' १२ वर्षांपूर्वीच्या मळक्या कपड्यातल्या चित्राला आज हॉटेलात बघून सुधा मूर्ती किंचाळल्याच! – InMarathi

१२ वर्षांपूर्वीच्या मळक्या कपड्यातल्या चित्राला आज हॉटेलात बघून सुधा मूर्ती किंचाळल्याच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुधा मुर्ती…एक यशस्वी उद्योजिका, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता…एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढणारी खरंतरं असामान्य मात्र तरिही प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशी सामान्य स्त्री! त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचे दाखले जगाने आजवर अनेकदा पाहिले, अनुभवले, मात्र या सगळ्याच्या पलिकडे जात त्यांचं माणूस म्हणून असलेलं मोठेपण सिद्ध करणारा हा किस्सा आजही तितकासा प्रसिद्ध नाही.

पैसा, प्रसिद्धी, सन्मान या सगळ्याच्या भिंती मोडीत काढत केवळ माणूसकीचा धर्म पाळत एखाद्याचं आयुष्य घडवणाऱ्या सुधा मुर्तींचा हा किस्सा वाचून समाधानाने, आनंदाने डोळ्यात पाणी आलं नाही तरच नवल!

 

sudha murthy inmarathi
edexlive.com

 

गोष्ट काही वर्षांपुर्वीची, नेमकं कोणतं साल होतं हे सांगणं कठीण मात्र आपली साधी जीवनशैली सांभाळणाऱ्या, काटकसरीने संसार करणाऱ्या, इन्फोसिसची स्वप्न पाहणाऱ्या सुधा मुर्ती ट्रेनने बेंगलोरला निघाल्या होत्या, त्या काळची!

सवयीने ट्रेनमध्ये त्यांचं वाचन सुरु होतं, आसपासच्या सहप्रवाशांशी गप्पाही सुरु होत्या. तेवढ्यात टिसी डब्यात दाखल झाला. प्रत्येक प्रवाशाने इमानेइतबारे आपलं तिकीट त्याला दाखवलं, मात्र एका सीटखाली त्याला काहीशी चुळबूळ जाणवली.

त्याने वाकून पाहिलं, तर सीटखाली एक चिमुरडी दडून बसली होती. त्याने हाताला धरून तिला बाहेर काढलं, तशी ती रडायला लागली.

साधारण दहा-बारा वर्षांचं वय, मळके कपडे, भेदरलेला चेहरा…इतर प्रवाशांप्रमाणेच सुधा मुर्तीही समोर घडणारा तो प्रसंग पाहू लागल्या. टिसीने तिकीट विचारताच तिने प्रामाणिकपणे तिकीट नसल्याचं कबूल केलं.

 

child im

 

तिची अवस्था पाहून सुधाजी पुढे आल्या आणि पर्समधील काही रक्कम देऊन त्यांनी टिसीला तिचं नवं तिकीट बनवायला लावलं.

आश्चर्यचकित झालेला टिसी म्हणाला, नविन तिकीट काढण्यापेक्षा काही रक्कम देऊन विषय संपवता आला असता, मात्र सुधा मुर्तींनी काही उत्तर न देता त्याच्याकडून तिकीट घेत त्या मुलीच्या हाती ठेवलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळत राहिल्या.

”तु कुठे चालली आहेस?, तुझं नाव काय? या सुधा मुर्तींच्या प्रश्नावर ती गांगरली, मात्र सुधाजींनी तिला जवळ घेतलं, तिने आपलं नाव वगैरे सांगितलं मात्र आपण कुठे चाललोय याबद्दल तिला फारशी माहिती नसल्याचं लक्षात येताच सुधाजींनी तिला आपल्यासोबतच स्टेशनवर उतरवलं.

बेंगलोरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तिला एका परिचित स्वयंसेवी संस्थेत दाखल केलं. त्यानंतरही सातत्याने त्यांनी संस्थेशी संपर्क साधत, तिनं शिक्षण, आरोग्य याविषयी माहिती ठेवली.

पुढे काळ बदलला, इन्फोसिसचा व्याप वाढला, आणि पाहता पाहता या घटनेला तब्बल बारा वर्ष लोटली.

एका कॉन्फरन्ससाठी सुधा मुर्ती अमेरिकेत गेल्या असताना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या रहात होत्या.

दोन दिवसांचा कार्यक्रम आटपून त्या दुसऱ्या शहरासाठी निघणार असल्याने हॉटेलचं बील चुकते करण्यासाठी त्या काऊंटरपाशी आल्या, तेवढत्या तेथिल कर्मचाऱ्यांनी आदबीने ”तुमचं बील आधीचं भरलं गेलं आहे” असं म्हणत समोरील टेबलवर बसलेल्या दाम्पत्याकडे बोट दाखवलं.

डॉलर्समधील ही प्रचंड रक्कम कोण्या अपचिरित व्यक्तीनं भरली असावी याचा विचार करत सुधाजी टेबलजवळ पोहोचल्या आणि आश्चर्याने ओरडल्याच.

 

sudha im

 

बारा वर्षांपुर्वी मळलेल्या कपड्यातली ‘चित्रा’ आज ऐटीत त्यांच्यासमोर उभी होती. तिला आनंदाने मिठी मारत ”हॉटेलची एवढी मोठी रक्कम का भरली”? असा प्रश्न विचारला.

त्यावर पाणावलेल्या डोळ्याने चित्रा म्हणाली, ”हॉलेटच्या बीलापेक्षा माझ्या आयुष्यचं मोल खूप जास्त आहे. मदत कुणीही करत मात्र योग्य वेळी, आपुलकीने दिलेला हात हा कायम सोबत राहतो. तुम्ही नसता तर आजही ही चित्रा विनातिकीट अशीच वेगवेगळ्या ट्रेन्समधून फिरत राहिली असती”.

तिच्या या उत्तरातच सुधा मुर्ती यांचं मोठेपण दडलं आहे. हे तर केवळ एक उदाहरणं अशा अनेक चित्रांना घडवणाऱ्या सुधा मुर्ती यांना मानाचा मुजरा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?