' १९ व्या वर्षी शरीरावर १५ गोळ्या झेलून देखील टायगर हिल वाचवणारा ‘शूर सुभेदार’! – InMarathi

१९ व्या वर्षी शरीरावर १५ गोळ्या झेलून देखील टायगर हिल वाचवणारा ‘शूर सुभेदार’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशात शूरवीर लोकांची कमी नाही, उलट इतिहासावर नजर टाकली तर कित्येक शूरवीर याच भारतभूमीच्या मातीत जन्माला आले ही आपल्या निदर्शनास येईल!पण आपल्या देशाच एक दुर्दैव सुद्धा आहे ते म्हणजे या ग्रेट शूर वीरांना आपण सहजा सहजी विसरतो!

त्यांचा पराक्रम विसरतो, त्यांच बलिदान विसरतो आणि मग कोणत्यातरी एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांची आठवण आपल्याला होते हे किती दुर्दैवी आहे याचा आपण सध्या विचार सुद्धा करत नाही!

म्हणजे ज्या लोकांमुळे आपण आज मोकळा श्वास घेत आहोत त्यांची आठवण आपल्याला एखाद्या कलाकृतीतून व्हावी ही कितपत योग्य आहे?

२००४ साली लक्ष्य चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट खूप गाजला. ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला होता त्या सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांना आपण भारतीय ओळखत पण नाही.

 

 

lakshya

 

लेह–लडाख ला जाऊन आपण पेंगोंग लेक ला फोटो काढतो. का? तर करीना कपूर आणि आमीर खान तिकडे गेले होते किंवा ३ इडियट चित्रपटाच शुटींग तिकडे झालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पण ज्या टायगर हिल ला मिळवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, जे येण्यामुळे आज लडाख भारताच अविभाज्य अंग आहे, ते काबीज करणाऱ्या त्या भारतीय सेनेतील सैनिकांच्या स्मृतीला भेट द्यायला आपल्याला वेळ नसतो.

 

pangong

 

लक्ष्य काय असते ते जाणून घ्यायला चित्रपट बघण्याची गरज नाही. तर त्या लक्ष्यासमोर उभ राहून ते अनुभवण्याची गरज आहे.

 

yogendra sie

सुभेदार योगेंद्र सिंह यादव १८ ग्रेनेडीयर बटालियन च्या घातक तुकडीत कार्यरत होते. ४ जुलै १९९९ ला त्यांना टायगर हिल शत्रूकडून हिसकावून घेण्याची जबाबदारी देण्यात आली.

१६,५०० फुट उंचीवरील त्या कड्यावर जाण्याची जबाबदारी सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी स्वमर्जीने उचलली. अर्धी चढण पूर्ण केल्यावर शत्रूने मशीनगनने गोळ्यांचा मारा सुरु केला.

त्यात त्यांच्या प्लाटूनचा कमांडर आणि २ जण धारातीर्थी पडले असताना व स्वतःच्या शरीरात ३ गोळ्या लागल्या असताना सुद्धा कोणत्याही मदतीशिवाय त्यांनी चढण सुरु ठेवली.

शेवटचे ६० फुट त्यांनी अश्या अवस्थेत पार केले. तब्बल १६,५०० फुटावर ६० फुट चढण ती पण सुळक्या वरची! आपण इकडे ए.सी. रूम मध्ये किंवा सिनेमागृहात बसून नाही अनुभवू शकत.

त्यासाठी निदान १५,००० फुट उंचीवर जाऊन तिथलं वातावरण अनुभवाव लागते.

 

tiger hill

 

३ गोळ्या लागून सुद्धा सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी सुळक्यावर यशस्वी आरोहण केल. शत्रूच्या गोळ्यांना चुकवत. जमिनीवर लोळत जाऊन त्यांनी पाकिस्तानी बंकर मध्ये ग्रेनेड हल्ला केला.

ह्यात अंधाधुंद गोळीबार करणारे ४ पाकिस्तानी सैनिक गतप्राण झाले. त्यांच्या ह्या शौर्यामुळे मागून येणाऱ्या इतर सैनिकांना आरोहण करणे सोप्पे झाले.

इकडेच न थांबता वर आलेल्या आपल्या ७ साथीदारांसह सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी पाकिस्तानच्या दुसऱ्या बंकर वर हल्ला केला. प्रचंड धुमश्चक्री झाली. पाकिस्तानचे ते बंकर उध्वस्त झाले. ह्या मध्ये फक्त सुभेदार योगेंद्र सिंग परत आले.

तेव्हा त्यांच्या शरीरात १५ गोळ्या घुसल्या होत्या. दोन ग्रेनेड मुळे झालेल्या जखमा, तर एक खांदा पूर्णपणे निखळून लटकत होता.

अश्या हि परिस्थितीत सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी शत्रूच्या पुढच्या हालचालीची माहिती आपल्या कमांडिंग ऑफिसर ला दिली. तब्बल १६ महिने हॉस्पिटल मध्ये राहून पुन्हा एकदा त्यांनी भारतीय सैन्यात आपल काम सुरु केलं.

अश्या अचाट शौर्य दाखवणाऱ्या विराला आधी मरणोत्तर परमवीर चक्र जे कि भारतीय सैन्यातील सर्वोच्च पदक आहे ते देण्यात आलं. पण नंतर ह्या विरापुढे मृत्यूही हरला.

तब्बल १५ गोळ्या, दोन ग्रेनेड च्या जखमा अश्या अवस्थेतून त्यांनी मृत्यूला परत पाठवत पुन्हा आयुष्य सुरु केलं. हे नवं आयुष्य ही भारताच्या सेवेसाठी अर्पण केलं. हा पराक्रम जेव्हा त्यांनी गाजवला तेव्हा त्याचं वय होत अवघ १९ वर्ष.

 

yogendra-yadav-marathipizza02

 

वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय सैन्याचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र मिळवणारे ते सगळ्यात तरुण सैनिक आहेत.

ज्या काळात आयुष्याची स्वप्न सुरु होतात, आपण आयुष्याचं लक्ष्य ठरवतो, तेव्हा त्यांनी आपल लक्ष्य तर गाठलंच पण त्या पलीकडे आपल्या देशाला सार्वभौम ठेवण्यासाठी आपल्या प्राणाचाही विचार केला नाही. अश्या ह्या शूरवीर, बहादूर, देशभक्त सैनिकाला माझा कडक सॅल्युट.

लक्ष्य काय असते तर ते अनुभवण्यासाठी एकदा त्या टायगर हिल च्या समोर उभ राहून अनुभवा. पुढल्या वेळी लडाखला जाताना कारगिल स्मारकाला भेट द्या.

हा अनुभव तुमच्या आयुष्यात नक्की बदल करेल.

yogendra-yadav-marathipizza03

 

२०१५ मध्ये जेव्हा कारगिलच्या स्मारकासमोर उभ राहून टायगर हिल आणि तोलोलिंगच्या शिखरांना बघितलं, तेव्हा लक्ष्य ठरवताना त्या १९ वर्षाच्या जवानाच्या मनात काय चालू असेल ह्याचा विचार करत होतो.

कॅप्टन विक्रम बात्रा, सुभेदार योगेंद्र सिंह यादव, रायफलमॅन संजय कुमार ह्या शूरवीर भारतीय सैनिकांमुळे आज आपण लडाखला जाऊ शकतो. मला तिथे लिहलेल एक वाक्य नेहमीच स्मरणात रहाते. ते म्हणजे

शहीदो के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले…वतन पर मिटने वालों का यही बाकी निशॉ होगा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?