' वीज कनेक्शन तोडण्याचे मेसेज येत आहेत? सावधान, अन्यथा खाते होईल रिकामे – InMarathi

वीज कनेक्शन तोडण्याचे मेसेज येत आहेत? सावधान, अन्यथा खाते होईल रिकामे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऑनलाइन व्यवहार हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. घर बसल्या वीजेची ,फोनची आणि तत्सम स्वरुपाची बिले भरण आता अधिक सहज सोपे झाले आहे. पण यात गंमत अशी आहे की, हे व्यवहार जितके सोपे झाले आहे ,तितकेच यात डिजीटल सायबर गुन्हे अधिकाधिक वाढू लागले आहेत.

विशेष म्हणजे, ही डिजिटल चलाखी इतकी कमालीची असते की, आपण पूर्णपणे गंडविले जात आहोत ,हे लक्षात येईपर्यंत आपल्या खात्यातून पैसे निघून गेलेले असतात.

कशी होते फसवणूक :

नुकतीच दिल्लीमध्ये घडलेली घटना, नोएडा येथे रहाणाऱ्या एका डॉक्टरला मोबाईलवर मेसेज आला की, तुमचे वीज बिल भरलेले नाही. हे बिल भरण्यासाठी अमुक अमुक अॅप चा वापर करावा. अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल.

कामाच्या गडबडीत आपले बिल भरण्याचे राहून गेले असे डॉक्टरला वाटल्यामुळे ,त्याने तत्काळ तो अॅप डाऊनलोड केला आणि बिल भरले. पण थोड्याच वेळात असे लक्षात आले की त्यांच्या खात्यातून तीस हजार रूपये काढण्यात आले.

 

cyber fraud im

 

हे समजताच त्या डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. अलिकडे अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच अशा स्वरूपाचे मेसेज तुमच्या फोनवर आल्यास योग्य ती खबरदारी घ्या.

विजेचे बिल अपडेट करा – विजेचे बिल अपडेट करा. अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल. असा मेसेज आल्यास घाबरून न जाता सतर्क बना. प्रथम तुम्ही बिल भरले आहे की नाही याची खात्री करा. बिल भरले असल्यास सरळ अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा. कोणताही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचे संकेतस्थळ नीट तपासून बघा. बऱ्याचदा या संकेतस्थळ चा पत्ता सारखा दिसतो. पण प्रत्यक्षात तो तसा नसतो.

फोन हॅक होण्याची शक्यता – कित्येकदा असा मेसेज आला की अमुक एका क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. अशावेळी तुम्ही फोन केल्यास तो हॅक होण्याची शक्यता अधिक असते. मग अशा फोनवर संपर्क करणे टाळा.

 

mobile holding inmarathi

 

कोणती काळजी घ्याल?

थोडक्यात सांगायचे झाले तर – वीजबिला बाबत कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास संबंधित संस्थेकडून आवश्यक ती खात्री करून घ्या. कोणत्याही माहित नसलेल्या साईट वरून बिल भरू नका. अनोळखी लिंक वरून कोणत्याही प्रकारचा अॅप डाऊनलोड करू नका.

कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीगत फोन क्रमांकावरून अथवा खात्यातून व्यवहार करताना तो काळजीपूर्वक करावा. या व्यवहाराची योग्य ती नोंद घेतली जाणार आहे का? याची अगोदर खात्री करावी. कोणत्याही लिंक अथवा कॉल ला लगेच प्रत्युतर करू नका. अशा ठिकाणी कोणत्याही स्वरुपाची व्यक्तिगत माहिती शेअर करू नका.

 

visa card inmarathi

“चार्जशीट” म्हणजे नेमकं काय? ती “दाखल” व्हायला एवढा वेळ का लागतो?

फेक सोशल मिडिया अकाऊंट : कोण? कसं? कधी? का तयार करतं?

तुमच्या वीज मंडळाकडून योग्य ती माहिती घेऊन मगच त्या ठिकाणी योग्य तो व्यवहार करा. अगोदरची वीज आकारणी राहिली असल्यास ती नेहमीच्याच वेबसाइट वरून करावी. अशा स्वरूपाचे मेसेज आल्यास त्याची पोलिसांकडे माहिती द्यावी. जेणेकरून पोलिस देखील योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतील.

जर आपण या जाळ्यात चुकून अडकलात तर तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवा, त्यांच्या वेबसाईटवर देखील तक्रार नोंदवता येते. जेणेकरून सायबर क्राईम विभाग पुढील कारवाई करू शकते..

अशा तऱ्हेने वीज बिल भरण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतल्यास होणाऱ्या फसवणुकी पासून स्वतः ला वाचवू शकता. ज्येष्ठ नागरिक यात जास्त अडकले जाऊ शकतात त्यामुळे त्यांनी देखील सतर्क राहायला हवे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?