' पावसात छत्री सांभाळणं मुश्किल जातं? हे वाचा – छत्रीचा योग्य वापर समजून घ्या! – InMarathi

पावसात छत्री सांभाळणं मुश्किल जातं? हे वाचा – छत्रीचा योग्य वापर समजून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात सुरवातीला केळीच्या पानांपासून छत्री बनवली जात होती. केळीच्या पानांमुळे पाऊस ओसरून जातो. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी याचा वापर केला जात होता. सुरुवातीच्या छत्र्यांचा पावसाशी संबंधच नव्हता. सुरवातीला छत्री फक्‍त, महत्त्वपूर्ण लोकांच्या प्रतिष्ठेचे व आदराचे प्रतीक दर्शवण्यासाठी होत्या.

पावसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे सध्या मोठमोठे शॉप्स, मॉल्स, मार्केट, चौकाचौकातील लहान दुकाने आणि हातगाड्यांवर छत्री विक्रीसाठी ठेवलेली आपल्याला पहावयास मिळते. यात ही लेडीज, जेंटस, किडस् अशी छत्रींची वर्गवारी केलेली असते.

सध्या मिनीचा जमाना असल्याने छत्री टू फोल्डर, थ्री फोल्डर होत गेली आहे. बदलत्या फॅशन शैलीमुळे छत्रीचा आकारही कमी होत गेला. तर मित्रांनो , पावसात भिजून आजारी पडण्यापेक्षा आपल्या जवळ छत्री असलेली कधीही चांगलंच नाही का?

छत्री ही अशी वस्तु आहे जी जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येते, काम झालं की लगेच ठेऊन देता येते. मुख्य म्हणजे रेनकोट जसा घालून ठेवावा लागतो तसं छत्रीचं नसतं. रेनकोट एकाच व्यक्तीसाठी असतो, पण छत्री आपल्यासोबत अजून एखाद्या व्यक्तीला पावसापासून वाचवू शकते.

 

umbrella inmarathi2
hindustantimes.com

 

पावसाळा सुरु झालाय आणि अशावेळेस घरात चांगल्या क्वालिटीची आणि जास्त टिकणारी अशी छत्री असायलाच पाहिजे.मात्र जोरदार पावसात, सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेकदा छत्रीमध्ये बिघाड होतो. त्यामुळे छत्रीची निगा राखणे खूपच महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने छत्रीची काळजी घेतली आणि आपण ती कुठेही विसरलो नाही तर आरामात एक पावसाळा तुम्ही एकच छत्री वापरुन काढू शकता.

मित्रांनो छत्री म्हणाले तर टिकावू नाहीतर वन टाइम युज असलेली गोष्ट आहे. आणि जिथे पाऊस जास्त होतो अशा ठिकाणी छत्रीची गरज आणि ती जवळ असण्याचे महत्व तुम्हाला नक्कीच माहिती असेल तेव्हा अशा अतिशय उपयोगी असलेल्या वस्तूची काळजी देखील अशाच पद्धतीने घ्यायला हवी. तेव्हा आपल्या छत्रीची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊयात

१. छत्री विकत घेताना सोय आणि टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्री निवडा.प्लास्टिकच्या तारा असलेली छत्री विकत घेऊ नका. छत्रीचे कापड आणि छत्रीच्या तारा टिकाऊ आणि गंजलेल्या नसाव्यात.

२. पावसातून घरात किंवा बाहेर कुठेही आल्यानंतर ओली छत्री लगेच बंद करू नये. छत्री उघडून ती सुकण्यासाठी ठेवावी. छत्री पूर्णपणे सुकल्यानंतरच ती बंद करावी.ओली छत्री बंद केल्यास तिच्या काडय़ा गंजतात किंवा कापड खराब होते. त्यामुळे छत्री बंद करण्यापूर्वी सुकवणे गरजेचे आहे.

३. छत्रीची तार तुटली असेल किंवा तार कापडापासून विलग झाली असेल तर तात्काळ ती दुरुस्त करून घ्या. अशा प्रकारच्या छत्रीकडे दुर्लक्ष केल्यास ती पुढे निरुपयोगी होऊ शकते. छत्री नेहमी हळूच उघडावी. झटकन छत्री उघडल्यास तिची तार तुटण्याची शक्यता असते.

 

umbrella im

 

४. छत्री उघडत नसेल तर बटणावर अधिक जोर देऊ नका. छत्री दुरुस्त करून तिचे बटन बदलून घ्यावे. छत्रीच्या काड्यांमध्ये आणि हॅण्डलजवळ घरच्या घरी खोबरेल तेल लावावे. असं केल्याने छत्रीच्या काड्या आणि धातूचे भाग यांचे गंज लागण्यापासून संरक्षण करता येतं.

५. छत्रीचा केवळ पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठीच उपयोग करा.अति तीव्र उन्हात छत्री वापरू नका, वापर करणार नसल तेव्हा छत्री कोरड्या कापडणे पुसून मग बंद करून ठेवावी. तसेच छत्री वापरण्यापूर्वी देखील तिच्या काड्या व्यवस्थित आहेत किंवा कापड उसवले नाही ना, हे तपासून पहावे.

६. छत्री ओली राहिल्यास तिला कुबट वास येवू शकतो त्यामुळे पावसातून आल्यानंतर छत्री पूर्ण कोरडी करून मगच बंद करून ठेवावी. यासोबत पावसातून चालताना देखील छत्रीचा उपयोग कसा करायचा ते ही आपण पाहू.

 

umbrella im 1

पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो?

पाऊस पडण्यापूर्वी ७ दिवस आधीच त्याचा अचूक संकेत देणारं हे अद्भुत मंदिर!

पावसात जेव्हा आपण छत्री घेवून बाहेर पडतो तेव्हा बरेचदा छत्री हवेच्या किंवा वार्‍याच्या जोरामुळे उलटी होवू शकते अशावेळी लगेच ती हवेच्या विरुद्ध दिशेला धरली तर ती सरळ होते. कधी कधी जवळून जाणार्‍या वाहनामुले उडवले गेलेले पानी आपण छत्री आडवी धरून आपल्या अंगावर उडण्यापासून रोखू शकतो.

पावसातून चालताना आपली छत्री कुठे अडकणार नाही ना याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, पाऊस आणि छत्री यांचे जवळचे नाते आहे. तेव्हा पावसाळ्यात पावसापासून आपले संरक्षण करण्यार्‍या आपल्या छत्रीची काळजी आपण घेतलीच पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?