' या १० सवयी तुमची किडनी झपाट्याने निकामी करत आहेत – InMarathi

या १० सवयी तुमची किडनी झपाट्याने निकामी करत आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘आरोग्यम धनसंपदा’ हे तर तुम्हाला माहितीच आहे. आपले शरीर जर निरोगी असेल तर आपण चांगले जीवन जगू शकतो आणि या आरोग्याचा थेट संबंध आपल्या जीवनशैली आणि आपल्या दैनंदिन सवयी यांच्याशी जोडला जातो.

तसा तर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहेच पण तरीही आपल्या शरीरातील चयापचयाचे तसेच उत्सर्जन, रिप्रोडक्शन करणारे अवयव थोडे नाजुक असल्याने त्यांच्यावर आपल्या जगण्याचा बरा-वाईट परिणाम होत असतो. त्यातला एक अवयव आहे किडनी किंवा मूत्रपिंड!

 

Kidney Pain Feature InMarathi

 

शरीराच्या एकूण आरोग्यामध्ये मूत्रपिंड महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते शरीरातून कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात.

जर तुम्ही संतुलन राखले नाही तर तुमचे न्यूरॉन्स, स्नायू आणि इतर शरीरातील ऊती खराब होऊ शकतात. परिणामी, तुमचे मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते, त्यामुळे आपल्या शरीराचा हा अवयव चांगल्या स्थितीत ठेवणे महत्त्वाचे आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे किडणीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होवून त्या खराब होवू शकतात. कोणत्या आहेत या सवयी?

१. पेनकिलरचा अतिवापर :

नॉन-स्टेरॉइडल, अँटी-इंफ्लेमेटरी औषधे कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होतात. ही औषधे वेदना कमी करण्यासाठी प्रभावी कार्य करतात. परंतु त्यांचा जास्त वापर करणे तुमच्या मूत्रपिंडासाठी घातक ठरू शकते.

 

tablets medicine inmarathi 1

 

ते तुमच्या वेदना आणि वेदना कमी करतात, परंतु त्यांच्या अति वापराने मूत्रपिंडाचा कर्करोग देखील होवू शकतो.

२. व्हिटॅमिनची कमतरता असलेल्या आहाराचे सेवन :

काही जीवनसत्त्वे तुमच्या किडनीसाठी फायदेशीर असतात, आणि कमतरतेमुळे नुकसान होऊ शकते. मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळून आली आहे.

व्हिटॅमिन बी ६ हे इतर औषधांसोबत घेतल्यास तुमचे मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी देखील सिद्ध झालं आहे.

दररोज १५ मिनिटं उन्हात बसून व्हिटॅमिन डी मिळवता येतं. व्हिटॅमिन बी ६, सॅल्मन, चणे, बटाटे आणि इतर पिष्टमय भाज्या तसेच लिंबूवर्गीय फळांमध्ये ते आढळू शकते.

३. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा अतिवापर :

प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने आपल्याला तात्पुरता खाण्याचा आनंद मिळतो  चवदार आणि चमचमीत खाण्याची इच्छा पूर्ण होते पण सतत असे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ तुमच्या मूत्रपिंडासाठी हानिकारक असू शकतात.

 

panipuri-inmarathi04

 

प्रक्रिया केलेल्या जेवणात सोडियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, जे किडनीच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकते.

४. पाणी कमी प्रमाणात पिणे :

आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित नसेल किंवा आपण पाणी कमी प्रमाणात पित असू तर त्यामुळे मूत्र उत्सर्जनाला अडथळा येऊन किडनीवरील दाब वाढू शकतो ज्यामुळे मुत्रखडा किंवा मूत्रपिंडाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

यासाठी आहारतज्ञांकडून दररोज १२ ग्लास पाणी पिण्याची शिफारस केली जाते.

 

drinking water IM

 

आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे मूत्रपिंड निकामी होवू शकतात.

५. व्यायामाचा अभाव :

व्यायाम न करण्याने आपल्या पचनसंस्था मंद होतात. त्यांची कार्य करण्याची शक्ति क्षीण होते. याचा परिणाम उत्सर्जन संस्थेवर देखील होतो.

 

fitness inmarathi

 

पोट साफ न होणे, युरिन इन्फेक्शन अशा समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे मुत्रपिंडाना जंतुसंसर्ग होवू शकतो.

६. बैठी जीवनशैली :

एकाच जागी बराच वेळ बसून राहण्यामुळे आणि बराच काळ युरिन पास-आऊट न केल्याने मूत्रपिंडावर प्रेशर येवून तेथील स्नायू कमकुवत होवू शकतात ज्यामुळे भविष्यात सतत इन्फेक्शन चा धोका वाढतो.

७. धूम्रपान :

सततचे आणि अति धूम्रपान देखील तुमच्या किडन्या खराब करण्यास करणीभूत ठरते,

 

indian smokers inmarathi

 

कारण धूम्रपानामुळे तुमच्या शरीरातील प्रोटीन युरिनमध्ये आढळू शकते जे तुमच्या किडण्या खराब करण्यास कारणीभूत ठरते.

८. जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन करणे :

जर तुम्ही अल्कोहोल किंवा वाइन जास्त प्रमाणात घेत असाल तर ही तुमची सवय प्रचंड घातक आहे. कारण ती तुमचं मूत्रपिंड निकामी करू शकते.

 

stressful guy drinking inmarathi

 

अभ्यासानुसार, दररोज चारपेक्षा जास्त पेग घेणे मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजाराची सुरवात असू शकते.

९. मीठाचे अतिसेवन :

जास्त मीठ (सोडियम) असलेले पदार्थ आणि आहारामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या मूत्रपिंडाला इजा होऊ शकते.

 

salt inmarathi

 

तुमच्या जेवणाला ओव्हरसाल्ट करण्यापेक्षा, त्यात औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करून पहा. ही सवय तुम्हाला कालांतराने तुमच्या आहारात मीठ घालणे टाळण्यास मदत करेल.

१०. मांसाहाराचे अतिप्रमाण :

सतत मद्य पिणे जसे मुत्रपिंडासाठी घातक तसे अति मांसाहार करण्याची आपली सवय देखील अपायकारक ठरते.

 

non veg inmarathi

 

मांसाहारातून आपल्या शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढते. जे मूत्रदाह होण्याचे कारण बनते. तेव्हा अति मांसाहार देखील वाईटच

तेव्हा मित्रांनो आपल्या या १० सवयी जर आपण बदलल्या आणि सात्विक आहाराबरोबरच भाज्या, फळे यांचा आहारात समावेश केला तर आपली मूत्रपिंडे सुरक्षित राहतील. बघा विचार करून…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?