' EDच्या रडारवर असणाऱ्या ‘मध्यमवर्गीय’ संजय राऊतांच्या संपत्तीचे आकडे थक्क करणारे आहेत – InMarathi

EDच्या रडारवर असणाऱ्या ‘मध्यमवर्गीय’ संजय राऊतांच्या संपत्तीचे आकडे थक्क करणारे आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुवाहटीतील बंडखोर आमदार आणि मुंबईतील शिवसेना यांच्या मध्ये उभे ठाकलेले संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते… सध्या सगळ्याच चॅनलवर शिवसेनेची भुमिका मांडणाऱ्या राऊत यांना जमिन घोटाळ्याप्रकरणी सोमवारी इडीने समन्स पाठवले आणि राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा नव्या चर्चांना तोंड फुटलं.

“ही तर आमची मुस्काटदाबी, कितीही प्रयत्न केला तरी मी हार पत्करून गुवाहटीला जाणार नाही” असं म्हणत संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीला घाबरत नसल्याचं स्पष्ट केलं, मात्र राऊतांवर ईडीची नजर असल्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही. यापुर्वीही संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पीएनबी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी इडीनेे नोटीस पाठवली होती.

 

sanjay raut inmarathi

 

एकंदरितच शिवसेना प्रवक्ते आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक अशा दुहेरी भुमिका बजवाणाऱ्या संजय राऊत यांना वारंवार ईडीची नोटीस का येते? राऊत दाम्पत्याची संपत्ती नेमकी किती आहे? असे प्रश्न सामान्यांना पडणं अपेक्षित आहे.

जाणून घेऊयात राऊत दाम्पत्याच्या खिशात नेमकी किती संपत्ती आहे.

२०१६ साली खासदारकीची निवडणूक लढवताना संजय राऊत यांनी आपली मालमत्ता जाहीर केली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती ६ कोटी ५६ लाख ६७ हजार ९९९ रुपये होती. तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची संपत्ती ७ कोटी ६२ लाख १२ हजार ६२१ रुपये होती.

म्हणजेच २०१६ साली राऊत दाम्पत्याची एकूण मालमत्ता १४ कोटी १८ लाख ८० हजार ६२० रुपये असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या ६ वर्षांच्या कालावधीत या रकमेत घसघशीत वाढ झाली असून सध्या ही रक्कम २१ कोटींच्या घरात आढळते.

यापुर्वी एका मुलाखतीत मी मध्यमवर्गीय असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. असं असताना एका मध्यमवर्गीय माणसाची मालमत्ता सहा वर्षात २१ कोटींपर्यंत पोहोचते ही बाब आश्चर्यकारक आहे.

सहा वर्षातील राऊत यांचा आर्थिक प्रवास चक्रावून टाकणारा आहे. जाणून घेऊयात राऊतांची संपत्ती ६ वर्षात नेमकी किती आणी कशी वाढली आहे.

शिवसेना खासदार आणि राज्यसभा निवडणुकीचे शिवसेनेचे क्रमांक १ चे उमेदवार संजय राऊत यांन त्यांची मालमत्ता जाहीर केली. त्यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. तसंच प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.

संजय राऊत यांच्याकडे १ लाख ५५ हजार ८७२ रूपये रोख असून १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रूपये बँकेत आहेत

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे ७२९.३० ग्रॅम सोनं दागिन्यांच्या स्वरूपात आहे. त्याची किंमत ३९ लाख ५९ हजार ५०० रूपये आहे. तर १८२० ग्रॅम चांदी आहे त्याची किंमत १ लाख ३० हजार रूपये आहे.

 

gold 1 inmarathi

 

त्यांनी एक वाहन घेतलं आहे जे २००४ मध्ये घेतलं आहे.

आर्थिक वर्षातील कमाई

संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रकात दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्याकडे ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी आहेत.

२०२०-२१ या वर्षात २७ लाख ९९ हजार १६९ रूपये कमावले. तर त्यांच्या पत्नी वर्षा यांनी २१ लाख ५८ हजार ९७० इतके पैसे याच आर्थिक वर्षात कमावले.

जमिनजुमला आणि बरंच काही…

राऊत यांच्या नावे अलिबागमध्ये जमिनीचे तीन तुकडे आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये एक एकरची जाग आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली असून सध्या या जागेची किंमत ९ लाख रूपये आहे.

राऊत यांच्या नावे रायगडमध्ये नॉन अॅग्रीकल्चर जमीनही आहे. या जमिनीची किंमत साधारण २.२० कोटी आहे. त्यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावेही काही जमीन या ठिकाणी आहे.

दादर, भांडूप आणि आरे कॉलनी येथे राऊत दाम्पत्यांच्या नावे सुमारे ४ घरे आहेत, त्यांची सध्याची किंमत सुमारे ७ कोटींच्या आसपास आहे.

 

raut im

 

थोडक्यात राऊत दाम्पत्याची एकू संपत्ती सुमारे १९-२० कोटींच्या आसपास आहे. अर्थात ही केवळ जाहीर केलेली माहिती आहे.

एकंदरितच राजकीय क्षेत्रात बेधडपणे वावरणाऱ्या संजय राऊत यांची तिजोरीही गलेल्लठ आहे. अर्थात राजकीय मंडळींसाठी ही रक्कम काही फार मोठी नाही. मात्र आता जमीन व्यवहार प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरे जाणारे राऊत नक्की काय उत्तर देणार? ईडीच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार? हे येणारा काळच ठरवेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?