' कपड्यांच्या दुकानांमधील चेंजिग रूममध्ये कॅमेरा तर नाही ना? अशी करून घ्या खात्री – InMarathi

कपड्यांच्या दुकानांमधील चेंजिग रूममध्ये कॅमेरा तर नाही ना? अशी करून घ्या खात्री

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कपड्यांच्या दुकानात किंवा मॉलमध्ये कपडे खरेदी करायला जायचं तर मग ते कपडे घालून बघून, व्यवस्थित आहेत की नाही, हे पाहणं अगदी साहजिकच! कपडे फिटिंगला अगदी परफेक्ट आहेत की नाही, याच बरोबरीनं आणखी एका गोष्टीचा विचार मनात येऊन जातो, ते म्हणजे या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा तर नसेल ना?

स्त्रिया तर याबाबतीत जरा अधिकच विचार करत असतात, नाही का! जगात काही सगळीच मंडळी चांगली असतात अशातला भाग नाही. कुणी हे असं करायचं ठरवलं आणि छुपा कॅमेरा लावून तुमच्या नकळत शूटिंग करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते समजणार कसं?

या काही टिप्स तुम्हाला अशावेळी नेमकं काय करावं, हे समजून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. आजूबाजूला करडी नजर

चेंजिंग रूममध्ये किंवा हॉटेलच्या खोलीत गेल्यावर आजूबाजूच्या गोष्टींवर एकदा नीट नजर मारा. अगदी छोट्याछोट्या गोष्टी सुद्धा नीट तपासून बघा बरं का मंडळी. खोलीचा इंच नी इंच नीट तपासला, तर लपवून ठेवलेला कॅमेरा मिळणं सोपं जाईल.

दिवे, भिंतीवरील सुशोभीकरणाच्या वस्तू, वायर्स, लाईट्स, अशा गोष्टी अगदी बारकाईनं पाहणं अधिक गरजेचं असतं बरं मंडळी. या सगळ्याची खात्री करून घेतलीत, की मग खुशाल खोलीचा वापर करा.

२. आरशाला बोट लावणं

 

mirrior im

 

बंद खोलीत आरसा असल्यास, त्यात कॅमेरा असण्याची शक्यता अधिक असते. या आरश्यामागे कॅमेरा दडलाय का, हे शोधणं तसं सोपं आहे बरं! आरशाला बोट लावून नीट पाहिलंत, तर आरश्यात काही गौडबंगाल आहे की नाही हे लगेच समजू शकतं.

कुठल्याही साध्या आरशाला बोट लावल्यावर बोट आणि त्याचं प्रतिबिंब यात काहीशी रिकामी जागा असल्याचं दिसेल. मात्र तो आरसा योग्य नसेल किंवा टू-वे मिरर असेल, तर बोटाचं प्रतिबिंब बोटाला चिकटलेलं आहे असं दिसेल.

३. आरशात नीट पाहिलं तर….

चेंजिंग रूम्समध्ये टू-वे मिररचा वापर करणं फार सोपं असतं. एका बाजूने भरपूर प्रकाश आणि दुरसी बाजू अंधारात असण्यासाठी ही उत्तम जागा असते. म्हणून अशा ठिकाणी नीट लक्ष ठेवावं लागतं.

या आरशावर पडणारा उजेड रोखलात, तर हा आरसा टू-वे मिरर आहे की नाही हे शोधणं शक्य आहे. कारण, अशावेळी आपोआपच या आरशातून आरपार दिसू लागेल. हाताने खोलीतील प्रकाश अडवून आरसा नीट तपासून घ्या.

४. वायफायचा असाही उपयोग

 

call im

 

फोनचं इंटरनेट सुरु करा. तुम्हाला इंटरनेट वापरण्यात अडथळा निर्माण झाला, तर समजून जा. की खोलीत वायफायच्या साहाय्याने चालणारा छुपा कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

५. थेट कॉल करायचा

खोलीत छुपा कॅमेरा आहे, अशी शंका वाटली तर त्याच खोलीतून एक कॉल करा. नाही, तक्रार करण्यासाठी मुळीच नाही, तो कॉल नीट कनेक्ट होतोय का, सगळं जमून येतंय का हे बघण्यासाठी. कॉल करताना नेटवर्कचा अडथळा आला, तर त्या खोलीत कॅमेरा असू शकतो.

६. फ्लॅशलाईटचा वाप

चेंजिंग रूममधील लाईट बंद करून फ्लॅशलाईटचा वापर करून सुद्धा आरशामागे कॅमेरा आहे की नाही, ते समजून घेता येतं. लाईट बंद करून आरश्याच्या अगदी जवळून त्यावर फ्लॅशलाईट मारा. त्या लाईटच्या पलीकडचं काही दिसतंय असं वाटलं, तर आरशामागे कॅमेरा दडलेला आहे असं समजून जा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?