' गृहिणींसाठी अत्यंत फायद्याचं! हे १५ कोर्सेस तुम्हाला घरबसल्या भरघोस उत्पन्न मिळवून देतील!

गृहिणींसाठी अत्यंत फायद्याचं! हे १५ कोर्सेस तुम्हाला घरबसल्या भरघोस उत्पन्न मिळवून देतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एक काळ असा होता, की नवऱ्याने नोकरी करावी, जी काही कमाई असेल त्यात घरच्या स्त्रीने प्रपंच चालवावा. पण महागाई, मुलांची शिक्षणं, लग्नकार्य इतर व्यवहार यात ती कमाई खुपदा तुटपुंजी ठरायची. मग या महिला कोंड्याचा मांडा करून निगुतीने संसार करायच्या.

कुणी शिलाईकाम करायच्या, मुलांचे क्लासेस घ्यायच्या, डबे बनवून द्यायच्या. लोणची करून दे, पापड करून दे अशी छोटी छोटी कामे करायच्या. एकतर त्यावेळी मुलींचे शिक्षण अगदी मर्यादित होते. त्यामुळे खूपजणी गृहिणी असण्यातच खुश असायच्या.

आता मुली खूप शिकतात. नोकऱ्या करतात. पण अजूनही काही जणींना घरातून बाहेर पडायची मुभा नसते, किंवा नोकरी करायला आवडत नाही पण अर्थार्जन करायचं आहे.. अशा महिलांनी हा लेख नक्की वाचावा.

हा बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, मला घरातून काहीतरी करायचं आहे. कधी मूल लहान आहे म्हणून, कधी घरात वयोवृद्ध लोक आहेत म्हणून काही महिलांना घरातून बाहेर पडता येत नाही, पण त्याच्यासाठी खूप काही घरातून काम करून अर्थार्जन करून देणारे उद्योग आहेत.

त्यासाठी सर्टिफिकेट आवश्यक आहे. असे काहे कोर्सेस करून तुम्ही सर्टिफाईड व्यावसायिक बनू शकता. आज असे काही कोर्सेस आपण पाहूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१) इंटेरियर डिझाईनर-

गृहसजावट हा बहुतेक स्त्रियांचा आवडीचा उद्योग असतो. आणि काही जणींना तर देवदत्त देणगी असते नवनवे डिझाईन बनवता येण्याची. पण या साऱ्याला एक व्यावसायिक रुप देतो तो इंटेरियर डिझाईनर हा मान्यताप्राप्त कोर्स.

सुरुवातीला फ्री ऑनलाईन इंटेरियर डिझाईनिंग कोर्सची माहिती करून घेऊ शकता. नंतर एखाद्या खाजगी किंवा सरकारी कॉलेजमध्ये पण हा कोर्स करू शकता. यासाठी photoshop launch, interior design basic, free home decor class अशा वेबसाईटवर माहिती मिळवू शकता. या कोर्ससाठी ४००० ते ५००० इतका खर्च येतो.

२) ऑनलाईन टीचिंग कोर्स

 

Online Classes fallout InMarathi

 

तुम्हाला लहान मुलांना शिकवायला आवडतं का? जर हो तर तुम्ही हा कोर्स करू शकता.समजा तुम्ही बी.एड. किंवा डी.एड. केलेलं नाही तर हा डिप्लोमा करून सर्टिफिकेट मिळवू शकता.

या कोर्सचा उपयोग होऊन तुमच्यात शिकवण्याची जी कला आहे तिला अजून चांगला मुलामा मिळेल. आजकाल तर ऑनलाईन शिक्षक पण लागतात. जगात ज्या माणसाची काम करायची हातोटी उत्तम असते त्या माणसाला कोणतेही काम अशक्य नसते.

३) मेकअप आणि हेअर स्टायलिंग कोर्स-

नट्टापट्टा हे प्रत्येक स्त्रीचं आवडतं काम. एखादीला तर त्यात प्रचंड रुची असते. आजकाल तर ब्युटीपार्लर किती जोरात चलतात बघा. तिने या मेकअप आणि केशरचना शिकवणारा एखादा कोर्स केला तर पुढे ती आपले ब्युटी पार्लर पण सुरु करू शकते.

४) मेहंदी -रांगोळी

 

mehndi suger 1 inmarathi

 

आजकाल एकंदर प्रेझेंटेबल राहण्याकडे सर्वांचा कल असतो. छोटे छोटे कार्यक्रम पण फार हौसेने केले जातात. विवाह, मुंज डोहाळेजेवण अशा प्रसंगी हातावर कलात्मकरित्या काढलेली मेहंदी, अंगणात घातलेली गालीचा रांगोळी हे सारे घरातील लोकांना शक्य नसते, तेव्हा अशी मेहंदी काढणारी, मोठ्या मोठ्या रांगोळ्या घालणारी माणसे लागतातच. असा एखादा कोर्स करून तुम्ही तुमच्या सवडीने अशा कार्यक्रमासाठी तुमचं कौशल्य वापरून अर्थप्राप्ती करू शकता.

५) कन्टेन्ट रायटिंग-

तुम्ही चांगलं लिहू शकता? तुम्ही नव्या कल्पना मांडू शकता?तुमची कल्पनाशक्ती उत्तम आहे? कमी शब्दात आशयपूर्ण लिहिता येतं? तुमचं भाषेवर प्रेम आहे? मग हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. आजकाल जाहिराती तयार करणे, ब्लॉग लिहिणे ही कामे सर्रास चांगला पैसा मिळवून देणारी आहेत, पण त्यासाठी पण कोर्स करणे आवश्यक आहे.

कितीतरी ऑनलाईन कार्यशाळा मधून हा विषय शिकवला जातो. असे डिप्लोमा करून तुम्ही मान्यताप्राप्त म्हणजे सर्टिफाईड कंटेंट रायटर बनू शकता. या कोर्सचे वेगवेगळे शुल्क असते. ३००० ते ४००० मध्ये हा कोर्स तुम्ही करू शकता.

६) योग वर्ग-

 

woman yoga inmarathi

 

या धकाधकीच्या आयुष्यात आजकाल लोक खूप जागरूक झाले आहेत. योग प्राणायाम या गोष्टी आजकाल परत एकदा लोकांच्या आयुष्याचा एक भाग झाल्या आहेत.

हा योग शिकवण्याचा डिप्लोमा करून तुम्ही योग प्रशिक्षक म्हणून काम करू शकता. या कोर्स साठी १५००० पर्यंत शुल्क असते.

७) डिजिटल मार्केटिंग-

हे युग जाहिरातीचे आहे, पण इंटरनेटमुळे बहुतांश गोष्टी या ऑनलाईन झाल्या आहेत.एखाद्या कंपनीचे प्रोफाईल तयार करणे, त्याची विविध ग्रूपमध्ये जाहिरात करणे, लोकांपर्यंत त्याची माहिती पोचवणे हे सारे डिजिटल मार्केटिंग मध्ये येते.

हे काम तुम्ही कुणाच्याही ऑफिसला न जाता घरातून करू शकता. त्यासाठी विविध कोर्स आहेत त्यातील कोर्स तुम्हाला या कामाची नीट माहिती देऊ शकतो.

८) फॅशन डिझाईनर-

कपडे शिवायची आवड असेल, त्यातही कल्पकतेने सुंदरता आणू शकत असाल तर हा कोर्स नक्की करा. त्यामुळे तुमच्या शिवणकामाला तंत्रशुद्ध जोड मिळेल आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या कामात पारंगत व्हाल. यातही फॅशन को-ऑर्डीनेटर, फॅशन कन्सलटंट असे हटके काम करू शकता.

९) नर्सरी-

 

startup im

 

तुम्हाला झाडे लावायची त्यांचे संगोपन करायची आवड असेल तर हाही एक वेगळा पर्याय ठरू शकतो. तुमच्याकडे जागा असेल आणि तुम्ही इच्छुक असाल तर याचेही प्रशिक्षण घेऊन तुम्ही हा रोपवाटिकेचा व्यवसाय सुरु करू शकता.

१०) पेंटिंग क्राफ्टींग-

पेंटिंग, क्राफ्टींग यांचे छंदवर्ग घेऊन तुम्ही त्यातून पैसे मिळवू शकता. तसेच पेंटिंग्ज तयार करून देणे, क्राफ्टींगच्या वस्तू तयार करून विकणे यातूनही पैसा मिळू शकतो.

विणकाम, भरतकाम अशा विविध कला तुम्हाला येत असतील तर त्यातून तुम्ही पैसे मिळवू शकता. त्याचेही ऑनलाईन कोर्सेस असतात. ते करून तुम्ही तुमच्या छंदातून पैसे मिळवू शकता.

११) कुकिंग क्लासेस-

 

cooking inmarathi

 

तुम्ही पदार्थ उत्तम करू शकत असाल तर त्याचेही क्लासेस घेऊ शकता. वेगवेगळे पारंपारिक, पाश्च्यात्य, चाट शाकाहारी, मांसाहारी अशा खूप पदार्थांची हातोटी तुम्हाला साधत असेल तर हा ही धनार्जन करून देणारा मार्ग आहे.

१२) फॅशन ज्वेलरी तयार करणे-

नव्या नव्या फॅशनचे दागिने तयार करायचे ऑनलाईन कोर्सेस आहेत. त्यावरून तुम्ही शिकून घरातून अशी फॅशन ज्वेलरी तयार करून विकू शकता.

१३) वैयक्तिक आहार प्रशिक्षक-

आहारशास्त्राचा अभ्यास करून तुम्ही घरातून लोकांचा डाएट चार्ट सांभाळू शकता.

१४) अनुवादक-

एकापेक्षा अनेक भाषा शिकून तुम्ही अनुवादक म्हणून घरातून काम करू शकता.

१५) ट्रान्सक्रिप्शन-

हे काम पण शिकून तुम्ही घरातून करू शकता. त्याचेही कोर्सेस असतात. व्हॉईस नोट वरून त्याचे टायपिंग करून देणे म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. हे बहुतांश परदेशी भाषेतच असते. पण त्याचेही कोर्स आहेत.

इच्छा तिथे मार्ग. तुम्हाला काम करायची इच्छा असेल, तर असे विविध पर्याय समोर येतात. मग आता विचार करण्यात वेळ घालवू नका. तुमच्या आवडीचा, योग्यतेचा कोर्स करा आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?