' गुजरात दंगलीतील मोदींच्या क्लीन चिट विरुद्ध विद्रोह करणाऱ्या आजीबाई

गुजरात दंगलीतील मोदींच्या क्लीन चिट विरुद्ध विद्रोह करणाऱ्या आजीबाई

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. त्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी झालेले गोधरा कांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली, त्यात नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप आणि मग भरलेले खटले, अमेरिकेने मोदींना अमेरिकेत प्रवेशाला घातलेली बंदी हे सारे आपण जाणतोच.

अजूनही काही खटले मोदींवर सुरु आहेतच. काही निकालात निघाले असतील. काही तसेच रखडले असतील, पण आजही आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध ८३ वर्षांची एक वृद्ध विधवा नेटाने आपला खटला लढवत आहे आणि सगळ्या कोर्टात तिने दाद मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने आता तो दावा रद्द केला आहे.

कोण आहे ही विधवा? तिचं नांव आहे जकिया जाफरी. काय आहे हे प्रकरण?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे का घडलं? हे पाहण्याआधी आपण याची पूर्वपीठीका पाहू. हे प्रकरण कसे सुरु झाले?

याची सुरुवात झाली ती गोध्रा येथे झालेल्या रेल्वेवरील हल्ल्याने. गोध्रा हत्याकांड होऊन आता २१ वर्षे उलटली आहेत. गोध्रा कांड हे गुजरातवरील एक जळती जखम आहे.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी कारसेवकांच्या रेल्वेला आग लावण्यात आली. फायर ब्रिगेडला ती आग विझवण्यासाठी येऊ दिले नाही. आणि त्यात ९० लोक मेले.

 

godhra_train_burning_inmarathi

 

या हल्ल्यात मुस्लिम समाजाचे नेते सामिल होते आणि त्याचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये दंगल उसळली. कारण ज्या आरोपींना पकडले होते त्यांच्यावर पोटा लावू नये असा दबाव तत्कालीन केंद्र सरकारने आणला.

पुढे लोक इतके संतापले की गुजरात मध्ये जोरदार दंगे झाले. नरेंद्र मोदी त्यावेळी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. या दंगलीमध्ये एक हजार मुस्लिम मृत्युमुखी पडले. आजवर नरेंद्र मोदी यांनी ती परिस्थिती नीट हाताळली नाही असा आरोप केला जातो.

त्यांनी दंगलखोरांना रोखण्यासाठी काहीही कारवाई केली नाही असे मोदींवर आरोप केले जातात. पण तसा ठोस आरोप केलेला नाही. मात्र झाकिया जाफरी या महिलेने केस केली आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी या दंगलीचा कट रचला असं आरोप केला होता.

जकिया जाफरी ही एहसान जाफरी या काँग्रेस नेत्याची पत्नी. या उसळलेल्या दंगलीत एहसान जाफरी मृत्यमुखी पडले.

याबाबत असं सांगितलं जातं की, एहसान जाफरी यांनी गुलबर्ग सोसायटीमध्ये जमलेल्या गर्दीत गोळीबार केला होतं त्यात एका माणसाचा मृत्यू झाला. आणि मग परत हिंसा भडकली.

त्याचा सूड म्हणून २८ फेब्रुवारी २००२ रोजी एका जमावाने त्या सोसायटीवर हल्ला केला आणि ६९ लोकांना ठार केलं. त्यात एहसान जाफरी पण होते. मारल्या गेलेल्या लोकांपैकी ३९ लोकांचे मृतदेह सापडले. आणि उरलेले लोक बेपत्ता ठरले.

 

zakiya im

 

या प्रकरणात नरेंद्र मोदी यांच्यासह ६३ लोक सामील आहेत असे मानून जकिया जाफरी यांनी कोर्टात दावा दाखल केला. ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची नांवे आली होती एसआयटीने त्यांना क्लीन चीट दिली गेली.

जकिया जाफरी यांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली, पण त्याला न्याय न देता तो दावा कोर्टाने निकाली काढला. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी गुजरात हायकोर्टाने जकिया जाफरी यांचा दावा निकाली काढला.

त्यांनी हाय कोर्टात धाव घेतली. तिथेही न्याय मिळाला नाही म्हटल्यावर त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. पण सुप्रीम कोर्टाने देखील त्या याचिकेला निकाली काढले आहे.

एसआयटीने मात्र स्पष्ट केले की या बाबत कुणालाही सवलत दिलेली नाही. सर्वांची चौकशी केली आहे.

हे सारे प्रकरण घडले तेव्हा जकिया जाफरी ६० वर्षाच्या होत्या. आता त्या ८३ वर्षाच्या आहेत. एकदा माणूस गेला की गेला. मागे राहतात ते फक्त प्रश्न. त्याची उत्तरे कधी कधी कुणाकडेच नसतात. जिवंत राहिलेल्या लोकाना पण ती मिळत नाहीत. जकिया जाफरी आपल्या मृत पतीच्या मृत्यूचा न्याय मागत आहेत.

आजही गोध्रा या विषयावर चर्चा होते. त्यातून निष्पन्न काहीही होत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?