' या भारतीय वाघिणीने पाकड्यांच्या तावडीतून भावाला सोडवण्याच्या संघर्षात जीवन अर्पण केलं – InMarathi

या भारतीय वाघिणीने पाकड्यांच्या तावडीतून भावाला सोडवण्याच्या संघर्षात जीवन अर्पण केलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वेड्या बहिणीची वेडी माया हे आपण कितीतरी वेळा ऐकलं आहे. बहीण भावाच्या नात्याचे हे धागे अगदी जन्मापासून सोबत असतात आणि ते जन्मभर सोबत करतात. वेळप्रसंगी हे दोघे एकमेकांसाठी चांगल्या वाईट प्रसंगी एकमेकाची ढाल बनून उभे राहतात. असे प्रसंग बघून लहानपणी एकमेकाशी सतत भांडणारे हेच का ते असा प्रश्न पडतो. अशीच दलबीर कौर आणि सरबजीत सिंह या बहीण भावाच्या प्रेमाची लढाईची कहाणी.

आपण सर्वांनी रणदीप हुडा आणि ऐश्वर्या राय यांचा सरबजीत हा २०१६ साली आलेला चित्रपट पहिला असेलच. एका खऱ्याखऱ्या घडलेल्या कहाणीवर बेतलेला हा चित्रपट!

 

sabarjeet im

 

आपल्या भावाला पाकिस्तानमधील तुरुंगातून सोडवण्यासाठी दलबीर कौर यांनी खूप कडवी झुंज दिली होती. पण दुर्दैवाने सरबजीत सिंह काही जिवंतपणी भारतात परतू शकले नव्हते. त्यांच्या बहिणीने दिलेला लढा मात्र खूप गाजला. या भावासाठी लढलेल्या या लढवय्या बहिणीचे नुकतेच निधन झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काय आहे हे प्रकरण?

३० ऑगस्ट १९९० पंजाबमधील सरबजीत सिंह यांनी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. ते झिरो लाईन ओलंडून गेले. त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी पकडले आणि भारतीय गुप्तहेर समजून तुरुंगात डांबून ठेवले.

इतकेच नव्हे तर त्याचे नांव ही मनजीत सिंग असे सांगून तो भारतीय गुप्तहेर असल्याचा निर्वाळा दिला.

ऑक्टोबर १९९१ मध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने सरबजीत सिंह यांना फैसलाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवून मृत्यदंड पण ठोठावला. मामला भारत सरकारपर्यंत आल्यानंतर सरकारने हा गैरसमजुतीचा घोटाळा आहे असे स्पष्ट केले. त्याला चुकीचा माणूस समजलं जात आहे असे सांगितले.

 

sabarjeet 1 im

 

हा मामला आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलला गेला. आणि २००८ साली सरबजीतच्या फाशीच्या शिक्षेवर अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली.

सरबजीत सिंह यांनी पाकिस्तानी राष्ट्रपतींसमोर पाच वेळा दयेचा अर्ज दाखल केला.पण प्रत्येक वेळी तो निकाली काढण्यात आला. मग याबाबत त्यांची बहीण दलबीर कौर यांनी हा लढा लढायचे ठरवले. तिने याविरोधात आवाज उठवला.

जेव्हा सरबजीत सिंह यांनी झिरो लाईन ओलांडली तेव्हा तिथे कुणीही पहारेकरी नव्हता त्यामुळे त्यांना समजलेही नाही की आपण पाकिस्तानच्या सरहद्दीत जातो आहोत.

एक तर त्यावेळी सरबजीत दारू प्याले होते दुसरं म्हणजे त्यावेळी मध्यरात्र उलटली होती, आणि तिसरी गोष्ट अशी होती की तिथे पहारा नव्हता त्यामुळे त्याला काहीही समजले नाही.

नंतर सरबजीत सिंह यांनी कितीही सांगितले तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. पण दलबीरने मात्र आपल्या भावाला परत घरी आणायचा निर्धार केला. आणि एक मोहीम सुरु केली.

 

dalbir im

 

तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना शेकडो फोन केले. खूप प्रयासानंतर पी.व्ही. नरसिंहाराव दलबीरला भेटायला तयार झाले. त्यांनी तिला दिलासा दिला ”तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या भावाला नक्की परत आणू”. पण त्यावरच अवलंबून न राहता दलबीर दोन्ही देशातील जवळपास १७० राजकीय नेत्यांना भेटली.

राहुल गांधी, सोनिया गांधी यांनाही भेटून तिने सारी कर्मकहाणी सांगितली. राहुल गांधींना चार वेळा तर सोनिया गांधीना ६ वेळा दलबीर कौर भेटल्या. पण आठवण कितीदा करून देणार? त्यांच्या व्यस्त दिनक्रमात दलबीरची कहाणी विस्मरणात गेली.

ही सारी झुंज दलबीर एकट्याच लढत होत्या. हळूहळू त्यांच्या मोहिमेला बळ मिळू लागले. एका निरपराध माणसाला असे डांबून ठेवले या गोष्टीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर पण घेतली गेली.

त्याच्याच जोरावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप केला आणि परवेझ मुशर्रफ यांनी सरबजीत सिंह यांची फाशी स्थगित केली. दलबीरने आयुष्यात १० लाख किलोमीटर प्रवास केला निव्वळ आपल्या भावाच्या सुटकेसाठी.

शेवटी दलबीर कौर यांनी एक कँडलमार्च आयोजित केला. ३०० मेणबत्त्या पटवून त्यांनी एक रॅली काढली जी बंगळूरू ते मुंबई, नाशिक, पूर्व बंगाल ते श्रीनगर पर्यंत आणि शेवटी आपल्या गावी पंजाब मधील भिकीविंड पर्यंत काढली गेली. एका निष्पाप शेतकऱ्याला असे बंदी बनवले गेल्याचा निषेध होता तो.

 

candle maarch im

 

परवेझ मुशर्रफ यांनी एप्रिल २००८ मध्ये सरबजीत सिंह यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटायला परवानगी दिली. त्याची पत्नी, आणि दोन मुली लाहोर येथील तुरुंगात जाऊन भेटल्या. त्याची अवस्था फारशी चांगली नव्हती. नंतर स्वत: दलबीर आपल्या भावाला २०११ मध्ये भेटायला गेल्या.

सरबजीत सिंह यांनीदेखील दयेचा अर्ज दाखल केला. त्याचे भवितव्य आता भारत पाकिस्तान संबधावर ठरणार होते. दोन्ही देशातील तणाव बघता फार काही आशा नव्हती. आणि पाकिस्तानने तर गुप्तपणे त्यांना मारून टाकायचे ठरवलेच होते. आणि शेवटी तसेच झाले.

लाहोर येथील तुरुंगातील कैद्यांच्या हल्ल्यात सरबजीत सिंह यांचा २०१३ मध्ये मृत्यू झाला.

पण दलबीर कौर यांनी दिलेला लढा हा खरोखर महान होता. त्याला यश मिळाले की नाही हा नंतरचा भाग. पण त्यांचे प्रयत्न खूप नेटाचे होते.

आता असाही आक्षेप नोंदवला जातो की दलबीर सरबजीत सिंह यांची सख्खी बहीण नव्हत्या. पण त्याने काही फरक पडला नाही. त्यांचे प्रेम तर तसेच होते.

या अभिनेत्याने केले अंत्यसंस्कार

या बहिण भावाच्या जोडीवर आधारीत चित्रपटात दलबीर यांच्या भावाची भुमिका अभिनेता रणदीप हुडाने केली होती. त्या दरम्यान रणदीप आणि दलबीर यांची चांगलीच गट्टी निर्माण झाली होती.

रणदीपमध्ये मला माझ्या भावाचाच भास होतो, असं म्हणज दलबीर यांनी रणबीरवर बहिणीप्रमाणेच माया केली. चित्रपटानंतरही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

मी गेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार हा माझा मानसबंधू रणदीपने करावे अशी इच्छा दलबीर यांनी व्यक्त केली होती. अभिनेता रणदीपनेही त्यांच्या या इच्छेचा मान राखला.

 

randeep im

 

अल्पशा आजारामुळे दलबीर यांची इहलोकीची यात्रा संपवली. ही बातमी कळताच तातडीने रणदीप हजर झाला. आपल्या मानस बहिणीला अखेरचा निरोप देत त्याने अंत्यसंस्कारही केले. ”एक लढवय्यी बहीण आपल्या भावाला भेटायला निघून गेली” असं म्हणत एकाच वाक्यात रणदीपने दलबीर यांच्याबद्दलची भावना व्यक्त केली.

आपल्या भावाच्या सुटकेसाठी अहोरात्र लढणाऱ्या या रणरागिणीची कथा तुम्हाला कशी वाटली? हे नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?