' बायकोला उचला, तर कुठे कचऱ्याच्या डब्यातून धावा- हे १० खेळ म्हणजे लोकांचा विक्षिप्तपणाच – InMarathi

बायकोला उचला, तर कुठे कचऱ्याच्या डब्यातून धावा- हे १० खेळ म्हणजे लोकांचा विक्षिप्तपणाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खेळ खेळायला आवडत नाही असा माणूस सापडण कठिण आहे. जगभरात जितके खेळ खेळले जातात, त्यापेक्षा गमतीशीर आणि काहीसे विचित्र असणारे खेळ जास्त लोकप्रिय असलेले दिसून येतात.

या खेळांमध्ये शारीरिक हालचालीबरोबर करमणूक देखील होत असते. मग तो जपानचा तकाशी कॅसल असो किंवा आपल्याकडचा ‘खतरो के खिलाडी’ यामधील खेळ त्यांच्यातील थरारकतेमुळे आणि नेहमीच्या खेळांपेक्षा वेगळेपणा असल्यामुळे ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय असतात.

जगभरात असे अनेक थरारक आणि गमतीशीर असे खेळ आहेत, जे मोठ्या प्रमाणावर त्या त्या ठिकाणी खेळले जातात. असे कोणते खेळ आहेत ते पाहूया

१) चिखलातील फुटबॉल –

 

mud football im

 

फुटबॉलसारखा खेळ पावसात खेळण्याची मजा काही औरच आहे, पण या ही पुढे जाऊन फिनलंडमधील लोकांनी तर चक्क चिखलात फुटबॉल खेळण्याची संकल्पना राबविली.

ही कल्पना तिथे इतकी लोकप्रिय ठरली, की २००० साली थेट या खेळाची विश्व प्रतियोगिता आयोजित केली गेली.

२) चीज रेस

आतापर्यंत चीज खाण्यासाठी लोकांच्या उड्या पडतात हे माहीत होते, पण या चीजचा उपयोग रेससाठी होऊ शकतो, हे नवलच आहे. लंडन मधील कुपर्स हिल वर चीज रेस नावाचा अनोखा खेळ खेळला जातो.

यात डोंगरावरून चीजची गोल चकती खाली टाकली जाते आणि मग ही चकती खाली पोहोचण्याआधी पकडायची. यासाठी लोकांनी एकमेकांना ढकलले तरीही हरकत नाही. सर्वात आधी खाली पोहोचणारा विजेता घोषित केला जातो.

३) स्प्लाश डायविंग –

 

splash diving im

 

वेगवेगळ्या पध्दतीने पाण्यात सूर मारताना पाहणे, हा मुळातच एक आनंददायी खेळ असतो, पण या खेळात मात्र, उलट्या रीतीने म्हणजे शरीराची पाठ प्रथम पाण्यात गेली पाहिजे. ती देखील कमीत कमी पाणी उडवून. आहे की नाही भन्नाट कल्पना.

विशेष म्हणजे २००६ साली या खेळाची देखील जागतिक स्तरावर स्पर्धा आयोजित केली होती.

४) बूट फेकणे –

आतापर्यंत एखाद्याला हाणण्यासाठी बूट फेकला जात असे. पण यावरून देखील खेळ होतो, हे खूप गमतीशीर आहेत.

यात वेलिंग्टन नामक बुटांचा वापर केला जातो. हे रबरी बूट असून गमबुटासारखे असतात नि उंचीला थोडे जास्त असतात आणि एका हातात एक बूट पकडून तो खूप दूरवर फेकायचा असतो.

आतापर्यंत या खेळामध्ये ६८.०३ मीटर अंतरावर बूट फेकल्याचा रेकोर्ड आहे. १९ व्या शतकापासून हा खेळ फिनलंड मध्ये खेळला जातो. खास करून तेथील नाविकांमध्ये या खेळाची तुफान लोकप्रियता आहे.

५) बायकोला उचलून धावणे –

 

wife racing im

 

नावातच इतकी धम्माल आहे, तर प्रत्यक्ष खेळात किती धम्माल असेल, याची कल्पना न केलेली बरी.

सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडू हा विवाहित असतोच असे नाही. यासाठी खेळाडूने आपल्या बरोबर कोणत्याही स्त्रीला आणावे, जी बायको असलीच पाहिजे असे नाही, पण ती कमीत कमी सतरा वर्षाची असावी आणि तिचे वजन ४९ किलो इतकेच असावे. जर खेळाडूची बायको या नियमांमध्ये बसत असेल तर तो तिला घेऊन धावू शकतो.

६) तुमचा गोल ठरवा आणि गोल करा –

हा मजेशीर खेळ गावाच्या नदी किनारी खेळण्यात येतो. दोन गावांच्या मध्यातून वाहणाऱ्या नदीच्या एका गावातून बॉल आणायचा आणि दुसऱ्या गावात जाऊन तुम्ही तो बॉल कुठवर घेऊन जाणार आहात हे निश्चित करायचे.

मग बॉल हातात घेतल्यापासून ते ठराविक लक्ष्यापर्यंत पोहचू न देण्यासाठी लोकांनी ना ना प्रकारचे अडथळे निर्माण करायचे. फक्त सहभागी खेळाडूला जीवे मारायचे नाही हे मात्र लक्षात ठेवावे.

७) बुद्धीबळ- बॉक्सिंग –

 

chess boxing im

 

नावावरूनच समजले असेल, की यात बुद्धीबळ आणि बॉक्सिंग हे दोन्ही खेळ खेळले जातात. म्हणजे एक फेरी बॉक्सिंगची मग बुद्धिबळ खेळायचे., जोपर्यंत एखादा खेळाडू चेकमेट होत नाही अथवा नॉक आउट होत नाही तो पर्यंत हा खेळ खेळला जातो.

८) कचरा गाडीची रेस –

या रेसला गरिबांची फॉर्म्युला रेस असे ही म्हणतात. यात कचरा गाडीमध्ये खालच्या बाजूला एक फळी बसविली जाते आणि त्यावर बसून ही गाडी चालवायची असते. यात १२० लिटरच्या कचरा गाडीचा वापर केला जातो. यावर बसून ताशी ६० किमी वेगाने गाडी धावते.

दुसरे असे, की ही कचरा गाडी स्वच्छ, कचऱ्याने न भरलेली व कोणत्याही प्रकारची दुर्गंधी त्यात असू नये, अशी अट असते.

९) हाय हिल्स घालून धावणे –

 

high heels race im

 

खरे तर या खेळाचा जन्म दुकानाची प्रसिद्धी करण्याच्या हेतूने झाला होता, पण यात दुकानाच्या प्रसिद्धीपेक्षा हा खेळच अधिक लोकप्रिय ठरला.

अनेक तरुणींना हिल्स घालून धावण्यात थ्रिलिंग वाटल्याने ही रेस अधिकाधिक लोकप्रिय ठरली.

१०) चिखलात पोहण्याची रेस –

नाव वाचून “ई.. ई.. ग” अशीच काही भावना तुमच्या मनात निर्माण झाली असेल. लंडनमधील वेल्स या प्रांतात सॅनरटीड वेल्स नावाचा दलदल युक्त असा भाग आहे. हा ५५ मित्र लांबीचा नाला असून यात भाग घेणाऱ्याला तो पूर्ण पार करून परत आपल्या जागेवर यायचे असते.

आतापर्यंत एक मिनिट १८ सेकंदाचा रेकॉर्ड आहे. अगदी पट्टीचे पोहणारे देखील यात गारद होतात.

यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षत आली असेल ,की वरवर हे खेळ खूप सोपे नि मजेशीर वाटत असले, तरीही ते बुद्धीला चालना देणारे आहेत हे मात्र नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?