' कालीमातेचा घृणास्पद अपमान! हिंदूंच्या भावना भडकवणाऱ्या नीच पोस्टरवरून वाद! – InMarathi

कालीमातेचा घृणास्पद अपमान! हिंदूंच्या भावना भडकवणाऱ्या नीच पोस्टरवरून वाद!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपट, बेवसिरीज आणि डॉक्युमेंट्री यांच्यात चढाओढ लागली असताना, काही दिग्दर्शक, कलाकार यांच्या वादग्रस्त कृतींमुळे प्रेक्षकांच्या मुठी आवळल्या जात आहेत. लोकशाही किंवा फ्रिडमच्या नावावर सुरु असलेल्या मनामानी कारभाराचं आणखी एक नवं, लाजिरवाणं कृत्य समोर आलं आणि सोशल मिडीयात वादाची नवी ठिणगी पडली.

भारतीय दिग्दर्शिका लीना मणिमेकलई हिच्या ‘काली’ या डॉक्युमेंट्री पोस्टरमध्ये चक्क सिगरेट ओढणाऱ्या कालीमातेचं दृश्य बघून ”दिग्दर्शकांचं डोकं ठिकाणावर आहे का?” असा सवाल विचारला जात आहे.

फिल्म सर्टिफिकेशन बोर्डाने शिथील केलेली बंधनं, ओटीटी प्लॅटफॉर्मला नसलेली नियमांची चौकट यामुळे सध्या दिग्दर्शक, निर्माते यांचं बेलगामी वागणं कलाकृतींच्या रुपात समोर येत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणारे चित्रपट, वेब सिरीज, डॉक्युमेट्री यांमधील अश्लिलता, व्यसनाधिनता यांचा अतिरेक होत असताना आता पुन्हा एकदा हिंदू देवतांचा अपमान करण्याचा चंगच जणूकाही बॉलिवूडकरांनी बांधलाय.

 

Bold scene chorographer IM

 

यापुर्वीही तांडव सारख्या सिरीजमध्ये हिंदू देवतांना बदनाम करण्याचं धाडस काही दिग्दर्शकांनी केलं होतं. मात्र आता थेट देशवासीयांचं श्रद्धास्थान असलेल्या कालीमातेबाबत विचित्र कृत्य करण्याचा प्रताप दिग्दर्शिका लीना मणिमेकलई यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

दिग्दर्शिका लीना मणिमेकलई यांनी नुकतंच आपल्या नव्या डॉक्युमेट्रीची घोषणा केली. गेले अनेक दिवस आपण या प्रॉजेक्टवर काम करत असून अखेर प्रतिक्षा संपली आहे असं म्हणत त्यांनी ‘काली’ या नव्या डॉक्युमेट्रीचे पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केलं.

रिदम ऑफ कॅनडा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.

मात्र हे पोस्टर पाहून कोणत्याही सुसंस्कृत, सभ्य माणसाला संताप आला नाही तरच नवल! कारण या पोस्टरमध्ये चक्क कालीमातेचा वेष परिधान केलेल्या अभिनेत्रीच्या हातात सिगरेट दाखवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर कालीमातेची भुमिका करणारी अभिनेत्री सिगरेट ओढताना दाखवली आहे.

 

kaali im

 

हे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सोशल मिडीयावर वादाची ठिणगी पेटली.

हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या लीना यांना नेटकऱ्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. हिंदू देवतांना अशा घृणास्पद पद्धतीने पडद्यावर दाखवण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं मत नेटकरी व्यक्त करत आहेत.

इतकंच नव्हे तर अशा पद्धतीचं धाडस करणाऱ्या लीना यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा तसंच काली ही डॉक्युमेट्री प्रदर्शित होवू नये, अशी मागणी केली जात आहे.

#bankaali हा हॅशटॅग ट्रेन्ड होत असून नेटकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

 

kaali poster im

 

अनेकांनी तर गृहमंत्री अमित शहा यांना ट्विट करत याप्रकरणाची माहिती दिली. देशात राहून हिंदू देवतांचा असा अपमान करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्या कलाकारांना वटणीवर आणणं गरजेचं आहे, असं म्हणत अनेकांनी थेट केंद्र सरकारचा दरवाजा ठोठवला आहे.

काली ही डॉक्युमेट्री नेमकी कोणत्या विषयावर आहे? त्यामध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आहे का? याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र एकाच पोस्टरमुळे एवढा वाद निर्माण झाला असताना अशा परिस्थितीत संपूर्ण वादग्रस्त डॉक्युमेट्री प्रदर्शित झाली तर किती गदारोळ होईल याची कल्पनाही करता येणार नाही.

अर्थात डॉक्युमेट्रीचा विषय काहीही असो, हिंदू देवतांना अशा घृणास्पद पद्धतीने दाखवणं, हिंदू देवतांच्या हाती सिगरेट, दारू यांसारखे आमली पदार्थ दाखवून त्यांचं समर्थन करणं ही बाब नक्कीच योग्य नाही.

आता लीना यांच्यावर कारवाई होणार का? हे पोस्टर हटवलं जाणार का? डॉक्युमेट्रीच्या प्रदर्शनावरच आक्षेप घेतला जाईल का? याची उत्तरं येत्या काही काळात मिळतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?