' हनुमंताच्या शेंदूरामागे आहे सीतामाईच्या कुंकवाचं कारण! मारुतीची अशीही रामभक्ती! – InMarathi

हनुमंताच्या शेंदूरामागे आहे सीतामाईच्या कुंकवाचं कारण! मारुतीची अशीही रामभक्ती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हनुमान म्हटलं की गदा, लांबलचक शेपटी, ब्रह्मचर्य अशा काही गोष्टी अगदी आपसूकच आठवतात. या हनुमानाचं पिळदार शरीर असलेलं रूप सगळीकडेच पाहतो. मात्र हनुमानच्या मंदिरात सहसा हे असं रूप पाहायला मिळत नाही. तिथे हनुमान दिसतो तो भगव्या रंगात!

 

maruti im

 

शेंदूर फासलेलं भारदस्त अंग! मात्र या हनुमानाला शेंदूर नेमका का बरं लावला जातो हे तुम्हाला ठाऊक आहे का? शेंदूर लावलेला हनुमान आपण नेहमी पाहतो, पण त्यामागचं रहस्य मात्र बऱ्याचदा ठाऊक नसतं.

हनुमानाला शेंदूर लावण्यामागे कारण आहे. चला आज तेच जाणून घेऊयात.

हनुमान अजरामर झाले…

हनुमान आणि शेंदूर यांचं एकमेकांशी असणारं नातं स्पष्ट कारण्यासाठी एक कथा सांगितली जाते. वनवास आणि लंकेतील रावणाविरुद्धचं युद्ध संपवून प्रभू श्रीराम अयोध्येकडे परतणार होते, त्यावेळी घडलेल्या एका घटनेचा दाखला यात देण्यात येतो.

वानर सेनेचा निरोप घेऊन राम आणि सीता माई निघाले होते. यावेळी हनुमानाची भेट घेताना सीता माईंनी त्यांना एक उपहार देऊ केला. हिरेजडित आणि मोत्यांनी सजलेली अशी एक सुंदर माळ सीतामाईने हनुमानाला दिली. मात्र हा उपहार हनुमानाने नाकारला. याचं कारण सुद्धा मोठं आश्चर्यकारक होतं.

प्रभू श्रीराम यांचं नाव त्यावर नसल्याने ही माळ घेणार नसल्याचं हनुमानाने सांगितलं. त्याची राम भक्ती यातून अगदी सहजरित्या दिसून येते.

 

sita im

 

हनुमानाने हा उपहार नाकारल्यावर सीतामाईने त्याला शेंदूर अर्पण करायचं ठरवलं. याहून मोठी आणि किंमती भेट देणं शक्य नसल्याचं सीतेने हनुमानाला सांगितलं. हनुमानाने या भेटीचा स्वीकार केला.

प्रभू श्रीराम म्हणजेच सीता मातेचे स्वामी असल्याने, त्यांच्या नावाने लावला जाणारा सिंदूर (शेंदूर) ही हनुमानाची सर्वोत्तम भेट ठरली. या शिंदूरमुळेच हनुमान अजरामर झाल्याचं मानलं जातं.

रामभक्तीची अशीही कथा…

हनुमानाच्या शेंदूर फसण्याची आणखीही एक कथा सांगितली जाते. हनुमान हा रामाचा सगळ्यात मोठा भक्त असल्याचं आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. त्याची हीच रामभक्ती त्याच्या आणि शेंदुराच्या नात्याचं कारण ठरली, असं या कथेत पाहायला मिळतं.

सीतामाई एकदा साजशृंगार करत असताना कुंकू लावत असल्याचं हनुमानाने पाहिलं. सिंदूर म्हणजेच कुंकू लावण्याचं कारण त्याने विचारलं. श्रीराम यांचं आयुष्य वाढावं म्हणून कुंकू लावता असल्याचं सीता माईने हनुमानाला सांगितलं.

रामाचा निस्सीम भक्त असणाऱ्या हनुमानाने विचार केला, की जर केवळ भांगेत कुंकू लावल्याने श्रीराम यांचं आयुष्य वाढणार असेल, तर मी संपूर्ण शरीराला शेंदूर लावून घेतो. म्हणजे प्रभू अमर होतील. असा विचार करून संपूर्ण अंगाला शेंदूर फासून हनुमान श्रीरामांच्या दरबारात प्रविष्ट झाले.

 

sindoor 1 im

 

तिथे त्यांची मस्करी करण्यात आली, मात्र रामाने या मस्करीचा परिणाम हनुमानावर होऊ दिला नाही.

त्याने हनुमानाला वरदान दिलं. मंगळवारी आणि शनिवारी जो कुणी तूप आणि शेंदूर अर्पण करून हनुमानाची पूजा करेल, त्याच्यावर प्रभू श्रीरामाची सदैव कृपा राहील असं हे वरदान असल्याचं मानलं जातं.

परिणामी हनुमानाला शेंदूर फासण्याचा पायंडा पडला असल्याचं मानलं गेलं आहे.

शेंदुराचं महत्त्व…

विज्ञान असं सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो. हनुमानाला जो शेंदूर लावला जातो, त्याचाच टिळा भक्त आपल्या कपाळी लावतात. यामुळे मनात चांगले विचार निर्माण होत असल्याचा निष्कर्ष विज्ञानात करण्यात आला आहे.

 

shendur im

 

तूप आणि शेंदूर हनुमानाला अर्पण केल्याने प्रभू श्रीरामाची कृपा सदैव राहील यावर श्रद्धाळूंचा विश्वास असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच हनुमानाला शेंदूर लावणं आणि अर्पण करणं ही प्रथा पाळली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?