' दत्तक मातापित्यांच्या जीवाला धोका ठरलेली – अशीही “गोंडस” चिमुरडी! – InMarathi

दत्तक मातापित्यांच्या जीवाला धोका ठरलेली – अशीही “गोंडस” चिमुरडी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या घरात लाडाकोडात असणारी, वावरणारी चिमुरडी मुलगी प्रत्यक्षात लहान मुलगी नसून विशीतली तरूणी आहे असं कळलं तर? विश्र्वास नाही बसत ना? पण एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना एका अमेरिकन दांपत्याच्या बाबतीत घडली आहे.

या दांपत्यांनं दत्तक घेतलेली चिमुरडी नतालिया ही वास्तवात सहा वर्षाची बालिका नसून विशितलि तरूणी आहे हे अचानक या दांपत्याच्या लक्षात आलं आणि…

काही वर्षांपूर्वी एक हॉरर चित्रपट आलेला होता, ‘ऑर्फ़न’. या चित्रपटात एक अमेरिकन दांपत्य एका छोट्या रशियन अनाथ मुलीला दत्तक घेतं आणि मोठ्या लाडानं तिला घरी येऊन येतं. नंतर या दांपत्याच्या लक्षात येतं की ही मुलगी जशी दिसते तशी नसून वास्तवात ती सहा वर्षांची लहान मुलगीही नाही.

 

orphan movie IM

 

ही मुलगी वास्तवात तिशीतली स्त्री असते जी लहान मुलीसारखी दिसत असते. ही मुलगी आपल्या दत्तक आईवडिलांना इतकी छळते की यातचअंत होतो. एखाद्या हॉररपटाची कथा म्हणून ही घटना ठीक आहे मात्र जेव्हा हे वास्तवात घडतं तेव्हा कल्पनेपेक्षाहि वास्तव विचित्र असल्याची खात्री पटते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी या चित्रपटात दाखविलं आहे तसंच एका अमेरिकन दांपत्याच्याबाबतीत घडलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमेरिकेतील एका जोडप्यानं युक्रेनमधील एका सहा वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर या दांपत्यानं दावा केला की प्रत्यक्षात ही सहा वर्षांची मुलगी नसून विशीतली स्त्री आहे आणि त्यांच्या जिवाला या मुलीकडून धोका आहे. हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं की, अखेरीस हे दोघे या मुलीला सोडून पळून गेले.

अजूनही हे प्रकरण कोर्टात असून ही केस चालू आहे. नेमकं प्रकरण काय घडलं याबाबत अजूनही संधिग्दता आहे. कोणाला नतालिया बरोबर वाटते तर कोणाला तिला दत्तक घेणारं बार्नेट हे जोडपं.

२०१० साली अमेरिकेतील क्रिस्टीन आणि मायकल बार्नेट या जोडप्यानं एक मुलगी दत्तक घेतली. याच मुलीचं नाव नतालिया. या जोडप्याला तीन मुलगे होते मात्र मुलीची आवडल्यानं त्यांनी एक मुलगी दत्तक घेण्याचं ठरविलं. यानुसार त्यांनी शोध चालू केला आणि मुळच्या युक्रेनच्या असणार्‍या या मुलीला त्यांनी दत्तक घेतलं.

 

natalia IM

 

सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करताना कागदपत्रांनुसार नतालियाचं वय होतं, सहा वर्षं. नतालिया बार्नेट दांपत्यानं घरी आणल्यावर त्यांना तिच्या वर्तनाबाबत शंका येऊ लागली. आधीच तीन मुलांना वाढविलेल्या बार्नेट दांपत्यालासहा वर्षाचं मूल कसं वागतं याची कल्पना होती आणि नतालियाचं वागणं याच्याशी मेळ खाणारं नव्हतं. मुळात तिचं वागणं लहान मुलीसारखं नव्हतं. तिच्या वयाच्या मुलांपेक्षा नतालियाची समज जास्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी जरा बारकाईनं निरिक्षण चालु केलं.

लहान मुली खेळतात ते खेळ, खेळणी तिला आवडत नसत. मोठ्या मुलीत खेळायला, त्यांच्याशी बोलायला तिला आवडत असे. हळूहळू क्रिस्टिनच्या लक्षात आलं की नतालियाचं शरीरही सहा वर्षाच्या मुलीसारखं नसून एखाद्या किशोरवयीन मुलीसारखं आहे.

क्रिस्टिनला आणखिन मोठा धक्का तेंव्हा बसला जेंव्हा तिच्या लक्षात आलं की नतालियाला मासिक पाळीदेखिल येते. उंची सहा वर्षाच्या मुलीची आणि बाकी शरीराची वाढ मात्र प्रौढ महिलेची असल्याचं तिच्या लक्शात आलं.

नतालियाला बुटकेपणाचा आजार होत हे या दांपत्याला माहित होतं मात्र, असा आजार असणार्‍यांची उंचिही अगदी इंचा इंचानं का होईना वाढते. नतालियाची उंची मात्र इंचभरही वाढत नव्हती.

हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला दत्तक घेतल्यानंतर दोन वर्षांनी हे दांपत्य कोर्टात गेलं आणि सर्व प्रकार सांगून नतालियाचं जन्म वर्षं बदण्याची मागणी केली. कोर्टानं ही मागणी मंजूर करत तिचं जन्मवर्ष बदलून २००३ वरुन १९८९ केलं.

 

natalia 3 IM

 

या सुनावणी दरम्यानच नतालियाच्या हाडांची चाचणी केली असता असं लक्षात आलं की दत्तक घेताना तिचं वय सहा नसून सोळा होतं. यानंतर नतालियाला मानसोपचार केंद्रात पाठविण्यात आलं, याठिकाणीही तिनं डॉक्टरना आपण दिसतो त्या वयापेक्षा खूप मोठं असल्याचं सांगितलं.२०१३ साली नतालिया या केंद्रातून बाहेर आली आणि बार्नेट दांपत्यानं इथून पुढे तिला न सांभाळण्याचा निर्णय घेतला.

या दांपत्याने इंडियाना राज्यात एक घर भाड्यानं घेतलं, संपूर्ण वर्षाचं भाडं अगाऊ भरलं सर्व सामान सुमान भरून या घरात नतालियाला ठेवलं आणि ते हे घर सोडून कॅनडाला निघून गेले. या घरात नतालिया संपूर्ण वर्ष एकटीच राहिली. २०१४ साली पोलिसांना या एकट्या रहाणार्‍या मुलीची खबर लागली.

अनेक वर्षं त्रास सहन केल्यानंतर २०१९ साली ती पहिल्यांदाच जगासमोर आली आणि तिनं तिची बाजू मांडली. तिनं आपल्या मुलाखतीत सांगितलं की, ती सहा वर्षांची असताना अमेरिकेत आली. त्यानंतर ती अनेक कुटुंबात राहिली मात्र तिला कायमचं कुणीही दत्तक घेतलं नाही.

२०१० साली मात्र बार्नेट कुटुंबानं तिला दत्तक घेतलं आणि घरी घेऊन गेले. तिला बुटकेपणाचा आजार असल्यानं पूर्वी तिला कोणीही कायमचं दत्तक घेतलं नव्हतं मात्र या नव्या कुटुंबाने तिला स्विकारलं होतं. या कुटुंबात आल्यावर नतालियाला आपलेपणा जाणवू लागला.

मात्र या कुटुंबानंही त्यांच्या जिवाला नतालियापासून धोका असल्याच्या कारणावरुन तिला दूर लोटलं. यानंतर वर्षभर हवाबंद डब्यातलं अन्न खाऊन नतालियानं दिवस काढले. त्यानंतर ॲण्टोन आणि सिंथिया मान्स या दांपत्यानं तिला दत्तक घेऊन आपल्या घरी नेलं. आजपर्यंत ती त्यांच्याच घरी रहाते आणि आता ती आनंदात आहे.

 

natalia 4 IM

 

मान्स कुटुंबियांनी सांगितलं की आधीच्या कुटुंबाने दावा केल्याप्रमाणे नतालियाकडून त्यांना काही धोका आहे अशी परिस्थिती अजिबात नाही. बार्नेट दांपत्याच्या घटस्फ़ोट झालेला असून दत्तक घेतलेल्या लहान मुलीची हेळसांड केल्याचा त्यांच्यावर दावा सुरू आहे.

या केसचा अद्याप निकाल लागलेला नसल्यानं नतालियाच्या वयासंबंधिची कागदपत्रं सील करण्यात आलेली आहेत. त्यामुळे नतालियाचं आजच्या घडीला नेमकं वय किती? हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?