' शरीराच्या “त्या” भागावर मारहाण, विनयभंगाचा प्रयत्न : केतकी चितळेचे कोठडीतले भयाण अनुभव! – InMarathi

शरीराच्या “त्या” भागावर मारहाण, विनयभंगाचा प्रयत्न : केतकी चितळेचे कोठडीतले भयाण अनुभव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. एकीकडे काही लोकांनी आनंद साजरा केला तर काही कट्टर कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या बाजूने उभं राहत या सगळ्या प्रकाराचा कठोरपणे विरोध केला.

या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड मीम्स, जोक्स व्हायरल झाले. आपण ते अगदी चवीने वाचले, फॉरवर्ड केले आणि त्यावर आपण मनसोक्त हसलोदेखील. खरंतर हे मीम किंवा विनोद तयार करायलासुद्धा खूप कल्पक बुद्धी लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही मीम्स हे फारच कल्पक आणि हसवणारे असतात आणि ते खिलाडू वृत्तीनेच घ्यायला हवेत, काही मीम्स किंवा जोक्स हे पातळी सोडणारे असतात, अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्याची आवश्यकता असते.

यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक प्रकारचा विनोद सोशल मीडियावर आपण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर व्हायरल झाला तो म्हणजे “महाविकास आघाडीला कंगना आणि केतकी चितळे सारख्या कलाकारांचे शाप लागले!”

 

ketaki and kangana IM

 

या धर्तीवर तर कित्येक  मोठमोठ्या वृत्त वाहिन्यांनी बातम्या केल्या, हेडलाईन्स आल्या. एकंदरच महाविकास आघाडीच्या राज्यात लोकांचा आवाज कसा दडपला गेला हे ते सांगण्यामागचा उद्देश होता. पण अशा प्रकारची मीम किंवा विनोद फार चुकीच्या पद्धतीने समोर आली.

कंगनाने केलेलं वादतीत वक्तव्य तर आपल्याला माहीत आहेच, पण केतकी चितळे या मराठमोळ्या अभिनेत्रीनेसुद्धा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट तिच्या सोशल मीडियावर टाकली. खरंतर ती कविता कुणाची आहे याचा अद्याप पत्ता लागलेला नाही, पण केतकीने ती पोस्ट शेयर केल्याने तिला पुढच्या सगळ्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागलं.

ही पोस्ट व्हायरल झाली आणि अगदी काहीच क्षणात तिला अटकही झाली. यावरून सरकारची तत्परतेवरसुद्धा बऱ्याच लोकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आणि तसं होणं स्वाभाविकच होतं कारण हीच सरकारची तत्परता इतर कुठल्या कामात जनतेला दिसत नव्हती.

नेहमीप्रमाणे केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवरून दोन गट पडले. तिच्या बाजूने बोलणारे आणि तिला विरोध करणारे, काळं फासणारे, तिच्यावर अंडी फेकणारे वगैरे वगैरे. एकंदरच या सगळ्या मुद्द्याला राजकीय वळण लागलं आणि मोठमोठ्या नेत्यांपासून छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापर्यन्त प्रत्येकाने यात स्वतःची पोळी भाजून घेतली.

 

ketaki chitale 2 IM

 

केतकीवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून १५ मे ला तिला अटक करण्यात आली आणि ३१ मे रोजी तिला न्यायालयीन कोठवडी ठोठावण्यात आली. अखेर २२ जून रोजी तिला जामीन मिळाला खरा पण तब्बल ४१ दिवस तिला जेलची हवा खावी लागली.

या सगळ्या प्रकाराबाबत आणि एकंदर कोठडीतल्या त्या दिवसांबद्दल केतकीने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. केतकीच्या मते तीची यात काहीही चूक नसून केवळ एक पोस्ट कॉपी पेस्ट केल्याने तिच्यावर ही कारवाई केली गेली आहे असं तीचं म्हणणं आहे आणि या सगळ्यालादेखील तीने गुन्हा असल्याचं स्पष्ट केलंय.

तिला झालेली अटक, कारवाई , सुनावणी या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर होत्या असा दावा तीने केला आहे. शिवाय तिला कोणतीही नोटिस दिली गेली नव्हती अगदी अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी तिला घरी जाऊन अटक केली असंही तीने या मुलाखतीत सांगितलं आहे.

या सगळ्यामुळे तिला मनस्ताप तर झालाच आहे पण एक कलाकार म्हणून तीचं करियर आता संपलं आहे, कारण तिच्यावर गुन्हेगार म्हणून ठपका बसला आहे असंही तीचं म्हणणं आहे. आत्ता जरी तिला जामीन मिळाला असला तरी भविष्यात पुन्हा तिला अटक होऊ शकते अशीही शक्यता तीने वर्तवली आहे.

इतकंच नाही कोठडीत तिला मारहाण झाल्याचेसुद्धा उघड केले आहे. कानाखाली मारणं किंवा डोक्यावर मारणं इथपासून ते अगदी तिच्या उजव्या ब्रेस्टवरसुद्धा काही महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली असल्याचा तीने आरोप केला आहे.

पोलिसांच्या गाडीत चढतानासुद्धा तिला मुद्दाम पाडण्यात आलं, तिची साडी खेचण्यात आली, एकप्रकारे तिचा विनयभंगच करण्यात, तरी लोकं तिथे तिच्यावर अंडी आणि शाई फेकत होते असंही केतकीने या मुलाखतीत सांगितलं आहे.

 

ketaki chitale 3 IM

 

हे सगळं पोलिस चौकीच्या आवारातच घडल्याने केतकीला आणखीन धक्का बसला आहे. तिच्यावर तब्बल २२ केसेस दाखल केल्या आहेत त्यामुळे भविष्यात तिला कधीही अटक होऊ शकते असं म्हणत स्वतःच्या मानेवर असलेल्या लटकत्या तलवारीबरोबरच जगायचं आहे असंही म्हंटलं आहे.

केतकी जे वागली ये अयोग्यच होतं, एका ज्येष्ठ व्यक्तिबद्दल किंवा त्यांच्या व्यंगाबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी करणं चुकीचं आहेच.

ती पोस्ट केतकीने फक्त शेयर जरी केली असली तरी एक पब्लिक फिगर म्हणून तीचं हे कृत्य निंदनीयच आहे. पण कोठडीत तिच्या सोबत जे घडलं किंवा पोलिस चौकीच्या आवारात जे काही घडलं त्यावरदेखील प्रश्नचिन्ह उभं राहतंच!

 

sharad pawar 2 IM

 

केतकीच्या बाबतीत जितक्या तत्परतेने निर्णय घेतले गेले, आणि निकाल लागला तीच तत्परता महिलांवर होणाऱ्या इतर अत्याचारांच्या बाबतीतही दिसली तर बरं होईल असाच एकंदर सुर सध्या सोशल मिडियावर ऐकायला मिळतोय. सरकार जरी बदललं असलं तरी त्यांनी या प्रकाराकडे तितक्याच गांभीर्याने बघायला हवं हेदेखील तितकंच खरं!

केतकीचं पुढे काय होणार, तिला पुन्हा अटक होणार का तीची यातून सुटका होणार हे येणारा काळच ठरवेल. पण या घटनेनंतर सामान्य माणसांपासून सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकानेच सोशल मीडियाचा वापर जपून करायला हवा हा धडा सगळ्यांनाच मिळाला आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?