' ग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी!

ग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या ऑनलाईन शॉपिंग सर्वांच्या जिव्हाळ्याचे झाले आहे.

एवढेच काय तर एखादी वस्तू मार्केटमध्ये खूप महाग मिळत असेल ती ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर कमी किंमतीला उपलब्ध असते.

कोणत्याही त्रासाविना घरबसल्या करता येणाऱ्या या क्रांतिकारी ऑनलाईन शॉपिंगने आधुनिक पिढीला भलतेच वेड लावले आहे.

खरेदी शिवाय विजेचे किंवा इतर बिल भरणे, पैसे पाठवणे, कोणतीही गोष्ट बुक करणे या ही सर्व कामे देखील ऑनलाईन करता येतात.

 

cashback-marathipizza01
rechargeoverload.com

 

तर अश्या या गोष्टी ऑनलाईन करत असताना तुमच्या एक गोष्ट निदर्शनास आली असेल की, या ऑनलाईन वेबसाईट्स भरपूर कॅशबॅक देतात.

म्हणजेच १०० रुपयांची वस्तू असेल आणि त्याचा तुम्ही व्यवहार केलात तर तुम्हाला १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत रक्कम परत मिळते. म्हणजे यात ग्राहकाचा फायदा आहे.

पण कधी विचार केलाय का, या कंपन्यांना ग्राहकांना कॅशबॅक देणं, वा कमी किंमतीमध्ये भारी सूट देऊन वस्तू विक्री करणं कसं काय परवडतं?

आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो, मात्र त्याचे नेमके उत्तर काही मिळत नाही, आणि आपल्याला मिळालेल्या कॅशबॅकच्या आनंदात आपण त्याचे उत्तर शोधणेही विसरून जातो.

चला आज या प्रश्नामागचं अर्थकारण जाणून घेऊया.

येथे उदाहरण म्हणून आपण पेटीएम कंपनीकडे पाहू.

ते दिवस आठवा जेव्हा आपल्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन नव्हते आणि आपण एका मोबाईल स्टोर मधून रिचार्ज करायचो तेव्हा दुकानदार फ्री मध्ये रिचार्ज करत नसत.

ते प्रत्येक रिचार्जवर अधिक रक्कम म्हणून स्वत:चे कमिशन घेत असत. या दुकानदारांना टेलीकॉम कंपनीकडून सुद्धा प्रत्येक रिचार्जवर कमीतकमी २ टक्के आणि जास्तीत जास्त ५ टक्के कमिशन मिळते.

तसेच काहीसे पेटीएम सारख्या कंपन्यांचे आहे. त्यांना सुद्धा प्रत्येक रिचार्जमागे टेलीकॉम कंपन्यांकडून २ ते ५ टक्के कमिशन मिळते. परंतु यामधील १ ते १.८ टक्के एवढी रक्कम गेटवेच्या खात्यात जाते.

रिजर्व बँकेने दिलेला डेबिट कार्डवरील गेटवे चार्ज हा १.८ टक्क्यांपेक्षा कमी असतो. सामान्यत: तो फक्त १ टक्केच असतो.

म्हणजेच पहायला गेलं तर, प्रत्येक रिचार्ज मागे पेटीएमला ०.५ – १% एवढेच पैसे मिळतात आणि हि कमाई रिचार्ज साईट्सना ग्राहकाने रिचार्ज केल्यावर होते, पण हा काही त्यांचा नफा म्हणता येणार नाही.

 

paytm-marathipizza
coinsage.in

 

सध्या १ करोड पेक्षा जास्त लोक पेटीएमचा वापर करतात, अर्थात ग्राहकांपर्यंत पोचण्याचं पेटीएम एक माध्यम म्हणून उदयास येत आहे आणि याच कारणामुळे कंपन्या स्पॉन्सरशिप देऊन किंवा थेट गुंतवणूक करून पेटीएमला पैसा पुरवत आहेत.

कोणत्याही क्षेत्रातील कंपनी घ्या इश्युरन्स, ऐन्टरटेन्मेन्ट, हॉटेल्स,  या सर्वच क्षेत्रातील बड्या आणि छोट्या कंपन्या पेटीएमशी जोडल्या गेल्या आहेत, कारण त्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत पोचायचे आहे.

या कंपन्यांना पेटीएम त्यांच्या टार्गेट ग्राहकांपर्यंत पोचवते, कॅशबॅक कुपन्स आणि ऑफर च्या माध्यमातून त्यांची जाहिरात करून!

त्याबदल्यात  पेटीएमला कमिशन मिळते, म्हणजे खरतरं पेटीएम जो कॅशबॅक देते तो आपल्या खिश्यातून देत नाहीच, ते ज्या कंपनीची जाहिरात करतात, त्यांचाच पैसा वापरतात आणि उलट त्यातून कमिशन काढतात.

पेटीएम किंवा त्याप्रकारची कोणती साईट वापरत असाल तर प्रीपेड वॉलेट (मनी वॉलेट) हा काय प्रकार आहे हे तुम्हाला माहित असेलच. ज्यामध्ये आपण पैसे टाकून ठेवायचे आणि पुढच्या वेळेस कोणताही व्यवहार केला तर पैसे त्यातून कापले जाणार.

तर हा प्रीपेड वॉलेट पेटीएम सारख्या कंपन्यांसाठी नफा, उत्पन्न मिळवण्याचा स्मार्ट मार्ग आहे. प्रत्येक ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे स्वतंत्र वॉलेट असतात.

काही जणांच्या दाव्यानुसार आपण जे पैसे प्रीपेड वॉलेट मध्ये ठेवतो, ते ‘Escrow account’ मध्ये ठेवले जातात.  

‘Escrow account’ असा प्रकार आहे ज्यामध्ये आपले प्रीपेड वॉलेटमधील पैसे ठेवले जातात, त्याबदल्यात पेटीएम सारख्या कंपन्यांना व्याज मिळते. हे व्याज कोणत्याही बँकेतील फिक्स्ड डीपोझीट वर मिळणाऱ्या व्याजाइतके नक्कीच असते.

हे व्याज कंपन्या ग्राहकाला देत नाहीत, तर त्याबदल्यात त्याला कॅशबॅकच्या ऑफर्स देतात, ज्यांची किंमत ‘Escrow account’ मधून मिळणाऱ्या व्याजापुढे नगण्य असते.

 

Escrow-Account-marathipizza
turtlesoft.com

 

वरील दोन गोष्टींतून तुमच्या हे तर लक्षात आलेच असेल की कॅशबॅक देण हे काही पेटीएमसारख्या कंपन्यांसाठी तोटा ठरत नाही, पण कधीकधी या कंपन्या बिनधास्त ७०-८०% कॅशबॅक देतात, तर हे त्यांना कसं परवडतं?

तर त्याचं उत्तर आहे गुंतवणूकदराचा पैसा. हि गुंतवणूक हजारो लाखोंत नसते, तर करोडो आणि अब्जो रुपयांत असते. आणि पेटीएमकडे तर ‘जेक मा’ नामक जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेला ‘अलिबाबा’ चा संस्थापक असेल आणि तो तब्बल ५०० दक्षलक्ष डॉलरची फंडिंग देत असेल तर पेटीएमला फुकट कॅशबॅक द्यायला जातंय काय?

आता तुमच्या लक्षात आलंच असेल हे कॅशबॅक मागचं अर्थकारण…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी!

  • May 23, 2020 at 7:15 am
    Permalink

    उत्तम लेख..

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?