' नुसतं सायकलिंग करून उपयोग नाही, या ७ गोष्टी लक्षात ठेवल्यात तरंच वजन कमी होईल – InMarathi

नुसतं सायकलिंग करून उपयोग नाही, या ७ गोष्टी लक्षात ठेवल्यात तरंच वजन कमी होईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सायकलिंग हा अनेकांचा छंद असतो. काहींसाठी सायकल हे प्रवासाचं महत्त्वाचं साधन असतं, काहींसाठी निव्वळ विरंगुळा, तर काहींसाठी व्यायामाचा मुख्य पर्याय!

चालणं हा सर्वोत्तम व्यायाम मानला जात असला, तरी सायकलिंगचा व्यायामात सहभाग करण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. हल्ली तर सायकलिंगचा ट्रेंड सुद्धा आला आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

अनेक प्रगत देशांमधील मंत्री महोदय सुद्धा सायकलवरून फिरत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल. अशी ही बहुगुणी सायकल वजन घटवण्याच्या कामात नक्कीच मदतीची ठरू शकते, मात्र सायकलिंग करत असताना या गोष्टी ध्यानात ठेवल्यात तर फायदा अधिक होईल हे नक्की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखादं लक्ष्य असणं आवश्यक…

सायकलिंग हा तुमच्या फिटनेसमधील एक अविभाज्य घटक असेल, तर त्यानुसारच वर्तन करा. फिटनेस बँडचा वापर, सायकलिंगसाठी विशिष्ट लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणं, आणि ते साध्य करण्यासाठी एकेक पाऊल पुढे टाकणं या गोष्टी होणं गरजेचं आहे. नुसतंच मनाला वाटले त्यानुसार सायकल चालवण्याऐवजी त्यासाठी सुद्धा एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणं उत्तम ठरेल.

डाएटवर लक्ष ठेवा….

कुठलाही व्यायाम हा त्याच्या जोडीला असणाऱ्या डाएटसह उत्तम परिणाम दाखवत असतो. सायकलिंग सुद्धा याला अपवाद नाही. योग्य प्रमाणात पाणी पिणं, आणि योग्य डाएट याची जोड सायकलिंगला असायला हवी. आरोग्यदायी फॅट्स आणि कार्ब्सचा सुद्धा आहारात समावेश करायला हवा.

एकट्याने  जाण्यापेक्षा….

 

dear zindagi alia shahrukh inmarathi

 

कुठलीही गोष्ट एकट्याने करणं अनेकदा कंटाळवाणं ठरतं. ती गोष्ट कितीही आवडीची असली, तरीही कुणीतरी सोबत असल्यास त्याची गंमत अधिक वाढते.

सायकलिंगच्या बाबतीत सुद्धा हाच फंडा वापरणं फायदेशीर आहे. मित्रमंडळींना सोबत घेऊन, एकमेकांसमोर निरनिराळी आव्हानं ठेऊन फिटनेसचं लक्ष्य साध्य करता येऊ शकतं.

सातत्य आवश्यक….

सायकलिंग हा एक उत्तम व्यायामप्रकार ठरतो, मात्र त्यासाठी सातत्य फार गरजेचं असतं. नियमित सायकल रायडींग तुमचा फिटनेस एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. याशिवाय जीवनशैली ऍक्टिव्ह राहण्यात मदत होईल.

नियमित आणि निष्ठेने हा व्यायाम करत राहिल्यास आरोग्याचे अनेक फायदे अगदी सहज पाहायला मिळतील.

वेळ महत्त्वाची

सायकलिंगचा व्यायाम करत असताना, तो किती वेळ आणि कुठल्या वेळी केला जातोय हे फार महत्त्वाचं ठरतं. कुठलाही दिनक्रम ठरवण्याआधी, आपलं चयापचय आणि त्यानुसार व्यायामाची असणारी गरज समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे नीट माहित असेल तर आठवड्याला जवळपास अर्धा किलो वजन कमी करणं सहज शक्य आहे.

तासभर सायकलिंग करणं म्हणजे जवळपास ५०० कॅलरीज जाळणं. म्हणजे रोज तासाभराची सायकलिंग आणि पूरक आहार यांच्या साहाय्याने आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करणं शक्य आहे.

 

cycle inmarathi

 

बहुतेकदा सकाळी न्याहारीच्या आधी सायकलिंग करणं फायदेशीर असतं, जवळपास २०% अधिक वेगाने कॅलरीज जळण्यास त्यामुळे मदत होऊ शकते. म्हणजेच रोज सकाळचा एक तास सायकलिंगसाठी देणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं.

दूर चले हम….

अधिकाधिक अंतर सायकलिंग करणं हे अधिक वेगाने फॅट बर्न करण्यासाठी उपयोगी पडतं. लांब पल्ल्यांच्या राईड करत असाल, तर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी त्याचा खूप फायदा होईल हे ध्यानात असू द्या. यात गर्दी कमी असणारा रस्ता निवडणं आणि अधिकाधिक वेळ व शक्ती सायकलिंगमध्येच खर्ची होईल याची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे.

चढउतार असणारे रस्ते

अधिक चढउतार असणारे रस्ते वजन कमी करण्यासाठी अधिक मदत करतील. सुरुवातीला सध्या रस्त्यांवर सायकलिंग करत असाल, तरी अधिकधिक चढउतार करावी लागेल अशा रस्त्यांवर सायकलिंग करण्याचा प्रयत्न करा. हे चढउतारच वजन घटवण्याला वेग देतील.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?