' मजुर ते फिल्मस्टार ते "मोदी है तो मुमकिन है" चं ताजं उदाहरण: आझमगडचा निरहुआ

मजुर ते फिल्मस्टार ते “मोदी है तो मुमकिन है” चं ताजं उदाहरण: आझमगडचा निरहुआ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वतंत्र भारतात अपवादात्मक वर्षं वगळता भारतावर सुखानं राज्य करणार्‍या कॉन्ग्रेस पक्षाला खरा मोठा धक्का दिला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपनं.

इतर कोणताही पक्ष टिकू शकणार नाही, सत्तेवर येणं तर दुरची गोष्ट असं चित्र असताना अचानक भारतात भगवी लाट आली आणि या लाटेनं देशाला नवीन घोषणा दिली, मोदी है तो मुमकीन है.

मोदी हे नाव जादुच्या कांडीसारखं काम करतं आणि भल्या भल्या पक्षाच्या भल्या भल्या उमेदवारांना धूळ चारत भगव्या झेंड्याचा उमेदवार विजयी होतो. गेल्या काही वर्षात हे चित्र परिचित झालेलं आहे आणि आता या यादीत नवीन नाव जोडलं गेलंय, निरहुआ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव म्हणजे, निरहुआ. दिनेश लाल यादव असं साधंसुधं नाव असणारा हा स्टार भोजपुरी चित्रपटात निरहुआ म्हणून परिचित आहे.

आजवर पडद्यावरचा स्टार असणारे निरहुआ यांनी आझमगड मतदार संघातून लोकसभा पोटनिवडणूक जिंकून वास्तव आयुष्यातही स्टार बनण्याचा मान मिळविला आहे. त्यांचा हा विजय अत्यंत महत्वाचा आहे कारं, या विजयामुळे उत्तर प्रदेशात भाजप मजबूत झाला असून समाजवादी पक्षाला धडा शिकवला गेला आहे.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून निरहुआ यांचा पराभव झाला होता, मात्र आता अझमगडमधे अखिलेश यांचे बंधू धर्मेंद्र यादव यांचा पराभव करत निरहुआ यांनी आपल्या पराभवाचं उट्टं काढलं आहे. राजकीय वर्तुळात ज्यांची चर्चा चालू आहे हे निरहुआ आहेत तरी कोण?

 

nirhua im

 

निरहुआ मुळचे गाझीपूरच्या बिर्हा कुटुंबातले आहेत. चित्रपटांचं वेड असणार्‍या निरहुआनी चित्रपटात पदार्पण केलं आणि २००६ साली प्रदर्शित झालेल्या चलत मुसाफ़िर लिओ रे चित्रपटात त्यांचं नाव निरहुआ होतं.

२००७ साली प्रदर्शित झालेल्या हो गेल बा प्यार या चित्रपटानं अमाप लोकप्रियता मिळविली. यातली गाणी सुपरहिट ठरली आणि खर्‍या अर्थानं निरहुआ यांना फ़ेम मिळण्यास सुरवात झाली.

२०१२ साली गंगा देवी या चित्रपटात त्यांनी महानायक अमिताभ सोबत काम केलं. तसेच निरहुआ चलाल लंडन हा त्यांचा पहिला भोजपुरी चित्रपट ठरला, ज्याचं शूटिंग भारताबाहेर लंडनला झालं.

याशिवाय तुम्हाला आठवत असेलच, लोकप्रिय रिॲलिटी शो, बोगबॉसच्या २०१२ सालच्या सिझनमधेही ते झळकले होते. पदार्पणापासूनच धमाकेदार यश मिळविणार्‍या निरहुआ यांचे पाय कायम जमिनीवर असतात याचं कारण त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी.

 

nirhua im1

 

अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या दिनेश लाल यांचे वडील कोलकत्यात ३५०० रुपये महिना अशा वेतनावर काम करत असत. घरात खाणारी सहा तोंडं आणि कमावणारे एकटे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून निरहुआ आज या स्थानावर पोहोचले आहेत आणि त्यामुळेच चाहत्यांच त्यांना एक प्रेमाचं स्थान आहे.

एक सामान्य मुलगा जर या स्थानावर पोहोचू शकत असेल तर आपल्या घरातला मुलगाही एक न एक दिवस निरहुआ बनू शकतो असं उत्तरप्रदेशातल्या आईवडिलांना वाटतं. त्यांना निरहुआ यांच्याबद्दल असणारी आपुलकी त्यांनी मतपेटीतून सिध्द केलेली आहे.

भोजपुरी चित्रपटातून पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी संगीतक्षेत्रात अमाप लोकप्रियता मिळविली होती. त्यांचा चुलत भाऊ विजय लाला हे त्या परिसरातील प्रसिध्द बिर्हा गायक आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आणि त्यांच्याकडे प्राथमिक धडे गिरवत निरहुआ या क्षेत्रात आले.

 

nirhua im2

 

कधीकाळी पैसे नसल्याने मैलोन मैल चालत जाणार्‍या निरहुआ यांच्याकडे आज रेंज रोव्हर आणि फ़ॉर्च्युनर सारख्या गाड्यांचा ताफ़ा आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकून ६ कोटींच्या संपत्तीचे मालक असल्याचं जाहिर केलेलं आहे.

गाणं, अभिनय, व्यवसाय आणि आता राजकारण असा प्रवास करणारे निरहुआ आम युवांसाठी रोल मॉडेल आहेत. कितीही लोकप्रिय चेहरा असला तरीही समाजवादी पार्टीचा उमेदवार हरविणं हे किती कठीण काम आहे हे ज्यांना उत्तर प्रदेशातील राजकीय पट माहित आहे त्यांना कल्पना येईल, हे कठीण काम निरहुआ यांनी करून दाखविलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?