' मुलींचा रंग गुलाबी आणि मुलांचा निळा : आपल्या या गैरसमजुतीमागचा इतिहास जाणून घ्या! – InMarathi

मुलींचा रंग गुलाबी आणि मुलांचा निळा : आपल्या या गैरसमजुतीमागचा इतिहास जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रंग हे आपल्या जीवनात चैतन्य निर्माण करत असतात. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सर्व वस्तू जर केवळ पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या दिसायला लागल्या तर आयुष्य किती बेरंग होईल? नाही का.

हिरवा निसर्ग, निळं आकाश, सप्तरंगाचे इंद्रधनू, आपण वापरणाऱ्या कपड्यांचे रंग हे वेगवेगळे असतात म्हणून आपल्या डोळ्यांना ते सुखद, आल्हाददायक वाटत असतं. पण, रंगांच्या बाबतीत एक जुनी मान्यता आहे की, मुलांना निळा रंग आवडतो आणि मुलींना गुलाबी रंग आवडतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही लहान मुलांना तर निळा रंग इतका आवडत असतो की, त्यांना प्रत्येक वस्तू, ड्रेस हे सगळंच निळ्या रंगाचं असावं अशी त्यांची इच्छा आणि प्रसंगी हट्ट असतो. तेच लहान मुलींच्या बाबतीत गुलाबी रंगासाठी होतांना बघायला मिळतं. ‘पिंक’ रंगाचं त्यांना खूप आकर्षण असतं आणि अशी शक्यता आहे की, ‘पिंकी’ हे नाव सुद्धा मुलींच्या गुलाबी रंग आवडत असल्याच्या सवयीमुळेच प्रचलित झालं असावं. मुलांना ‘निळा’ आणि मुलींना ‘गुलाबी’ रंग आवडण्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का ? जाणून घेऊयात.

 

blue pink IM

 

रंग आणि लिंग यांचा वैज्ञानिक दृष्ट्या कोणताही संबंध नाहीये. एक वर्षाच्या बाळांमध्ये केवळ हा प्रकार दिसतो की, मुलं हे निळ्या रंगाचं खेळणं इतर रंगाच्या खेळण्याच्या तुलनेत आधी उचलतात आणि मुली या गुलाबी रंगाच्या खेळण्याकडे आकर्षित होतात. इतकंच.

त्याशिवाय, निळा रंग माणसांसाठी आणि गुलाबी रंग स्त्रियांसाठी हा त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या कपड्यांमध्ये फरक करता यावा म्हणून आपल्यासमोर आणला गेला आहे हे कळल्यावर प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल. ही सुरुवात कधीपासून आणि कुठून झाली? याचा एक इतिहास आहे.

१९४० च्या दशकात फ्रांस देशाची राजधानी ‘पॅरिस’ येथे फॅशन इंडस्ट्रीची सुरुवात झाली. पॅरिस शहराला कित्येक वर्ष ‘फॅशन ची राजधानी’ म्हणून देखील ओळखलं जायचं. जगभरातील पर्यटक इथे यायचे आणि आयफेल टॉवर सोबतच इथे मिळणाऱ्या ‘फॅशनेबल’ कपड्यांची खरेदी करायचे.

 

paris inmarathi
archdaily.com

 

इथे विक्री होणाऱ्या कपड्यांमध्ये बहुतांश महिला या गुलाबी रंगाचे विकत घ्यायचे आणि पुरुष हे निळ्या रंगाचे कपडे विकत घ्यायचे अशी आकडेवारी पॅरिस शहराने प्रकाशित केली होती. ही आकडेवारी किंवा ही मानसिकता प्रथम नजीकच्या देशांमध्ये प्रचलित झाली आणि नंतर बघता बघता हे लोण जगभरात पसरल्याचं सांगितलं जातं.

फ्रान्स देशानंतर अमेरिका, इंग्लंड या देशांनी मुलींना गुलाबी रंगाच्या कपड्यांचं आकर्षण इतर रंगांच्या कपड्यांपेक्षा अधिक असतं या गोष्टीला दुजोरा दिला आणि अनुकरणप्रिय भारतात देखील हा ट्रेंड सुरू झाला.

मुलांनी निळ्या आणि मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे वापरावेत हा बदल एका पिढीने आत्मसात केला आणि पुढच्या पिढीला हे रंगांचं प्रमाण त्यांनी सांगितलं किंवा प्रसंगी लादलं.

२००७ मध्ये अमेरिकेच्या ‘विस्कोसिन स्टिव्हस् पॉईंट’ या विद्यापीठाने मुलींना आवडणारा गुलाबी रंग हा स्वभावामुळे आहे की त्यामागे काही शारीरिक कारण आहे? यासाठी एक सर्वेक्षण केलं होतं. २०० मुलींना त्यांनी गुलाबी रंग आवडण्याचं कारण विचारलं होतं. त्यापैकी १५% मुलींचं हे म्हणणं होतं की, यामागे काही वैज्ञानिक कारण असेल.

५५% मुलींचं हे म्हणणं होतं की, “आम्ही गुलाबी रंगाचे कपडे केवळ इतर मुलींच्या अंगावर बघून परिधान करण्यास सुरुवात केली.” इतर ४०% मुलींना त्यांच्या गुलाबी रंग आवडण्याचं कोणतं विशिष्ठ कारण सांगता आलं नाही.

१९२७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘रॅकेड’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय मासिकानुसार, अमेरिकेतील लहान मुलं हे पांढऱ्या शुभ्र रंगाचे अधिक चाहते होते. याचं कारण हे होतं की, हे कपडे स्वच्छ करण्यास सोपे असायचे. त्या काळातील मुलींना देखील निळ्या रंगाची खूप आवड होती. पण, नंतर निळा रंग हा मुलांचा रंग असं प्रचलित झालं आणि हा ट्रेंड बदलत गेला.

१९५३ मध्ये अमेरिकेत घडलेली एक घटना सुद्धा महिलांमध्ये गुलाबी रंगाची आवड निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं. या वर्षी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवला होता आणि ‘डिवाईट इस्न्होवर’ या व्यक्तीची अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.

या प्रसंगी झालेल्या या कार्यक्रमात डिवाईट यांच्या पत्नी ‘मॅमी इस्नोव्हर’ या गुलाबी रंगाच्या गाऊन मध्ये लोकांच्या नजरेस पडल्या होत्या. अमेरिकेतील वृत्तपत्राने या गोष्टीची दखल घेत ‘व्हाईट हाऊस’चा उल्लेख ‘पिंक हाऊस’ म्हणून केला होता. मॅमी यांचं गुलाबी रंगाबद्दल असलेलं प्रेम लोकांना आवडलं आणि हा रंग अधिकाधिक स्त्रिया परिधान करू लागल्या.

 

mammie insnower IM

 

निळा रंग हा प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचं प्रतिक मानलं जातं. हेच कारण आहे की, कित्येक बँकांच्या नावात निळ्या रंगाची अक्षरं किंवा निळ्या रंगाचा वापर अधिक केलेला दिसतो. पुरुषांच्या सुटस् च्या रंगात निळा रंगाचं प्रमाण हे त्यामुळेच अधिक बघायला मिळतं. त्याचप्रमाणे, गुलाबी रंग हा मृदूता दर्शवतो, म्हणून तो रंग महिला अधिक प्रमाणात वापरतात. विशेषतः आपली मृदू बाजू दर्शवण्यासाठी किंवा प्रतिमा बदलण्यासाठी सुद्धा काही महिलांनी गुलाबी रंगाचा वापर केल्याची दोन राजकीय उदाहरणं उपलब्ध आहेत.

पहिलं म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन या नेहमीच आपण किती मृदू आहोत हे लोकांना अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी गुलाबी रंगाचं जॅकेट वापरतात असं सांगितलं जातं. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘पीपल’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकतांना देखील त्यांनी आठवणीने गुलाबी रंगाचा वापर केला होता.

आपल्या भारतातील लोकप्रिय राजकीय नेत्या ‘मायावती’ या देखील बहुतांश वेळेस गुलाबी रंगाचा वापर करून आपली मृदू बाजू लोकांसमोर आणायचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या घराचा, बुटांचा, आवडत्या फुलांचा, वाढदिवसाच्या केकचा रंग हा गुलाबीच असतो असं सांगितलं जातं.

 

mayawati pink IM

 

२०१२ मध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या रिक्षांचा रंग देखील गुलाबी ठेवण्यात आला होता. इतकंच नाही तर, निवडणूक आयोगाने जेव्हा उत्तर प्रदेशातील त्यांच्या मुर्त्या झाकण्याचे आदेश तेव्हा ते सुद्धा गुलाबी रंगाच्या कपड्यानेच झाकले होते.

मार्केटिंगच्या मदतीने फॅशन इंडस्ट्रीने गुलाबी रंग हा केवळ युरोपियन देशांसाठी मर्यादित न ठेवता आशिया खंडात ‘गुलाबी रंग मुलींचा आवडता’ या आशयाच्या जाहिराती केल्या आणि एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तब झालं. हेच निळ्या रंगासोबत झालं आणि आज जगभरात ‘निळा रंग म्हणजे मुलांचा’ हे प्रसिद्ध झालं.

‘आर्चीझ’च्या ग्रीटिंग कार्डप्रमाणे अमेरिका, फ्रांस आणि तत्सम युरोपियन देश हे त्यांची रंग मान्यता आपल्यातही भिनवू शकले या मार्केटिंगचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?