' …..हे घडलं तर मी मातोश्री सोडून निघून जाईन, उद्धव यांच्या धमकीमुळे बाळासाहेबही हादरले होते – InMarathi

…..हे घडलं तर मी मातोश्री सोडून निघून जाईन, उद्धव यांच्या धमकीमुळे बाळासाहेबही हादरले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शिवसेना आणि बंडाचं राजकारण ही बाब काही नवी नाही, शिवसेनेने आजपर्यंत अनेक धक्के पचवले, कट्टर शिवसैनिक असलेल्या अनेकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं आणि आपली वेगळी वाट धरली. शिवसेनेतून बाहेर पडलेली व्यक्ती सहसा पुन्हा सेनेत येत नाही हा समज दृढ होण्यामागे अनेक नावं आहेत, त्यातलंच एक नाव म्हणजे नारायण राणे!

हल्ली राणे आणि ठाकरे पिता-पुत्रांमध्ये पेटलेला वाद दिवसेंदिवस भडकताना दिसतोय, मात्र एकदा याच राणेंमुळे उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ हे आपलं घर सोडून जाण्याची धमकी दिली होती, विशेष म्हणजे ही धमकी त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांनाच दिल्याने मोठाच गदारोळ माजला होता हे आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही.

 

rane im

 

यापुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेला हादरे बसले, मात्र यापैकी केवळ नारायण राणे यांना स्वगृही बोलवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः प्रयत्न केले होते.

झालं असं की शिवसैनिक असलेल्या राणेंना शिवसेनेत अस्वस्थ वाटू लागलं, उद्धव यांचा वाढता प्रभाव कुठेतरी खटकू लागला, त्यातच उद्ध यांना कार्याध्यक्ष पद देऊ केल्यानं त्यांचा शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय पक्का झाला आणि २००५ साली नारायण राणेंनी राजिनामा दिला.

त्यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. ”पक्षातील वरिष्ठ माझ्यावर नाराज असल्याने मला आता शिवसेनेत राहण्याची इच्छा नाही” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. किंबहूना आपण राजकारणातूनच संन्यास घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. मात्र त्यावेळी चक्क बाळासाहेबांनी राणेंची समजूत काढली. त्यांनी राजिनामा देऊ नये यासाठी बाळासाहेबांनीही प्रयत्न केले.

 

naryan rane inmarathi

 

कदाचित या प्रयत्नांना यश येऊन राणे शिवसेनेतच राहिले असते, मात्र याच वेळी उद्धव ठाकरे मध्ये पडले.

राणे जर शिवसेनेत राहणार असतील तर मी पत्नी रश्मी आणि मुलांसह घर सोडून जातो अशी थेट धमकी उद्ध ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिली. उद्धव यांचा हा पवित्रा सर्वांसाठीच धक्कादायक ठरला.

मुलाने घेतलेल्या या पवित्र्यामुळे बाळासाहेबांनीही माघार घेतली आणि राणेंना अडवण्याचा प्रयत्न थांबवला. याचाच परिणाम म्हणजे राणेंनी आपली भुमिका कायम ठेवत राजिनामा दिला.

त्यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणुका लागल्या. शिवसैनिक जरी राणेंवर खवळले असले तरी मालवण, मुंबई या भागात नारायण राणेंचं वर्चस्व अलिखित होतं.

राणेंना धडा शिकवायचाच या उद्देशानं शिवसेना पेटून उठली. या निवडणूकीत राणेंना हरवायचं, शिवसेनेचंच पारडं जड असावं यासाठी रणनिती आखण्यात आली.

यावेळी कोणतीही चूक होऊ नये यासाठी तब्बेत बरी नसतानाही खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली. त्यांनी कोकणात जाऊन जाहीर सभाही घेतली.

 

balasaheb inmarathi

 

अटीतटीच्या झालेल्या या लढतीत नारायण राणे जिंकले, इतकंच नव्हे तर तेव्हा शिवसेनेचे उमेदवार परशुराम उपरकर यांचं डिपॉझिटही जप्त झालं.

जर उद्धव ठाकरेंनी हा पवित्रा घेतला नसता तर कदाचित आज राणे पिता पुत्र शिवसेनेचा भाग असते, मात्र ‘जर-तर’ च्या विधानांना राजकारणात स्थान नसतं. त्यानुसार उद्ध ठाकरेंनी मातोश्री सोडून जाऊ नये यासाठी बाळासाहेबांनीही राणेंना न अडवल्याचं सिद्ध होतं.

सध्याही शिवसेना काहीशा अशाच व्दिधा मनस्थितीत दिसते. वर्षा सोडून मातोश्रीवर गेलेले उद्धव आणि बंडखोर आमदारांसह नव्याने सत्ता मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्यातील वैर संपणार का? शिवसेना नक्की कोणाची? या प्रश्नाचं उत्तर मिळणार का? हे येणारा काळच ठरवेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?