' चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर टाकून देत असाल तर तुम्ही फार मोठं नुकसान करताय – InMarathi

चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर टाकून देत असाल तर तुम्ही फार मोठं नुकसान करताय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चहा आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळच!. इतके आपण चहा प्रिय असतो. अशावेळी चाय पे चर्चा पासून चहाच्या कपातली वादळे आपण अनुभवली असतील. अगदी घरी कोणी सहज भेटायला आले तरी किमान चहा घेतल्याशिवाय आपण त्यांना सोडतच नाही हो ना?

यामध्ये बरेचदा चहा बनवून झाल्यानंतर गाळण्यात उरलेली चहा पावडर साधारपणे फेकून दिली जाते. अतिपरिचयात अवज्ञा असेच आपण चहाच्या बाबतीत वागतो. तुम्हीही जर असं करत असाल तर थांबा!

 

tea im

 

चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. कारण याचे फायदे अनेक आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

एकदा चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. ती चहा पावडर सुकवून तुम्ही पुन्हा वापरु शकता. याचा स्वादही तितकाच चांगला लागेल. मात्र हे ध्यानात ठेवा की चहाची पावडर उन्हात सुकवूनच पुन्हा वापरा. तर इतरवेळी निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणार्‍या चहा पावडरीचे उपयोग जर तुम्हाला समजले तर तुम्ही ती कधीच फेकून न देता तिचा पुन्हा उपयोग कराल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

चला तर मग आपल्या आवडत्या चहाच्या पावडरचे असेही काही उपयोग आहेत.

१. छोले बनवताय? मग तुम्ही चहाच्या पावडरीचा वापर छोले अधिक टेस्टी बनवण्यासाठी करु शकता.

 

chhole im

 

यासाठी थोडीशी चहा पावडर पाण्यात टाकून उकळा. थोडेसे पाणी काबुली चण्यामध्ये टाका. यामुळे चण्यांचा रंग आणि चव दोन्ही छान होईल.

२. चहामध्ये अँटी-ऑक्सिंडट हे गुण असतात. एखादी जखम झाल्यास अथवा खरचटल्यास त्यावर चहापावडरीचा लेप लावला तर रक्तस्त्राव बंद होतो.

त्यामुळे जखम झाल्यास चहापावडरीने जखम साफ करा, याने जखमा लवकर भरतात.

३. प्रत्येकाकडे लाकडी फर्निचर असतेच. लाकडाचे फर्निचर दिसायला जितके छान दिसते तितकीच त्याची काळजी घ्यावी लागते. उरलेल्या चहा पावडरचा उपयोग तुम्ही फर्निचर स्वच्छ करण्यासाठी करु शकता.

 

furniture im

 

चहा पावडरमधील अतिरिक्त पावडर काढून ती लाकडाच्या फर्निचरवर चोळा. लाकडावर साचलेली घाण, धूळ निघून जाईल आणि तुमचे फर्निचर चमकेल. तसेच उरलेल्या चहा पावडरीमध्ये थोडीशी विम पावडर मिसळून क्रोकरी साफ केल्यास त्यांना चमक येते.

४. चहाची पावडर तुमचे केस छान चमकवू शकते. तुम्ही चहा केल्यानंतर त्यात दूध घालू नका. ज्यावेळी तुमचा चहा संपेल त्यावेळी त्यात पाणी घालून पुन्हा एकदा चहा उकळून घ्या.

तयार चहाचे पाणी थंड करुन तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर केसांच्या मुळाला लावा. हे पाणी लावल्यानंतर थोडासा मसाज करुन तुम्ही तुमच्या शॅम्पूने केस धुवू शकता.

 

hair wash inmarathi1

 

तुम्हाला तुमचे केस चमकदार दिसतील.

५. चहा पावडरचा उरलेला चोथा घेऊन तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली ठेवा. किमान दहा मिनिटांसाठी तरी तुम्ही हा प्रयोग करुन पाहा. एकतर तुम्हाला थंडावा तर वाटेल. पण कालांतराने तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळे देखील कमी होतील.

आठवड्यातून किमान ३ दिवस तरी हा प्रयोग आवर्जून करुन पाहा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

या शिवाय तुमच्या त्वचेची जळजळ होत असेल तर ती देखील चहा पावडरमुळे कमी होईल.

 

tea powder im

 

सोबत जर तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर चहाची पावडर कोमट पाण्यात टाकून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखी बरी होईल.

६. फ्रिजमध्ये कधीकधी आपण इतक्या वस्तू भरुन ठेवतो की, आपल्यालाच त्याचा उग्र वास येऊ लागतो. फ्रिज उघडल्यानंतर भपकारा यावा असे साहजिकच कोणाला वाटणार नाही.

 

fridge im

 

तुमच्या फ्रिजमध्ये भाज्या, अंडी, मांस, मासे असे सगळे काही भरलेले असेल तर मग तुम्ही चहाच्या पावडरचा उपयोग करा. उरलेली चहापावडर टिश्यू पेपरमध्ये किंवा मलमलच्या कपड्यात बांधून ती फ्रिजमध्ये ठेवा.

तुम्ही टी बॅग वापरत असाल तर मग तुम्ही त्या टी बॅगच थेट फ्रिजमध्ये ठेवून द्या. फ्रिजमधील वेगवेगळे वास चहा पावडर शोषून घेईल.

७. आता तुम्हाला यातील काहीही करायचे नसेल तर तुम्ही उरलेल्या चहा पावडरचा उपयोग खत म्हणून करु शकता. तुम्हाला यासाठी विशेष अशी मेहनत घ्यावी लागत नाही.

चहाच्या पावडरचे खत तयार करण्यासाठी तुम्ही चहाची पावडर वाळवून तुमच्या झाडांमध्ये खत म्हणून तशीच वापरू शकता.

हल्ली अनेक ठिकाणी मातीच्या जड कुंड्या ठेवण्यास परवानगी देत नाही. अशावेळी तुम्ही काही झाडं ही अशा चहापावडरमध्ये लावू शकता. साधारण कुंडीभर चहापावडर जमा करण्यााठी तुम्हाला किमान १५ दिवस तरी लागतीलच. उरलेली चहा पावडर गाळल्यानंतर फेकून न देता ती झाडांना घाला. यामुळे झाडांचे आरोग्य सुधारते.

 

tea 1 im

 

तेव्हा मित्रांनो टाकाऊ चहा पावडरचे हे उपयोग बघून पुढच्या वेळी चहा केल्यानंतर तुम्ही नक्कीच उरलेल्या चहा पावडरचा उपयोग कराल आणि आपण कसे इको-फ्रेंडली आहोत हे दाखवून द्याल, हो ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?