' या ७ मूलभूत कारणांमुळे डिग्री, गुणवत्ता, कौशल्य असूनही नोकरी मिळणं अशक्य होतं! – InMarathi

या ७ मूलभूत कारणांमुळे डिग्री, गुणवत्ता, कौशल्य असूनही नोकरी मिळणं अशक्य होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नोकरीसाठी आवश्यक पात्रता असूनही, मुलाखतीत मात्र अपयश येतं आणि नोकरी मिळत नाही. तुमचा बायोडेटा कितिही चांगला असला तरीही प्रत्यक्ष मुलाखतीवर बरंच काही अवलंबून असतं.

अनेकजणांची नेमकी इथेच चूक होते आणि त्यांना नोकरी मिळता मिळत नाही. आज पाहूया यशस्वी मुलाखतीचे गुरुमंत्र-

नोकरी मिळण्याअसाठी आवश्यक ती पात्रता असूनही तुम्हाला जर वारंवार नकार येत असेल, तर तुम्ही बारकाईनं विचार करायला हवाय की तुमचं मुलाखती दरम्यान काही चुकत आहे का?

बहुतांश उमेदवारांचं या टप्प्यावरच समीकरण जुळून येत नाही आणि वारंवार नकाराला सामोरं जावं लागतं. अशा सततच्या नकारांमुळे नैराश्य येतं.

 

sad fishing 3 inmarathi

 

कोणतीही नोकरी मिळण्यासाठी तुमचा पूर्वानुभव आणि शैक्षणिक योग्यता महत्वाची असतेच, मात्र त्याव्यतिरिक्त खालील काही कारणांमुळे तुमची संधी वाया जाऊ शकते.

१ पाठपुरावा न करणं – अनेकजण ही चूक करतात आणि त्यांच्या लक्षातही येत नाही की आपण चूक केलेली आहे. म्हणजे नोकरीसाठी मुलाखत देऊन आल्यानंतर अनेकजण मागे वळून बघतही नाहीत.

मुलाखतीनंतर धन्यवादाचा मेसेज न पाठविणं, मुलाखतीनंतर पाठपुरावा न करणं यामुळे तुम्हाला या नोकरीची गरज नाही आणि तुम्ही फ़ार कॅज्युअल ॲप्रोच ठेवला आहे असे संकेत जातात.

२. कमी जनसंपर्क असणं – कितीही म्हणलं, तरी हे वास्तव नाकारता येणार नाही. तुमचा जनसंपर्ज जितका चांगला तितकी तुम्हालाच नोकरी मिळण्याची संधी अधिक. म्हणूनच जनसंपर्क वाढवावा.

तुमच्याबाबत चांगल बोलणारे लोक असतील, तर सहाजिकच त्याचा तुमच्या इमेजवर अनुकूल परिणाम होतो.

३. एकच रिज्युम वापरणं – साधारणपणे काय होतं, की एकच साचेबध्द असा रिज्युम बनवून ठेवलेला असतो आणि प्रत्येक नोकरीच्या वेळेस तोच पुढे केला जातो. तसं न करता, प्रत्येक नविन कंपनीनुसार यात थोडेफ़ार बदल करायला हवेत.

 

resume inmarathi 1

 

त्या कंपनीनुसार तुमच्या बायोडेटातले मुद्दे ठळक करायला हवेत. जेणेकरुन बायोडेटा चाळणी होत असताना तुमचा बायोडेटा बाजूला ठेवला जाणार नाही.

तसेच जेव्हा प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते, तेव्हा याच मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार असतात, तशी तयारी करणं आवश्यक आहे.

४. महत्वाकांक्षा नसणं – मुलाखती दरम्यान तुम्ही जर केवळ तुमच्या शैक्षणिक पात्रतेवरच विसंबून राहिलात, तर मुलाखत घेणार्‍याचा असा समज होतो, की तुम्हाला फ़ारशी महत्वाकांक्षा नाही.

कोणत्याही कंपनीसाठी महत्वाकांक्षा असणारे कर्मचारी हे त्यांची संपत्ती असतात, कारण त्यांची महत्वाकांक्षा कंपनीलाही प्रगतीपथावर नेणारी असते.

५. चुकीची देहबोली – मुलाखती दरम्यान तुम्ही प्रश्नाची काय उत्तरं देत आहात याचबरोबर ती कशी देत आहात हेही महत्वाचं आहे. देहबोली फार महत्वाची भूमिका बजावते.

 

Job Interview inmarathi

 

तुमच्यातला आत्मविश्वास हा तुमच्या उत्तरांमधून जसा दिसत असतो तसाच तो तुम्ही बसता कसे, हातवारे किती आणि कसे करता, चेहरा तणावग्रस्त आहे का? या सगळ्यांवर अवलंबून असतो.

६. कंपनीबाबत पुरेशी माहिती नसणं –  ही चूक बहुतेकांकडून होते. अगदी अजाणता होते, पण हे देखील मुलाखतीनंतर नोकरी न मिळण्याचं एक कारण असूच शकतं.

ज्या कंपनीत नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणार आहात, त्या कंपनीची आजच्या घडीपर्यंतची माहिती असणं आवश्यक असतं.

७. अयोग्य कव्हर लेटर – आता सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा. अनेकजण कव्हर लेटर किंवा सबमिशन ईमेल कस्टमाईझ करत नाहीत.

कव्हर लेटर बनविताना एक किंवा दोन गोष्टी निवडा ज्यामुळे तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करायला उत्सुक आहात. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे या कंपनीने तुमचं लक्ष वेधून घेतलं आहे, ते यात लिहा.

तुमच्याकडील कौशल्यं या नोकरीसाठी कशी योग्य आहेत हे देखील यात नमूद करा. जेनरिक कव्हर लेटर जोडणं टाळा.

थोडक्यात सांगायचं तर तुमची शैक्षणिक पात्रता असली, तरीही मुलाखती दरम्यान तुम्ही कसे वागता, बोलता हे देखिल महत्वाचं असतं. त्यामुळे या बाबींकडे लक्ष द्या.

 

raju 3 idiots rastogi interview file closing inmarathi

 

तुम्हालाही जर नोकरीच्या ठिकाणांहून नकार येत असेल, तर वर सांगितलेल्या मुद्द्यांपैकी एखादा कमकुवत आहे का? याचा विचार करा आणि त्यानुसार बदल करा, यश तुमचंच असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?