' …तर शोएब अख्तर सोनाली बेंद्रेला किडनॅप करणार होता… – InMarathi

…तर शोएब अख्तर सोनाली बेंद्रेला किडनॅप करणार होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवुड आणि क्रिकेट ही जोडी लोकप्रिय आहे. अनेक क्रिकेटर्सची बॉलिवुड सुंदर्‍यांसोबत असणारी प्रेमप्रकरणं वृत्तपत्रांचे, गॉसिप मॅगझिन्सचे कॉलम गाजविणारी ठरली. काहींनी या प्रेमाला अधिकृततेचा शिक्का देत लग्नही केलं तर काही प्रेमप्रकरण काळाच्या ओघात नाहीशी झाली.

काही प्रेमप्रकरणं तर चक्क एकतर्फी होती. प्रसिध्द पाकिस्तानी खेळाडू आणि नव्वदच्या दशकातली बॉलिवुड सुंदरी यांचं प्रकरणही यापैकीच एक!

पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर, ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं तो भारतातही लोकप्रिय होता. हा तो काळ होता, जेंव्हा क्रिकेटर्सना घेऊन ग्लॅमरस कार्यक्रम सादर केले जात. जगभरातल्या टीम्समधले क्रिकेटर्स भारतात येत.

 

shoaib akhtar inmarathi

 

इथल्या फिल्मी पार्ट्यात रमत आणि मग एखाद्या हिरोईनसोबतच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण येत असे. पाकिस्तानी क्रिकेटर्सपैकी शोएब अख्तर हा वेगवान गोलंदाज त्याच्या सनकीपणामुळेही परिचित होता. मैदानावर उतरलेला शोएब सतत डोकं तापलेलं असायचा, त्याच्या या संतापाला इतर खेळाडू वचकून असत.

अशा या संतापी , सतत डोक्यात राख घालून वावरणार्‍या खेळाडूच्या ह्रदयात बसली होती एक सुंदर बॉलिवुड सुंदरी. नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्यानं जीने लाखो जणांना वेड लावलं होतं ती अभिनेत्री म्हणजे, सोनाली बेंद्रे.

अजून करिना कपूरचं पदार्पणही झालं नव्हतं आणि झिरो फ़िगर काय भानगड असते हे माहितही नसण्याचा तो काळ. बाकी पाच फ़ूट गोल गोबर्‍या नायिकांत सडसडीत, चवळीची शेंग असणारं एक मराठमोळं सौंदर्य दाखल झालं. माधुरी, उर्मिला या आधीपासूनच इंडस्ट्रीवर राज्य करत होत्या. यात नविन नाव सामिल झालं.

या दोघींइतकं व्यावसायिक यश सोनालीला मिळालं नसलं तरिही तिनं लाखो फॅन्सवर जादू केली होती. आजही ९० च्या किड्समध्ये ही जादू अजूनही कायम दिसेल.

 

sonali bendre IM

 

मॉडेल म्हणून कारकिर्द चालू केलेली सोनाली चित्रपटात आली तीच शोभेची बाहुली म्हणून. तिची संपूर्ण कारकिर्दच याच प्रकारच्या भूमिका करण्यात गेली. अगदी एखाद दुसर्‍या चित्रपटाचा अपवाद वगळता सोनाली छान छान कपडे घालून गाण्यात नाचतानाच दिसली.

अशा गोड बाहुलीसारख्या दिसणार्‍या अभिनेत्रीच्या प्रेमात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज पडला. तिचे सगळे चित्रपट त्याने पाहिले होतेच मात्र जेंव्हा तो तिला पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटला तेंव्हा पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडला. त्याला ती इतकी आवडायची की तिचा फोटो त्याने आपल्या पाकिटात ठेवला होता.

अर्थातच हे प्रेम एकतर्फीच होतं आणि ते नेहमी तसंच राहिलं कारण त्यानं तिला कधी थेट प्रपोज केलंच नाही.

एका मुलाखतीत काही वर्षानंतर त्यानं सांगितलं अर्थातच गंमतीत की, सोनालीला प्रपोज केल्यावर तिनं नकार दिला असता तर त्यानं तिला किडनॅप केलं असतं, इतका तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. सोनालीला मात्र या प्रेमाचा पत्ताही नव्हता.

 

shoaib and sonali IM

 

सोनाली नेहमीच तिच्या ठराविक वर्तुळात वावरायची. तिच्याभोवती एक अदृश्य कुंपण होतं जे कोणालाही भेदणं जमत नसे. आपला आब राखून वावरणारी अभिनेत्री अशी तिची कालही ओळख होती आणि आजही आहे.

कालांतरानं तिला शोएबच्या प्रेमप्रकरणाबाबत विचारलं असता तिनं तिच्या नेहमीच्याच शांत सुरात सांगितलं की, “तिला क्रिकेटमधे फारसा रस नाही. ती आवडीने मॅचेस बघत नाही त्यामुळे तिला खेळाडूंबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे असं कोणी प्रेमात असेल तर त्याची तिला काही कल्पनाच नाही.”

हे सांगून ती पुढे म्हणाली की जर तो इतका प्रसिध्द खेळाडू असेल आणि माझा फ़ॅनही असेल तर माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. मी त्याचे आभार मानते.

सोनालीच्या या उत्तरावरुन लक्षात यायला हरकत नाही की शोएबने प्रपोज केल्यानंतर तिनं काय उत्तर दिलं असतं. अर्थातच शोएबवर विश्र्वास ठेवायचा तर सोनालीचं अपहरण नक्की झालं असतं.

 

sonali bendre 3 IM

 

नंतर शोएबनेसुद्धा एका मुलाखतीत हे सगळं धादांत खोटं असल्याचं स्पष्ट केलं होतं. सोनाली बद्दल त्याच्या मनात कधीच काही नव्हतं. नंतर त्याचं नाव अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाशी जोडलं गेलं तीही शक्यता शोएबने खोडून काढली! 

यातला गंमतीचा भाग सोडला तर दोन वलयांकीत व्यक्तींनी प्रेमासारखी भावना नाजूकपणे हाताळल्याचं हे उदाहरण आहे. जरी त्याने तिच्यावर मनापासून प्रेम केलं असलं तरी त्या प्रेमापायी तिला लाजिरवाणं होऊ दिलं नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?