' …आणि देवेंद्र फडणवीसांना मित्राच्या घरी भेटली आपल्या आयुष्यातली खरी ‘काजोल’…! – InMarathi

…आणि देवेंद्र फडणवीसांना मित्राच्या घरी भेटली आपल्या आयुष्यातली खरी ‘काजोल’…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सारे सर्वसामान्य लोक. आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सरधोपट मार्गाने होत असतात. पण नेते, अभिनेते यांच्याही आयुष्यात या गोष्टी घडत असतातच. पण आपल्याला त्या फारशा माहीत नसतात.  नेते असोत की अभिनेते, ती पण माणसेच असतात. ज्या भावना आपल्या असतात त्याच त्यांच्याही असतात. तेही शिक्षण , प्रेम लग्न, संसार या पायऱ्या आपल्यासारखे चढतात. मग ते मुख्यमंत्री असोत की उपमुख्यमंत्री.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं… देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची प्रेमकहाणी ऐकून तुम्हाला या ओळी पुन्हा पटतील.

नुकतंच महाराष्ट्रात सत्तांतर झालं. या सत्तांतराने एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले. देवेंद्र फडणवीस यांना मामा, चाणक्य, देवाभाऊ अशी बरीच नांवे त्यांच्या पक्षातील लोकांनी, विरोधकांनी काहीशी प्रेमाने, उपहासाने पण ठेवली आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांची स्थितप्रज्ञता खरोखर वाखाणण्याजोगी आहे.

 

devendra fadnavis inmarathi

 

आजवर त्यांच्या तोंडून कधीही कुणाहीबद्दल वेडेवाकडे, अनुद्गार निघालेले ऐकिवात नाहीत. तरीही ते खूपदा ट्रोल होताना दिसतात. आणि त्यांच्यापेक्षा जास्त ट्रोल होतात त्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस. त्यांना नेटकरी मामी म्हणतात. त्यांचे गाणे म्हणणे असो, त्यांचा मेकअप मधील लूक असो की, ट्वीटर वरून त्यानी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं शरसंधान, देवेन्द्र्जी ३० पुरणपोळ्या खातात हे विधान असो की ते वेषांतर करून शिंदेना भेटायला जात होते, अशी सनसनाटी विधाने असोत. त्या नेहमीच चर्चेत असतात, ट्रोलही होतात.

मध्यंतरी एका खाजगी वृत्तवाहिनीवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अमृता या दोघांमध्ये एक साम्य आहे की त्या दोघानाही शांत बसवत नाही अशी कोपरखळी मारली होती.

हे सारे असताना एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अमृता यांनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे. खरं तर कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नागपूरमधील डॉक्टर चारू आणि शरद रानडे यांची मुलगी अमृता.

अमृता यांचा जन्म १९७९ साली झाला. . नागपूरमध्ये शिक्षण झाल्यानंतर अमृतानी पुणे येथील सिंबायोसिस कॉलेजमध्ये एमबीए केलं आणि त्यांनी बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. आपल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनीही आपल्याला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे आणि एकंदरीत राजकारणात फारसा रस नसल्याचे मोकळेपणाने सांगितल होतं. मग देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना राजकारण माहिती झालं.

 

amruta 2 IM

 

खुद्द देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. १९८९ मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. १९९७ साली नागपूर महानगरपालिकेचे देवेंद्र फडणवीस महापौर झाले. नागपूर महानगरपालिकेचे सर्वाधिक तरुण महापौर होते.

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या देवेंद्रजीनी अविवाहित राहून संघाचे कार्य करायचे ठरवले होते. देव देश आणि धर्म यासाठी आयुष्य वेचायचे ठरवले होते. पण त्यांच्या आईला हा निर्णय मान्य नव्हता.

त्यांनी देवेंद्रना हा निर्णय बदलायला सांगितले. मग मात्र वयाच्या एका टप्प्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि वधू संशोधन सुरु झालं आणि योगायोग म्हणजे अमृता आणि देवेंद्र त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी पहिल्यांदा भेटले.

एक तासभर बोलल्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री होती काजोल. त्यांना अमृतामध्ये तिचा भास झाला. त्यांनी तसं सांगितलं पण. मग त्यां दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

२००५ साली डिसेंबर मध्ये त्यांनी नागपूरच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला नागपूरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ५०० लोकांना आमंत्रण दिले होते. लग्नानंतर कितीतरी दिवस अमृता देवेंद्रना सर अशी हाक मारत. मग काही दिवसांनी देवेन म्हणू लागल्या.

त्यांना एक मुलगी आहे, तिचे नांव दिविजा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतरही अमृता नोकरी करत राहिल्या. त्यांना गाण्याची आवड आहे, त्या शास्त्रीय संगीत शिकल्या आहेत. त्यांनी काही गाणीही गायली आहेत.

विशेष म्हणजे त्या गाण्यांवरून अमृता फडणवीस प्रचंड ट्रोल झाल्या आहेत. पण त्या ट्रोल करणाऱ्या लोकांना उलट धन्यवाद देतात. आपल्याला व्यक्त होण्याची ताकद या ट्रोलिंग करणाऱ्या लोकांनी दिली असं अमृता स्पष्ट सांगतात. देवेंद्र फडणवीस यांनी अमृता पण एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणी तिच्या आवडीच्या गोष्टी करायचा तिला हक्क आहे असं स्पष्ट सांगितलं. माध्यमांसमोर असं संयतपणे बोलणं खूप कठीण असतं.

 

devendra im

पत्रकारांचे डिवचणारे, चिडवणारे, खोचक प्रश्न, ट्रोल करताना लोकांची घसरलेली पातळी हे सारे काही सहन करणे सोपे नसते. पण देवेंद्र फडणवीस ते लीलया करतात. अमृताना पूर्ण विचार आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य त्यांनी दिलं आहे. सोशल मिडीयावर उडणारी धूळ बघताना काहीवेळा अमृता फडणवीस यांना आपली ट्वीट डीलीट करावी लागली. पण ती देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर.

एका खाजगी वृत्त वाहिनीवर अमृता फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की देवेंद्रजी सोडून मी जगात कुणालाही घाबरत नाही. म्हणजे एकमेकांचे न पटणारे मुद्दे असले तरीही हे दोघेही एकमेकांची साथ किती उत्तम देतात याचे यापेक्षा जास्त चांगले उदाहरण अजून कुठले असू शकेल?

आपल्या मुलीला मात्र त्यांनी या साऱ्यापासून लांब ठेवलं आहे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. राजकारणातील चाणक्य म्हणा किंवा आणखी काही, पण माणूस घडवताना निसर्गाने सगळ्यांना भावना कमी अधिक प्रमाणात त्याच दिल्या आहेत. मग त्या राग लोभ द्वेष, प्रेम काहीही असोत. देवेंद्र आणि अमृता त्याला कसे अपवाद असतील.. त्या प्रेमाच्या बळावरच तर ते दोघे एकमेकांना अशी साथ देत आहेत. नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?