' लग्नाआधी पत्रिका बघता तितक्याच गांभीर्याने “या” मेडिकल टेस्टचे रिझल्ट्स बघायला हवेत! – InMarathi

लग्नाआधी पत्रिका बघता तितक्याच गांभीर्याने “या” मेडिकल टेस्टचे रिझल्ट्स बघायला हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न मग ते ठरवून केलेले असो वा प्रेम विवाह. सर्वसामान्यपणे त्यात मुला-मुलींचे शिक्षण,नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि या जोडीने पत्रिका कितपत जुळतेय याच गोष्टी पारखून घेण्याकडे अधिक कल असतो.

काळ बदलला तरी लग्न ठरविण्याच्या निष्कर्षात फारसा फरक पडलेला नाही. अगदी नाही म्हटलं तरी पूर्वी जी खोलवर पत्रिका बघितली जात असत. आता ती वरवर किंवा नावापुरती पहिली जाते पण भावी वधू-वर पुढील संसार करण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहेत का याचा मात्र अजूनही विचार होताना दिसत नाही.

अशा प्रकारची चाचणी करणे म्हणजे काहीना मानहानीचे लक्षण वाटते तर काहीना ते हास्यास्पद वाटतं, पण डोळे उघडे ठेवून या चाचण्यांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की, यामुळे दोन्ही पक्षांची फसवणूक होणार नाही.

 

marraige inmarathi

 

कित्येकदा वंशपरंपरागत चालत आलेले आजार न सांगण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. शिवाय त्यातील स्त्री ही गर्भ धारणेसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत की नाही हे देखील या चाचण्यांमधून समजू शकते. एकदा का तुमची शारीरिक क्षमता लक्षात आली की, पुढील निर्णय घेणे सोपे जाते. तेव्हा कोणकोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया –

१) रक्त गट चाचणी – बऱ्याचदा भावी वधू-वरांचे रक्त गट एकमेकांना अनुकूल असतातच असे नाही. कित्येकदा एकेमकांचे रक्त गट माहित नसल्यामुळे गर्भधारणेच्या सुमारास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी कधी तर यामुळे स्त्री किंवा भावी बाळाच्या जीवावर बेतू शकतं. हे होऊ नये म्हणून ही चाचणी करावी. यात रक्त गट आणि रक्ताचा प्रकार शोधून कोणते गट एकमेकांना पूरक आहेत हे समजते.

२) प्रजनन चाचणी – यात दोघेही शारीरिकदृष्ट्या प्रजननासाठी सक्षम आहेत की नाही हे पहाता येते. याचा फायदा असा होतो की, बाळ होण्यास काही अडचण असेल तर त्या दृष्टीने उपचार पद्धती ठरविता येते.

३) अनुवांशिक आजार चाचणी –  या चाचणीमुळे दोघांना वंशपरंपरेमुळे होणारे काही आजार आहेत का,हे समजते. कधी कधी मधुमेह, ह्रदयविकार अशा आजारांची परंपरा असते. वेळीच आजार समजल्यास भावी काळात आपली जीवनशैली कशी ठेवावी याचा अंदाज येतो. शिवाय या आजारांमुळे येणाऱ्या बाळावर काय काय परिणाम होऊ शकतात ,हे समजते.

४) पेल्विक अल्ट्रा साउड चाचणी –  यात गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्युब अशा आतील अवयवांची स्थिती लक्षात येते. यात काही दोष आढळल्यास वेळीच उपचार करता येतात.

 

p test im

 

५) थॅलेसेमिया चाचणी –  थॅलेसेमिया मुळे भावी बाळामध्ये जन्मजात काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते . यामुळे लग्नापूर्वी ही चाचणी केल्यास बाळाच्या दृष्टीने योग्य ठरते.

६) एच आय व्ही आणि एस टी डी चाचणी –  संसर्गजन्य असे हे लैंगिक आजार आहे. जर दोघांपैकी कुणाला एकाला जरी या आजाराची लागण झाली असेल ,तर ती दुसऱ्याला देखील होऊ शकेल. कित्येकदा लग्न होणार नाही म्हणून यासारखे आजार लपविले जातात. किंवा माहित असूनही फसवणूक केली जाते.

ही फसवणूक एखाद्याच्या जीवावर ही बेतू शकते. अथवा एका जोडीदाराच्या चुकीमुळे दुसऱ्या जोडीदाराला विनाकारण नरक यातनांचा सामना करावा लागतो.
म्हणून लग्नाआगोदर ही चाचणी करण्यावर आवर्जुन भर द्यावा.

 

hiv test inmarathi

७) जीनो टाइप चाचणी – ही चाचणी केल्याने भावी बाळामध्ये जेनेटिकली काय दोष निर्माण होऊ शकतात याचा अंदाज येतो .

८) मानसिक आरोग्य चाचणी – मानसिक आजार म्हणजे वेडाच ही संकल्पना आजही आपल्याकडे घट्ट रुजली आहे. त्यामुळेच मानसिक आजारासंदर्भात कोणतीही चाचणी करायची म्हटल्यास, लोकांना त्याचा प्रचंड ताण येतो. परंतु संसार सुखाचा करायचा असल्यास दोघे ही मानसिकदृष्ट्या सक्षम असणे तितकेच गरजेचे आहे. किंबहुना या चाचणीमुळे भावी संसारात कुठे कुठे तडजोड करावी लागेल याचा अंदाज येतो. लग्नाआधी दोघांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.

९) सी बी सी चाचणी – ही रक्ताची चाचणी असून यात रक्ताव्दारे अशक्तपणा ,कर्करोग ,रक्तस्त्राव यांसारखे विविध विकार शोधता येतात.

१०) रक्तदाब चाचणी – बऱ्याचदा व्यक्तींना आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे हेच माहित नसते. हाय किंवा लो रक्तदाबामुळे गर्भधारणेच्या सुमारास जीवावर बेतण्या इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळेच लग्नाआगोदर दोघांना कोणत्या स्वरूपाचा रक्तदाब आहे हे जाणून घ्यावे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?