' महिलांनो, डार्क लिपस्टिक जरूर वापरा, पण त्याआधी या टिप्स वाचाच – InMarathi

महिलांनो, डार्क लिपस्टिक जरूर वापरा, पण त्याआधी या टिप्स वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सुंदर असावं, सुंदर दिसावं आणि आजूबाजूच्यांनी आपलं कौतुक करावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. खरंतर प्रत्येक स्त्री ही जन्मतः सुंदर असतेच, पण या सौंदर्यात विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनं म्हणजेच मेकअप प्रॉडक्ट्स भर टाकत असतात.

लिपस्टिक समस्त स्त्री वर्गाचा जीव की प्राण. लिपस्टिकशिवाय मेकअपला अर्थच नाही. लिपस्टिक, मग ती सौम्य रंगाची असो वा गडद,  मॅट फिनीशिंग असो वा ग्लॉसी. प्रत्येकीचा आपापला एक खास उठाव असतो.

अलिकडे गडद शेडची लिपस्टिक लावण्याचा ट्रेण्ड जोर धरत आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक सहज असा ग्लॅमरस लुक प्राप्त होतो.

 

sanskruti im

 

लिपस्टिक सर्वांनाच लावता येत असली तरीही गडद लिपस्टिक लावण्याच्या खास अशा काही टिप्स आहेत. जर त्या ध्यानात ठेवून योग्य ती काळजी घेतली तर अपेक्षित परिणाम निश्चित साधता येईल.

ओठांकडे लक्ष द्या –

 

dry lips inmarathi

 

तुमचे ओठ फाटलेले नाही ना किंवा त्यावरील सालपटे निघाली आहेत का हे नीट पाहून घ्या. असे असल्यास सर्वप्रथम एका रुमालात बर्फ घेऊन एक ते दोन मिनिटे ओठांवर फिरवा. त्यानंतर तूप किंवा वॅस्लीनने हलकासा मसाज करा. यामुळे ओठ मऊ होतील. शिवाय बर्फ फिरवल्यामुळे त्यातला ओलावा टिकून राहिल.

कोरड्या ओठांवर लिपस्टिक लावली, तर ती व्यवस्थित लागत नाही.

लिप लायनरचा वापर करा –

गडद रंगाची शेड लावताना शक्यतो त्याच रंगाच्या लिप लायनरचा मदतीने आउट लाइन करून घ्यावी. त्यानंतरच लिपस्टिक लावावी. मग टिश्यूच्या सहाय्याने जास्त झालेली लिपस्टिक टिपून घ्यावी.

यानंतर ओठांवर हलकीशी फेस पावडर ब्रश किंवा हाताच्या सहाय्याने अलगद पसरवावी आणि पुन्हा एकदा लिपस्टिक लावावी. या तंत्रामुळे गडद रंगाची लिपस्टिक पसरत नाही. ती ओठांवर सहजपणे रहाते. शिवाय अशातऱ्हेने लिपस्टिक लावल्यामुळे तुमचे ओठ अधिक उठावदार दिसतात.

 

lipstick 2 inmarathi

 

सौम्य मेकअप करा –

गडद शेडची लिपस्टिक लावत असाल, तर तुमचा इतर मेकअप हा नेहमी सौम्य स्वरूपाचा असावा. खास करून डोळे आणि चेहऱ्यावरील मेकअप हा जितका सौम्य असेल तितकी लिपस्टिक अधिक उठून दिसते.

योग्य तो समतोल साधता आल्याने चेहरा खुलून दिसतो, अन्यथा गडद मेकअपमुळे चेहऱ्याला एकप्रकारचा भडकपणा प्राप्त होतो. अशा मेकअपमुळे व्यक्तिमत्व खुलण्याऐवजी तुमचं हसं होण्याची शक्यता अधिक असते.

वेळेचे बंधन पाळा –

हो, हे वाचून तुम्हाला हसू आलं असेल, पण ते खरं आहे. गडद रंगाच्या लिपस्टिकचा वापर शक्यतो पार्टी किंवा संध्याकाळी अथवा रात्रीच्या समारंभासाठी करावा. कारण दिवसासारखा प्रखर प्रकाश नसल्यामुळे गडद मेकअप रात्री अधिक खुलून दिसतो.

वर दिलेल्या टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही गडद रंगाच्या लिपस्टिकचा अवलंब केल्यास, निश्चितपणे तुम्ही पार्टीची शान ठराल यात शंकाच नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?