या गंधाने मनात सकारात्मकता येते. त्या सर्व सुगंधाना सकारात्मक सुगंध असं म्हटलं जातं. मग ते गंध कशाचेही असू शकतात. पुस्तकाचे, चामड्याचे, नव्या पुस्तकाचे देखील!

मासे खाणाऱ्यांना माशांचा गंध आवडतो, तर त्याचवेळी शाकाहारी लोक त्याकडे पाहून नाक मुरडतात. अनेकदा मांसाहारी लोकांनाही हा वास आवडत नसल्याची अजब बाब समोर येते.

 

fish im

 

आता तुम्ही त्या गंधाकडे कशा दृष्टीने पाहता हा भागही तितकाच महत्वाचा. काही लोकांना विचित्र सुगंध आवडतात. पेट्रोल, झंडू बाम,

अगदी रक्ताचा वास आवडणारे लोक पण असतात. त्याचं कारण ते विकृत असतात असं नव्हे. तर तुम्हाला आवडणारे गंध हे तुमच्या आसपासची परिस्थिती, तुमचे व्यक्तिमत्व यावरही अवलंबून असतात.

आता काही जणांना फटके उडाले की उठणारा धूर त्याचा वास आवडतो, कुणाला गवत कापल्यावर येणारा वास चांगला वाटतो.

कधीतरी लक्ष देऊन बघा, अनुभवा प्रत्येक ऋतू बदलताना त्या हवेलाही एक विशिष्ट गंध असतो. पावसाळा संपून हिवाळा सुरु होताना, हिवाळा संपून उन्हाळा सुरु होताना कवी लोक त्याला धरती कूस बदलते वगैरे उपमा देतात पण तो गंध पण आवडतो असं सांगणारे लोक आहेत.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी वळीवाची सर तर मृदगंधाने आसमंत भरून टाकते. आला पावसाळा ही हाकच तो गंध देतो.

 

rain im

 

कुणाला कोणता गंध आवडेल ते सांगता येत नाही. पण याचा अर्थ ती व्यक्ती काही विकृत आहे, विचित्र आहे असं होत नाही.

खूपदा वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात तसंच सुगंधाचं असतं. फार चिकित्सा न करता ज्याला जो आवडेल तो सुगंध मन भरून घेऊ द्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?