' दोघींची मैत्री प्रेमात बदलली अन् त्याची परिणती थेट लिंगबदल शस्त्रक्रियेत झाली! – InMarathi

दोघींची मैत्री प्रेमात बदलली अन् त्याची परिणती थेट लिंगबदल शस्त्रक्रियेत झाली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी…प्रेमासाठी कोण काय करू शकतं याबाबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही.आजवर आपण प्रेमासाठी समुद्रातून पोहत आलेले बघितले आहे तर कधी कोणाचा जीव घेतलेला ही बघितला आहे.

प्रेमासाठी काय पण..असं म्हणत आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला खुष ठेवायला अनेक लोक विविध गोष्टी करायला तयार असतात. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी खरीखुरी कहाणी सांगणार आहोत ज्यात एका तरुणीने तिच्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी चक्क लिंग बदलले…चला तर पाहुयात ही अजब गजब प्रेमकहाणी!

घरच्यांच्या विरोधाने बदलले लिंग

उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये दोन मैत्रिणी मैत्रीच्या पलीकडे पोहोचल्या होत्या. त्यांना लक्षात आलं होतं की आता त्या एकमेकींच्या प्रेमात आहेत आणि पुढचे आयुष्य त्यांना एकमेकींच्या सहवासात घालावायचे आहे. मात्र घरी सांगितल्यावर घरचे संपूर्ण विराधात गेले.

 

lesbian couple IM

 

बदलणारा समाज,आधुनिकतेकडे वळणारी आजची पिढी यांसारख्या अनेक गोष्टींपासून कदाचित ते दहा हात लांब असावेत.त्यात प्रयागराजसारख्या धार्मिक स्थळापर्यंत अद्याप हे विचार पोहोचलेही नसावेत.

घरून होणारा हा विरोध आणि सोबत राहण्याची असलेली प्रचंड ओढ ही त्यांच्यामधील एका मैत्रिणीला ‘लिंग बदला’कडे घेऊन गेली. स्त्रीचा स्रीसोबत विवाह आणि संसार हा समाज स्वीकारत नसेल तर लिंग बदलून आपणच ‘समाजमान्य’ होऊयात असा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करून तिला पुरुष केलं :

आपल्या जोडीदाराच्या प्रेमात वेडे झालेल्या या महिलेने समाजातील कोणतेही अडथळे टाळण्यासाठी आणि इतर लोकांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी तिचे लिंग बदलण्याचा निर्णय घेतला.

प्रयागराज येथील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने हे ऑपरेशन हाती घेतले. त्या डॉक्टरांच्या टीमने तिच्या शरीराच्या वरच्या भागांमध्ये आणि छातीची पुनर्रचना करताना लिंग बदलाची शस्त्रक्रिया देखील केली.

डॉक्टरांनी हे ही सांगितले की शस्त्रक्रिया पूर्ण झाली असली तरी त्या बदलासाठी आणखी दीड वर्षे लागतील, त्यानंतर ती पुरुष होईल.

operation 2 IM

 

एवढंच नाही तर तिच्या छातीवर टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सचे काही इंजेक्शन दिले आहेत ज्यामुळे तिच्या छातीवर काही काळाने केस देखील उगवण्यास सुरवात होईल.

आजही आपला समाज तथाकथित प्रेमाच्या व्याख्येच्या पलीकडे असणाऱ्या समलैंगिक, गे, लेस्बियन या जोडप्यांना किंवा त्यांच्या विवाहांना मान्यता देण्यास अनुकूल नाही.

आज प्रयागराजमधील या जोडप्याने याच समाजमान्यतेच्या नियमांमुळे आज लिंगबदलाचे पाऊल उचलले. तर याच तथाकथित रुढींपुढे न झुकता आधुनिक, प्रगत आणि स्वतंत्र भारताच्या दिशेने पाऊल टाकूयात!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?