' तेलाच्या धोक्यामुळे भजी खाण्याचा मोह टाळताय? या घ्या “ऑईल-फ्री” भजीच्या टिप्स! – InMarathi

तेलाच्या धोक्यामुळे भजी खाण्याचा मोह टाळताय? या घ्या “ऑईल-फ्री” भजीच्या टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा आणि कांदा भजी यांचं फार जवळचं नातं आहे. पाऊस पडून गेला, की अशी मस्त गार हवा पडते आणि त्यावेळी लगेच घरात फर्माईश होते ती ‘भजी करा, कांदा भजी करा.’ आणि घरात भजीचा खमंग वास दरवळू लागतो.

तळलेल्या गरमागरम भजी प्लेटमध्ये आणून ठेवल्या, की बघता बघता संपून जातात. लगेच आलं घातलेला चहा झाला की पावसाळी संध्याकाळ सुफळ संपूर्ण झाली.

 

onion friiters im

 

पण आहारशास्त्र सांगतं, की तेलात कोलेस्टेरॉलचं असलेलं प्रमाण आपल्या तब्येतीला घातक ठरू शकतं. म्हणून का माणसाने भजी वगैरे खायचीच नाही का? अरे हो.. कधी कधी खायला हरकत नाही पण सतत तेलकट पदार्थ खाऊ नयेत.

अति तिथे माती, म्हणूनच कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली असते. खूप तेलकट पदार्थ शरीरातील चरबी वाढवायला कारणीभूत ठरतात. यासाठी लो कोलेस्टेरॉल, लो फॅट पदार्थ हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतात. म्हणूनच कमी तेल असलेले पदार्थ खावेत. कमी तेलात स्वादिष्ट भजी बनवता येतात. त्यासाठीच्या या काही ट्रिक्स.

साधारणपणे भजी करण्यासाठी आपण बेसनपीठ, कांदा, तिखटपूड, मीठ, थोडेसे मोहन, चिमूटभर खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर आणि पाणी घालून सरबरीत करून घेतो.

कढईमध्ये तेल घालून त्यात भजी सोडून तळून घेतो. याला इंग्रजीमध्ये डीप फ्राय असे म्हणतात. या प्रकारात तेल जास्त लागते. इंधनदेखील जास्त जळते. कारण तेवढी मोठी कढई तापायला वेळ लागतो. आणि तेलही जास्त जळते. हे टाळायचे काही छोटे छोटे वेगळे प्रकार-

१) आप्पेपात्राचा वापर –

भजी करण्यासाठी तयार केलेले मिश्रण आप्पेपात्रात थोडेसे तेल घालून आप्पेपात्रातील साच्यात थोडे थोडे पीठ घाला. मंद आचेवर तळून घ्या. थोड्या वेळाने दुसरी बाजू पण उलटवा आणि तळून घ्या. यामुळे कमी तेलात आपली भजी व्यवस्थित तळून होतील.

२) नॉनस्टिक भांडी वापरा –

 

onion friiters im1

 

नॉनस्टिक कढई किंवा पॅनमध्ये जर तळण केले, तर त्यासाठी तेल किंवा तूप खूप कमी लागते. या पॅनमध्ये जास्तकरून तेलावर परतून पदार्थ केले जातात. याला शॅलो फ्राय असे म्हणतात.

चमचाभर तेल पसरवून त्यावर भज्यांचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूनी परतवून घेतले जाते. यामुळे भजी कमी तेलात व्यवस्थित तळून निघतात. याने इंधन बचत आणि तेलाची पण बचत होते.

३) वाफेवर शिजवणे –

पाणी उकळायला ठेवा. भजी बुडतील इतपत पाणी असावे. पाण्याला उकळी फुटली ,की त्यात भजीचे मिश्रण त्यात हळूहळू भजीचे मिश्रण सोडावे. भजी उकडून निघतील. तुम्ही मोदकांसारखं वाफेवर शिजवू शकता. भजी व्यवस्थित शिजली, की सॉस किंवा चटणीबरोबर खायला द्या.

याचसोबत काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तयार केलेल्या भजी, पकोडे हे तेलकट होणार नाहीत.

अ) तळण करताना गॅस नेहमी मंद आचेवरच ठेवा. त्यामुळे पदार्थ सर्व बाजूनी एकसारखे तळले जातील. गॅस जर मोठा ठेवला, तर तळले जाणारे पदार्थ वरवर तळल्यासारखे दिसतात पण आतून कच्चे राहतात.

आ) कोणतेही पदार्थ तळण्याआधी थोडेसे शिजवून घ्या. त्यामुळे ते पदार्थ लवकर तळून होतात, शिवाय त्यात तेलही कमी राहते.

 

onion friiters im2

 

इ) शक्यतो कोणत्याही पदार्थाला ब्रेडक्रम्ब्ज, मैदा, यांचे कोटिंग केले, तर त्याला तळायला तेल खूप लागते आणे नंतरही त्याला खूप तेल सुटते. त्यामुळे शक्यतो या पदार्थांचे कोटिंग टाळा. जर केलेच तर पेपर टिश्यू वापरून तेल निथळून घ्या, ज्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल आणि प्रमाणशीर तेल पदार्थात राहील.

ई) तुम्ही तळण्यासाठी कढई वापरत असाल तर ती स्वच्छ करा. त्याला आधीचे कसलेही पदार्थ, पीठ, खरकटे चिकटले नसेल याची खबरदारी घ्या. कारण त्यामुळे पदार्थाचे चव बिघडू शकते. तसेच तेलही जास्त शोषले जाते.

आता पाऊस पडला, की भजी बटाटेवडे अजूनही तुमचे आवडते पदार्थ नक्की करा पण या दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?