' आजारपणात बळजबरी, मध्यरात्री बाळासह घराबाहेर...एकटी अभिनेत्री काय काय सहन करत होती!

आजारपणात बळजबरी, मध्यरात्री बाळासह घराबाहेर…एकटी अभिनेत्री काय काय सहन करत होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शोषण होणारी स्त्री ही सामान्य वर्गातली असते हा समज खोटा ठरविणार्‍या घटना सातत्यानं घडत असतात. ही प्रकरणं कास्टिंग काऊच असो अथवा मी टू चळवळीतून अधूनमधून आपल्या समोर आलेलीच आहेत.

लग्नानंतर पतीकडून झालेल्या छाळाच्या घटना पाहिल्या तर थक्क व्हायला होईल. छोट्या पडद्यावरची बबली गर्ल चाहत खन्नाही अशाच एका टॉक्सिक नात्याचा अंत करुन पुन्हा उभी राहिलीय. तिची कहाणी वाचाल तर अंगावर शहारे येतील.

साधारण दहा बारा वर्षांपूर्वी राम कपूर आणि साक्षी तन्वरच्या बडे अच्छे लगते है या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या मालिकेत प्रिया म्हणजे साक्षी तन्वरच्या बहिणीच्या रोलमधे एक गोड मुलगी दिसली. चाहत खन्ना असं नाव असलेली ही गोड चेहर्‍याची मुलगी सहय्यक भूमिकेत असूनही नजरेत भरली आणि प्रेक्षकांनी तिची भूमिकाही पसंत केली.

 

chahat khanna im

 

खरंतर लीड रोल करण्यासारखा चेहरा असूनही चाहत नेहमी दुय्यम भूमिकेतच दिसली. अशातच तिच्या लग्नाच्या बातम्या आल्या आणि तिनं इंडस्ट्रीला निरोप दिल्याच्या बातम्याही. मात्र हे लग्न फार टिकू शकलं नाही.

पुन्हा एकदा चाहत कामावर रुजू झाली आणि अल्पावधीतच तिला जोडीदार मिळाला. फरहान मिर्झासोबतचा तिचा संसार सुरळीत सुरू झाला. या जोडप्याला दोन गोंडस मुलीही झाल्या आणि पुन्हा एकदा चाहतच्या संसारात सब कुछ ठीकठाक नसल्याचा बातम्या उडत उडत येऊ लागल्या.

 

chahat im

 

एक दिवस गॉसिप मॅगझिन्सनी चाहत तिच्या दोन मुलींना घेऊन वडिलांकडे रहायला गेल्याचं आणि पतीला मुलींना भेटून देत नसल्याचं प्रसिद्ध झालं. फरहाननं ही तक्रार केली होती. रातोरात चाहत खलनायिका बनली. हे वाद वाढतच गेले आणि अखेरीस घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं.

प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर इतके महिने गप्प बसलेल्या चाहत अखेर मौन सोडलं आणि तिच्यावरची आपबिती जगासमोर मांडली.

संशयाचं भूत

फरहान टोकाचा संशयी होता आणि हाच मुद्दा त्यांच्यातल्या कुरबुरीला कारण ठरला. चाहतचं दुसर्‍या कोणासोबत तरी अफेयर आहे या संशयानं तो सतत पछाडलेला असायचा. इतका की, चाहत एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातानाही तो सतत तिच्या मागोमाग असायचा.

ती कोणाला फोन करते, कोणाला भेटते, कोणाशी बोलते या सगळ्याचे बारीकसारीक तपशील त्याला हवे असत.

सुरवातीला चाहतनं दूर्लक्ष केलं मात्र लवकरच याचं गांभिर्य तिच्या लक्षात आलं. कहर तर तेंव्हा झाला जेंव्हा फरहान ती काम करत असलेल्या ‘कबूल है’ च्या सेटवर आला. त्या दिवशी तिच्या सीनमधे तिला सहकलाकाराला मिठी मारायची होती. मात्र हा सिन चित्रीत होताना फरहान अस्वस्थ झाला आणि त्यानं सेटवरच दंगा, गोंधळ घालायला सुरवात केली.

 

chahat 1 im

 

याच सहकलाकारासोबत तिचं अफेयर असल्याचा त्याला संशय येऊ लागला. या सहकलाकारानं घेतलेल्या घराच्या हाऊसवार्मिंग पार्टीतही त्यानं गोंधळ घातला.

आता चाहतला हे सर्व लज्जास्पद वाटायला लागलं होतं. बाहेर तिच्या या नात्याची, या प्रकरणांची चर्चा होऊ लागली होती. फरहानला मात्र कशाचाच काहीच फरक पडत नव्हता.

बाळासह हाकललं

इतकं सगळं होऊनही चाहत तिचं हे लग्न टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.

दुसरी मुलगी झाल्यानंतर अवघे काही महिने झालेले असतानाच फरहानचं डोकं फिरलं, पुन्हा तोच संशय आणि तीच मारहाण! एक दिवस तर त्यानं कहर केला, दुपट्यातल्या बाळासहित चाहतला त्यानं मध्यरात्री घराबाहेर काढलं.

 

baby im

 

या अपमानास्पद वागण्यानंतर चाहतनं त्याच्यापासून अंतर राखायला सुरवात केली. नंतर त्याला पश्चात्ताप झाल्याचं त्यानं सांगून तिला परत आणलं. पुन्हा काही महिने सुरळीत गेल्यावर तोच जुना त्रास चालू झाला.

आजारपणातही शरीरसंबंध

एकदा चाहतला स्तनात घट्टपणा जाणवू लागल्यानं तिनं फरहानला विनंती केली आपण डॉक्टरकडे जाऊया. उपचार सुरु झाले, मात्र काही दिवसांनी पुन्हा त्याच वेदनांनी डोकं वर काढलं.

पुन्हा डॉक्टरांकडे जाण्याच्या तिच्या मागणीकडे तर फरहानने सरळ डोळेझाक केली. उलट तिच्या इच्च्छेविरुध्द, ती वेदना सहन करत असतानाही तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.

 

Holding Hands InMarathi

 

या घटनेनंतर मात्र चाहतच निर्णय पक्का झाला, हा स्वभाव नसून फरहानमध्ये मानसिक विकृती असल्याची तिची खात्री पटली, बायकोच्या पैशावर लक्ष ठेवून असलेला संशयी नवरा कोणत्या पत्नीला हवा असेल? दोन्ही मुलींना घेऊन तिनं ताबडतोब घर सोडलं.

फरहाननं नंतर मिडीयात ”चाहत मुलींना घेऊन त्याला न सांगताच घर सोडून गेल्याच्या, त्याला मुलींना भेटू देत नसल्याच्या” बतावण्या केल्या. काहीकाळ या अशा प्रकारच्या बातम्यांमुळे चाहत मिडियामधील बातम्यांमुळे खलनायिका बनली. मात्र कुटुंबाच्या आधारामुळे ती यातून सावरली.

मागे न फिरता कायदेशीररित्या विभक्त होत तिनं या छळातून सुटका करुन घेतली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?