' या गोष्टी केल्यात, तर प्रेशर कुकरच्या झाकणातून कधीच पाणी बाहेर येणार नाही! – InMarathi

या गोष्टी केल्यात, तर प्रेशर कुकरच्या झाकणातून कधीच पाणी बाहेर येणार नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेशर कुकर आणि स्त्री चं खास जिव्हाळ्याचं असं नातं असतं. या कुकरच्याच भरोवश्यावर स्त्री किंवा इतर कुणी स्वयंपाक बनविणारी मंडळी निर्धास्त असतात. अगदी झटपट अर्धा तासात सहजपणे स्वयंपाक बनवू शकतात.

त्यामुळेच अशा या भरोवश्याच्या साथीदाराची वेळोवेळी तितकीच काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं ठरतं. अन्यथा, कुकरमधून पाणी बाहेर झिरपणं, शिट्टी न होणं अशा अनेक तक्रारी उदभवू लागतात. वेळीच या कुकरकडे लक्ष दिले, तर या समस्या निर्माण होण्यापासून वाचवू शकतो.

यासाठी काही टिप्स देत आहोत, त्यांचा जरूर अवलंब करून बघावा –

बऱ्याचदा कुकरचं काम झालं, की तो धुतला जात नाही. फक्त पाण्याने विसळून घेतला जातो,परंतु असं न करता कुकर नेहमी स्वछ घासून घ्यावा.

आठवड्यातून किमान तीनदा तरी कुकरची शिट्टी नीट उघडून साफ करून धुवावी. यामुळे शिट्टीत घाण अडकून रहात नाही व ती वेळेवर वाजते.

 

pressure cooker im

 

कुकरचे झाकण लावण्यापूर्वी त्याची रिंग पाण्याखाली ओली करून लावावी. यामुळे प्रेशर लवकर येण्यास मदत होते. ही रिंग नियमितपणे तपासून घ्यावी. सैल झाली असल्यास लगेच बदलून घ्यावी. ती फार घट्ट ही असू नये व जास्त सैल ही असू नये. कारण या दोन्ही गोष्टींमुळे झाकण वर अति प्रेशर येऊन ते उडण्याची शक्यता अधिक असते.

कुकरमधील पाण्याची पातळी हा देखील अत्यंत महत्वाचा भाग असतो. प्रत्येक कुकरचे आकारमान आणि उंची वेगळी असते. त्यामुळे त्या त्या कुकरनुसार पाण्याच्या पातळीत फरक पडतो.

काही कुकरमध्ये कमी पाणी लागते तर काहींमध्ये पाण्याची पातळी थोडी जास्त लागते. तुमच्या कुकरमध्ये नेमके किती पाणी असावे हे जाणून घेऊन त्यानुसार पाण्याचा वापर करावा.

कुकरचे झाकण नियमितपणे तपासावे. त्याला कुठे तडा गेला नाही ना आणि त्याचा व्हाल्व देखील योग्य स्थितीत आहे ना हे जरूर पहावे. कित्येकदा व्हाल्व उडाल्याचे लक्षात येत नाही.

कुकरची शिट्टी होण्यास बराच वेळ घेणे किंवा तो नुसता फुसफुसत रहाणे ही लक्षणे दिसल्यास व्हाल्व उडाला आहे असं समजावं.

 

cooker im

 

कधी कधी कुकरचे हॅण्डल सैल झाल्यास त्यामधून देखील पाणी बाहेर येऊ लागते. अशावेळी हॅण्डलचे स्क्रू नीट टाईट करून घ्यावे.

कित्येकदा कुकर धुताना किंवा काहीश्या बेफिकीरीने तो हाताळला जातो. यामुळे देखील स्क्रू सैल होतात. तेव्हा घरात एक छोटासा स्क्रू ड्रायव्हर ठेवावा. जेणेकरून सैल झालेले स्क्रू टाईट करता येतात.आणि दरवेळी रिपेअरवाल्याकडे जाण्याची गरज भासणार नाही.

कित्येकदा असं होतं, की डाळ शिजायला ठेवल्यास कुकरमधून पाणी बाहेर येते आणि मग झाकण खराब होते. यासाठी प्रथम डाळ धुतल्यानंतर ती कमीतकमी १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा.

घेतलेल्या डाळीच्या दीडपट त्यात पाणी घाला. मग कुकरला शिट्टी न लावता पूर्ण प्रेशर येण्याची वाट बघा. पूर्ण प्रेशर आल्यानंतरच शिट्टी लावा. एक ते दोन शिट्टीमध्ये डाळ व्यवस्थित शिजलेली दिसेल आणि पाणीही बाहेर झिरपणार नाही.

कुकरची रिंग अचानकपणे सैल झाल्यास त्यावर बिर्याणीसाठी दम देताना जशी कणिक लावतो. तशी कणिक रिंगेला लावावी. यामुळे कुकर नीट होतो. अर्थात ही अडचणीच्या वेळी उपयोगी ठरणारी टीप आहे, पण वेळेत रिंग बदल्यास कुकर ही सुरक्षित राहिल आणि कणिक देखील वाचेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?