' ‘पावसाळ्यात कपडे वाळतच नाहीत’ या समस्येवर ‘हे’ आहेत रामबाण उपाय – InMarathi

‘पावसाळ्यात कपडे वाळतच नाहीत’ या समस्येवर ‘हे’ आहेत रामबाण उपाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘रिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन… ‘ पावसाळा आला, की अशी गाणी मनात रुंजी घालायला लागतात. सगळं वातावरण धुंद असतं, वाफाळता चहा आणि कांदा भजीचे फोटो स्टेट्सवर दिसायला लागतात, पण अशातच काही प्रॉब्लेम्सदेखील उदभवतात, यातलाच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे कपडे न वाळणं.

पावसाने वातावरण दमट होतं, बऱ्याचदा २-२ दिवस हवामान ढगाळ असतं. सूर्यदेवांचं दर्शनही होत नाही. अशा सगळ्या वातावरणात धुतलेले कपडे तसेच ओले राहतात आणि घरात एक प्रकारचा कुजत वास येतो. हॉल- बेडरूम सगळीकडे कपडेच कपडे होतात.

हा त्रास कमी व्हावा, यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांनी तुमचे कपडे वळायला मदत होईल.

 

clothes im

१. हँगरचा वापर करा

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या खोलीत तुम्ही कपडे वळत घालते आहेत, त्या खोलीतील खिडकी- दार उघडं ठेवण्याचा प्रयत्न करा, यामुळे कपड्यांना कुजत वास येणार नाही. आतल्या कपड्यांसाठी तुम्ही हॅंगरचा वापर करा.

हँगरला अंतर्वस्त्र लावून फण खाली हँगर्स ठेवा. फॅनखाली जमिनीवर कपडे ठेवण्यापेक्षा हँगरला लावलेत, तर खेळत्या हवेमुळे ते दोन्ही बाजूंनी लवकर वाळतात. अंतर्वस्त्र वाळवण्यासाठी तुम्ही हँगरचा वापर करत असाल, तर दोरीवर इतर कपड्यांसाठी जागा शिल्लक राहते, त्यामुळे बाहेर वापरायचे कपडे नीट पसरवून वाळत घालता येतात. कपडे पसरवून वाळत टाकलेत, तर ते लवकर वाळतात.

२. इस्त्रीचा वापर

 

ironing clothes inmarathi

 

बऱ्याचदा कापड जाड असेल, तर कपडे लवकर वळत नाहीत, जर ८० टक्के एखादा ड्रेस वाळला असेल, तर तुम्ही इस्त्रीच्या मदतीने तो ड्रेस सुकवू शकता. बऱ्याचदा जीन्सचे खिसे लवकर वळत नाहीत, अशावेळी त्या कापडावर इस्त्री फिरवून तुम्ही कापड सुकवू शकता.

फक्त इस्त्री करताना कापडाचा पोत लक्षात घ्या. सिल्कसारखे कापड असेल, तर त्यावर वेगळे कापड ठेऊन इस्त्री करा.

३. दुर्गंधी येऊ नये म्हणून …

कपडे लवकर वाळवेत आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून कपडे धुताना फॅब्रिक कंडिशनर वापरा. ज्या खोलीत तुम्ही कपडे वाळत घातले आहेत, तिकडे धूप लावू शकता. कपडे पूर्ण वाळल्यानंतरच कपाटात ठेवा. कपाटात तुम्ही कापूरही ठेऊ शकता.

४. वाशिंग मशीनचा वापर

 

washing clothes inmarathi

 

वाशिंग मशीन क्लीन आहे की नाही हे वारंवार बघणं गरजेचं आहे. शिवाय पावसाळ्यात तुम्ही दोन वेळा कपडे ड्रायरमधून फिरवू शकता.

५. घट्ट पिळणं महत्त्वाचं

कपड्यांमधून शक्य तितकं पाणी कमी होणं गरजेचं आहे, तरंच कपडे लवकर वाळतील. हाताने कपडे धूत असाल, तर कपडे घट्ट पिळा. झटकून मगच वाळत टाका.

फॅनखाली कपडे वेळात घालणे, कोणते कपडे धुवायला टाकायचे आणि कोणते नाही हे ठरवणं हेही महत्वाचं आहे. या टिप्सनी घरात कपड्याचा ढीग होण्यापासून तुम्ही वाचवू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?