' स्वतःचा 'Coolness' सिद्ध करायला हिंदी कलाकारांनी उघड केलेली बेडरूम सिक्रेट्स किळसवाणी आहेत!

स्वतःचा ‘Coolness’ सिद्ध करायला हिंदी कलाकारांनी उघड केलेली बेडरूम सिक्रेट्स किळसवाणी आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – सिद्धी आमडेकर

===

बॉलीवुड, नेपोटीजम आणि कंगना हे कायमच न्यूजवर चर्चेचे विषय असतात. त्यात अजून फोडणी द्यायला ‘Koffee with Karan’ नावाचा शो आहेच. या शोचा ६वा सीझन ३ वर्षांपूर्वी आला होता आणि माझ्यासारख्या सगळ्यांना वाटलं की चला संपलं एकदाचं हे प्रकरण! पण करण जोहरच्या सेलेब्स विषयी अजून चांभार चौकश्या करायच्या राहिल्याच आहेत.

 

koffee with karan 3 IM

 

गुरुवारी म्हणजेच ६ जुलैला या शोचा ७वा सीझन आला आणि पहिल्याच एपिसोड मध्ये खूप खळबळजनक रहस्य उलगडली. आलिया भट आणि रणवीर सिंह हे पहिले गेस्ट होते. त्यांनी आपापल्या संसाराची कहाणी सांगितली, काही छान आठवणी सांगितल्या. आलिया आणि रणवीरची खूप छान मैत्री झालीये आणि ते एकमेकांबरोबर किती सहज वागतात हे दिसून आलं.

करण जोहरला netizens ने कसं ट्रोल केलं आणि लॉकडाउनमध्ये इंडस्ट्रीची परिस्थिति किती वाईट होती हे त्याने सांगितलं. त्याला सोशल मिडियामुळे खूप मानसिक त्रास झाला आणि नेहमीप्रमाणे त्याने नेपोटीजमचा विषय टाळला.

 

koffee nepotism im

 

आलियाचा नुकताच हिट झालेला चित्रपट ‘गंगुबाई काठीयावाडी’ याचीही चर्चा झाली. गंगुबाईचा रोल साकारण्यात रणवीरने तिला मदत केली आणि तिला प्रोत्साहन द्यायला तो सेट वरही जात होता.

पुढच्या वर्षी  या जोडीचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणारे. या चित्रपटाचं शूटिंग करताना त्यांची मैत्री जास्त घट्ट झाली कारण याच दरम्यान रणबीर कपूरने आलियाला प्रपोज केलं आणि त्यांचं लग्न ठरलं.

या सगळ्या गप्पा झेपण्यासारख्या होत्या आणि मनोरंजक होत्या पण जसे करणने गेम्स सुरू केले तिथे डोकच फिरायला लागलं. जसे जसे करण प्रश्न विचारायला लागला तसं वाटायला लागलं की हे मी काय बघत्ये आणि का? पण मला बघायचं होतं की यांची पातळी अजून किती घसरू शकते? आणि शेवटी तेच झालं! आपण किती ‘कूल’ आहोत, किती पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी स्वतःचे बेडरूम सीक्रेट्स सांगायची गरज काय आहे?

 

Koffee 3 im

 

चित्रपटातले इंटीमेट सीन ही त्या गोष्टीची गरज असू शकते जे आपण स्वीकारलं आहे आणि हे जुन्या चित्रपटांमध्येही असायचं! पण जूने कलाकार त्यांची पातळी ठरवून वागत होते, ते त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अतिशय राखून बोलायचे.

रणवीर सिंहने मात्र सगळी हद्द पार केली. व्हॅनीटी व्हॅनमध्ये त्याने दीपिका बरोबर सेक्स केलाय, सेक्स करताना तो वेगवेगळी गाणी ऐकतो, दिवसभर दमलेले असून त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स केला हे ही त्याने सांगितलं! याला काय म्हणावं? त्याला यात कितीही पुरुषार्थ वाटला असला तरी मला फक्त त्यात अश्लीलताच दिसली.

 

ranveer deepika im

 

हे सगळं सांगून झाल्यावर अभिमानाने तो म्हणतो, “I’m an ass man” आणि त्यावर करण जोहरचं उत्तर असतं, “तुझ्यावर तर एक सुपरहीरो मूवी काढला पाहिजे!” हा यांचा पुरुषार्थ! हे फक्त पुरुषच करतात असं अजिबात नाही! यात बॉलीवूडच्या स्त्रियांचाही तेवढाच वाटा आहे.

==

==

ट्विंकल खन्नाने सुद्धा याच शोमध्ये असंच काहीतरी बोलून गदारोळ घातला होता. तिला करण ने विचारलं होतं “अक्षय कुमारकडे असं काय आहे जे ‘Khans’ कडे नाही ?” तिचं उत्तर होतं, “Some extra inches” यावर ते तीघेही हसले आणि नंतर सारवासारव केली की आम्ही ऊंची विषयी बोलतोय.

 

twinkle khanna im

 

करण जोहर म्हणजे शेजारची गॉसीप आँटी, त्याला सगळं जाणून घ्यायचं असतं कोणाचं काय चाललंय? कोण कोणाबरोबर झोपतंय? आणि हे तो उघडपणे करतो आणि त्याला त्याचे पैसे मिळतात!

हार्दिक पंड्या, सैफ अली खान, करीना कपूर, सोनम कपूर, दीपिका पदूकोण यांनी याच शोमध्ये पूर्वी खूप बोल्ड स्टेटमेंट्स केली आहेत ज्याची नंतर कॉंट्रोवर्सी झाली. करण जोहरला सडेतोड उत्तर देऊन गप्प करणारी या शोमध्ये फक्त एक कंगनाच आली.

प्रतिष्ठा, स्वाभिमान, हे शब्द या दुनियेच्या गावीही नसावेत बहुदा! कुठे बाजीरावांची भूमिका उत्कृष्टपणे साकारणारा रणवीर सिंह आणि कुठे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारा ‘हा’ रणवीर सिंह! कपडे तर तो विचित्र घालतोच, ते आपण सोडून देऊ शकतो कारण काय घालायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

शेवटी अशी ही बनवा बनवी मधल्या सुधीर जोशींसारखं मी स्वतःशीच म्हणाले, “यांना लाज, लज्जा, शरम काही आहे की नाही?” जाऊदे जी आहे ती आपण घेऊन बसू, त्याचा त्यांना काही उपयोग नाहीये!” या मतावर शेवटी मी पोहोचले.

हा शो इतक्या आवडीने बघणं हे नक्कीच माझं गिल्टी प्लेजर आहे पण म्हणून असं काहीही बोलायला लागले हे स्टार्स तर मात्र नक्कीच विचार करावा लागेल यांना इतका भाव द्यायचा की नाही ते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?