' २२० ते थेट ७५! अदनान सामीचं वजन कमी करण्याचा ‘फंडा’ आपणही आत्मसात करायला हवा – InMarathi

२२० ते थेट ७५! अदनान सामीचं वजन कमी करण्याचा ‘फंडा’ आपणही आत्मसात करायला हवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुझको भी तो लिफ्ट करा दे असं म्हणणारा अगडबंब अदनान सामी आठवतो का? तेरा चेहरा जब नजर आये …भीगी भीगी रातो में फिर तुम आओ ना म्हणणारा अदनान सामी तरुणाईचा काही काळ लाडका आवाज झाला होता. आशाताईंसोबत त्याचे हम भी तो है तुम्हारे दिवाने हो दिवाने हे गाणे पण तसेच लोकप्रिय झाले होते.

२० वर्षांमागे त्याचे अल्बम खूप लोकप्रिय झाले होते आणि तो जितका लोकप्रिय झाला होता तितकाच कुचेष्टेचा विषय पण.. त्याचे अफाट वजन हे त्याचे कारण होते. २२० किलो वजन असलेल्या अदनान सामीने आपले वजन भरपूर घटवले आहे. त्याच्या वजन घटवण्याची ही कथा.

जगात सगळ्यात सुखी कोण? जो कितीही खाल्लं तरी जाडी वाढत नाही तो! प्रत्येकाची शरीरयष्टी असते, अनुवांशिकता असते. कुणी जाड असतात तर कुणी हडकुळे. पण तरीही कुणालाही जाडी वाढावी, बेढब दिसावं असं कधीही वाटत नाही. पण कधी कधी जाडी वाढते.

 

adnan sami inmarathi

 

या जाडीची गंमत अशी… वाढताना भराभर वाढते पण उतरताना मात्र सावकाश उतरते. काहीजण जन्मत:च जाडी सोबत घेऊन आलेले असतात. तर काही जण काही कारणाने जाड होतात. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी. पण जाडी वाढणे हाच निष्कर्ष.

अदनान सामी हा प्रसिद्ध गायक. मध्यंतरी त्याची गाणी लोकांनी डोक्यावर घेतली होती, त्याचबरोबर त्याची थुलथुलीत शरीरयष्टी हा देखील चेष्टेचा विषय ठरला. २००५ मध्ये अदनान सामी गायब झाला. ना त्याची गाणी ना त्याची काही खबरबात. लोकांची स्मृती तशी साधारणच असते.

ज्या गतीने कलाकार लोकप्रिय होतात त्याच गतीने ते विस्मरणात पण जातात. ते जर लोकांसमोर नसतील तर लोक त्या कलाकारांना विसरतातही! अदनानबाबत पण असेच झाले. आणि काही दिवसांनी तो अचानक लोकांसमोर आला…. एकदम स्लिम ट्रीम झालेला अदनान सामी ओळखता येत नव्हता. एकदम बांधेसूद अदनान सामीला पाहून लोक आश्चर्यचकित झाले. हा कायाकल्प कशामुळे झाला?

२००५ मध्ये अदनान सामीवर लिम्फेडेमाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला बेडरेस्ट सांगितली. त्याचा लठ्ठपणा खूप वाढला होता. त्याची चरबी फुप्फुसांपर्यंत पोहोचली होती आणि त्यामुळे त्याला श्वास घेणेही कठीण होऊ लागले होते. ही अदनान सामीसाठी धोक्याची घंटा होती. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितले त्याने आता जर वजन कमी केले नाही तर तो सहा महिनेच जगू शकेल. मग मात्र त्याने ती सूचना गंभीरपणे घेतली.

ह्युस्टन येथील आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी करण्याचा विडा उचलला. त्याचे कुटुंब, मित्र यांची त्याला मदत झाली. अदनान सामीने हे वजन कमी करण्याचा फक्त संकल्प केला नाही तर तो प्रयत्नपूर्वक राबवला. कोणतीही गोष्ट झपाटल्यासारखी केली, तिचा पिच्छा पुरवला की त्यात यश मिळतेच मिळते. याच झपाटलेपणाने १६ महिन्यात त्याने १५० ते १५५ किलो वजन घटवण्याची कमाल केली.

इतकं वजन वाढलं तरी कस?

अदनान सामी लहानपणापासून असाच थुलथुलीत आणि लठ्ठ, बेढब होता का? नाही.. तो सांगतो, तो लहानपणी शिडशिडीत होता. शालेय जीवनात तो खेळातही पुढे होता. पण पुढे जेव्हा आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती उद्भवली, ताण तणाव आले तेव्हा त्याने जी खा खा केली त्याचा परिणाम म्हणून हे वजन वाढून तो अवाढव्य झाला.

या खा खा करण्याला शास्त्रीय भाषेत भावनिक आहाराचा बळी असे म्हणतात. म्हणजे ताण तणावातून बाहेत पडण्यासाठी किंवा ते विसरण्यासाठी लोक खात राहतात. ते जे चॉकलेट, पिझ्झा, आईस्क्रीम,मिठाई जंक फूड खातात ते सारे चरबीच्या रुपात शरीरावर दिसू लागते.

 

junk food IM

 

अदनान सामीने पण तेच केले होते.त्याने खूप कार्ब असलेले पदार्थ,साखर चरबीयुक्त पदार्थ,आणि खारवलेले पदार्थ खाल्ले. त्याचा परिणाम म्हणून तो अस्ताव्यस्त सुटला. ही वाढलेली चरबी कमी करायचे काही उपाय होते का? हो असतात तसेही उपाय असतात. पण त्याने ते पर्याय वापरले नाहीत.

खूपदा लोक वजन कमी करण्यासाठी लायपोसक्शन या शस्त्रक्रियेची मदत घेतात. पण त्याचेही दुष्परिणाम आहेतच. मध्यंतरी एक कर्नाटकातील अभिनेत्री याच लायपोसक्शन शस्त्रक्रियेदरम्यान मृत्युमुखी पडलेलं आपण वाचलंच आहे. अदनान सामीची चरबी थोडीथोडकी नव्हती तर तब्बल २२० किलो होती आणि ती शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे शक्य नव्हते. ते केवळ आहार आणि व्यायाम करूनच करावे लागणार होते.

वाढलेलं वजन कमी कसं केलं?

इतकी थुलथुलीत शरीरयष्टी घेऊन व्यायाम करणे सोपे होते का? पण अदनान सामीने ते आव्हान स्वीकारले. भारतात त्याचे प्रशिक्षक होते प्रशांत सावंत. त्यांनी अदनानच्या आहार व्यायाम याची पद्धतशीर आखणी केली. मग त्याने बटाटे, चीज, लोणी बंद केले. आणि लो कार्ब आणि हाय प्रोटीन फूड घ्यायला सुरु केले.

त्याच्या आहार तज्ज्ञांनी, त्याला कमी कॅलरीचे अन्न द्यायला सुरुवात केली. त्याच्या आहारात भाकरी, भात आणि जंकफूड पूर्णपणे बंद केले. त्याला केवळ सलाड, मासे आणि उकडलेले मसूर दिले गेले. बिनसाखरेचा चहा, पॉपकॉर्नचा नाश्ता, दुपारच्या जेवणात कोशिंबीर आणि मासे इतकाच आहार त्याला द्यायला सुरुवात झाली.

 

salad inmarathi

 

वजन कमी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे पोहणे. पण अदनान सामीचे वजन इतके जास्त होते की तो पोहण्यासाठी पाय वाकवू पण शकत नव्हता. त्याने ४० किलो वजन कमी केले मग त्याला ट्रेडमिलवर चालायचा व्यायाम दिला गेला. मग अजून थोडा हलका व्यायाम दिला गेला. पुढे आठवड्यातून सहा दिवस स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि कार्डीओ व्यायाम करायला दिला. यामुळे अदनान सामीचे वजन दरमहा १० किलोने कमी झाले. आणि मग त्याचे वजन ७५ किलो झाले.

आता अदनान सामी अगदी तंदुरुस्त दिसतो. शिडशिडीत झालेला अदनान सामी बघणे ही एक सुखद बाब आहे. पण इथवर त्याने केलेला प्रवास अवघड होता. पण त्याने तो केला आहे.

 

adnan im

लो बीपीच्या त्रासावर मात करण्यासाठी हे ८ रामबाण उपाय नक्कीच करून बघा!

मधुमेहापासून १०० % दूर ठेवणारे हे ८ सोपे व्यायामप्रकार फक्त तुमच्यासाठीच, वाचा!

याचा शेवट इतकाच सांगता येतो, ही तरुण पिढी जंकफूडच्या नादाने स्थूलपणाचा अंगीकार करत आहे. एकदा स्थूलपणा वाढला की तो आटोक्यात आणणे कठीण असते. त्याच्या अनुषंगाने होणारे विविध विकार हे कधी कधी जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?