' इम्रान हाश्मीला आवरा! म्हणतोय “दीपिका बरोबर “तसे” सीन्स करायचे आहेत”! – InMarathi

इम्रान हाश्मीला आवरा! म्हणतोय “दीपिका बरोबर “तसे” सीन्स करायचे आहेत”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूडच्या गरमगरम गॉसिप्स रोज चवीपरीने चघळल्या जातात, सोशल मीडियापासून ते अगदी इंग्रजीमधील मासिकांपर्यंत, कोणत्या अभिनेत्याचे कोणत्या अभिनेत्रींसोबत अफेअर चालू आहे, कोणत्या अभिनेत्याचं ब्रेकअप झालं, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपसूक येत असतात.  सोशल मीडिया आणि चॅनल्समुळे तर आपल्याला दिवसरात्र अशा बातम्या कळत असतात.

काही वर्षांपूर्वी जिना इसी का नाम हैं या फारुख शेख यांच्या शोमध्ये बॉलीवूडची मंडळी येत असतं. त्यांच्या आयुष्यातील किस्से, करियरच्या जडघडणीमध्ये पाठीशी उभी राहिलेली मंडळी येत असतात, मुलाखतीचा कार्यक्रम असाही करू शकता येतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्याकडं बघितलं जायचं.

२००० च्या दशकात असाच आणखीन एक कार्यक्रम सुरु झाला तो म्हणजे कॉफी विथ करण, खरं तर इंग्रजी मुलाखतीच्या कार्यक्रमावर हा शो बेतला आहे. या शोचे आजतागायत ६ सीजन येऊन गेले आहेत. मध्यन्तरी हा शो बंद होणार अशी चर्चा होता मात्र हा शो हॉटस्टारवर यापुढे प्रदर्शित होणार असं निर्मात्यांनी घोषणा केली.

 

coffee with karan inmarathi

 

या शोच्या सिजन्समध्ये अगदी बच्चनजींपासून ते अगदी शोले सिनेमाचे कर्तेधर्ते सलीम खान येऊन गेले आहेत. हा शो म्हणजे बॉलीवूडच्या मंडळींना एकमेकांची पातळी सोडून खिल्ली उडवण्याचा हक्काचा प्लॅटफॉर्म . या शोचा अँकर करणं जोहर असेच प्रश्न विचारतो ज्यातून वाद निर्माण होईल अथवा त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालेल…असाच एका प्रश्न एका अभिनेत्याला विचारला होता ज्याची चर्चा खूप रंगली होती.

तो प्रश्न विचारला होता सिरीयल किसरला म्हणजे इम्रान हाश्मीला, २०१४ साली तो आपल्याच काकांसोबत म्हणजे महेश भट यांच्यासोबत या शोमध्ये आला होता. तेव्हा त्याला एक प्रश्न विचारला की कोणत्या अभिनेत्रींसोबत किस करायला मज्जा आली आणि कोणत्या अभिनेत्रींसोबत मज्जा आली नाही.

याचं उत्तर त्यानं दिलंच मात्र पुढचा प्रश्न जास्त मजेशीर होता तो म्हणजे कोणत्या अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन करायला मज्जा येईल, त्यानं लगेच उत्तर दिलं होत दीपिका पदुकोण, कारण या अभिनेत्रींसोबत त्यानं आजतागायत काम केलेलं नाही.

 

bollywood imran hashmi in marathi

 

करीना ऐश्वर्याला चोरणार? :

या शोमधले रॅपिड फायर नामक प्रकारात प्रश्न आणखीन खमंग होत जातात, करणने विचारलं की कोणत्या अभिनेत्यापासून ही गोष्ट तुला चोरायला आवडेल, अर्थात यामध्ये पर्याय दिले होतेच. सैफ अलीखान आणि अभिषेक बच्चन. लगेचच त्यानं यावर उत्तर दिलं की करीना कपूर आणि ऐश्वर्या राय, म्हणजेच या दोघांच्या धर्मपत्नी.

या शोमध्ये यापेक्षा देखील भयानक प्रश्न विचारले गेले होते. ज्या दीपिकाबद्दल इम्रान हाश्मी इंटिमेट सीन्स करण्याची ईच्छा करतोय त्याच दिपीकाने या शोमध्ये एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरची खिल्ली उडवली होती तिच्यासोबत आलेल्या सोनम कपूरने देखील कायमच फॅशनवरून इतर अभिनेत्रींनवर तोंडसुख घेतलं आहे.

 

deepika padukone ranbir kapoor IM

 

कॉफी विथ करणमधल्या या ६ कॉंट्रोवर्सीज आठवतायत का?

अभिनेत्रींच्या अशा ७ जोड्या ज्यांना ओळखण्यात भलेभले रसिकही गल्लत करतात

कॉफी विथ करण हा शो आज जगभरातील प्रेक्षक पाहतात विशेष म्हणजे हा शो इंग्रजीमध्ये असल्याने ज्यांना हिंदी कळत नाही असे प्रेक्षक देखील हा शो बघतात आणि मज्जा घेतात. बॉलीवूड हे समीकरण खरं तर सिनेमापेक्षा अशा गोष्टीनी जास्त चर्चेत येत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?