'भिक्षा मागून जगणाऱ्याने ३० कोटी उलाढाल करणारी कंपनी उभी केलीये, नक्की वाचा

भिक्षा मागून जगणाऱ्याने ३० कोटी उलाढाल करणारी कंपनी उभी केलीये, नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम   

===

नोकरी सोडून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या तरुण उद्योजकांच्या प्रेरणादायी गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो, पण क्वचितच अशी गोष्ट आपल्या कानी पडते जी खरंच आपल्याला ‘प्रेरणा’ देते आणि आपण स्वत:हून म्हणतो, “मी यातून काहीतरी शिकलं पाहिजे”

आज आम्ही तुम्हाला अश्याच एका व्यक्तीचा खडतर प्रवास सांगणार आहोत. जो प्रवास एखाद्या संघर्षगाथेपेक्षा कमी नाही. चला जाणून घेऊया उद्योगपती रेणूका आराध्य यांच्याबद्दल!

 

renuka-aaradhya-marathipizza01

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे की, या व्यक्तीने तरुण असताना अक्षरश: भिक्षा मागून दिवस काढले होते. पण आज तीच व्यक्ती ‘प्रवासी कॅब्स’ नामक तीस कोटींच्या कंपनीचा मालक आहे.

रेणुका बंगलोरच्या जवळ असलेल्या अनैकल तालुक्यातील गोपसंद्रा गावात राहत होते. त्यांचे वडील मंदिरात पुजारी होते. पण घरादाराची स्थिती म्हणावी तितकी चांगली नव्हती. त्यांना आपल्या वडिलांबरोबर शेजारच्या गावात भिक्षा मागण्यासाठी जावे लागायचे. त्या भिक्षेमध्ये मिळालेले धान्य विकून त्यांचे कुटुंब कसेबसे दिवस ढकलत होते.

रेणुका यांनी सहावी इयत्ता उत्तीर्ण केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना कामासाठी म्हणून दुसऱ्यांच्या घरी मदतनीस म्हणून पाठवले. पण त्याही परिस्थिती रेणुका यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले. पुढील शिक्षणासाठी त्यानी मुलांच्या वसतीगृहात प्रवेश घेतला.

 

renuka aradhya InMarathi

 

त्यांच्या वडिलांनी त्यांना वेदांचे आणि संस्कृत भाषेचे ज्ञान दिले होते. त्यामुळेच मध्यंतरी रेणुका मिळेल तेथे पंडिताचे कार्य करून किंवा वडिलांनी शिकवल्याप्रमाणे भिक्षा मागून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होते. परंतु दुर्दैवाने त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली.

रेणुका कोणत्याही कामासाठी लाजत नसतं. ते प्रत्येक काम  मेहनतीने करत आणि स्वतःला त्या कामामध्ये झोकून देत असत.

त्यांनी Adlabs कंपनीच्या एका शाखेमध्ये सफाई कर्मचाऱ्याची नोकरी केली. श्याम सुंदर ट्रेडिंग कंपनीमध्ये मदतनीस आणि सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. एके ठिकाणी त्यांनी माळ्याची नोकरी केली.

एवढेच काय तर अँम्ब्यूलन्सवर चालक म्हणून काम करत त्यांनी मृत शरीरे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या कामाचा अनुभव देखील घेतला आहे.

 

renuka-aradhya_buy_cabs driver InMarathi

 

विविध कामांचा अनुभव घेतल्यावर आता स्वत:च स्वत:च्या हिंमतीवर काहीतरी उभे करावे या स्वप्नाने झपाटलेल्या रेणुका यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. सर्वप्रथम त्यांनी बॅग आणि सुटकेसचे कव्हर बनवून विकण्यास सुरुवात केली, पण त्या व्यवसायात फार काही फायदा झाला नाही.

या अपयशाने काहीश्या हताश झालेल्या रेणुका यांनी आपला मोर्चा पुन्हा नोकरीकडे वळवला. त्यांना एके ठिकाणी टॅक्सी ऑपरेटरची नोकरी मिळाली. सवयीप्रमाणे त्यांनी हि नोकरी देखील खुप मन लावून केली. ते पर्यटकांना विविध ठिकाणी फिरवून आणायचे. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे पर्यटक देखील त्यांच्या कामावर खुश असायचे.

 

renuka aradhya 1 InMarathi

 

एवढे असूनही संसार चालवण्यासाठी लागणारा पैसा कमी पडत होता. रेणुका यांची पत्नी देखील एका कंपनीमध्ये टेलरिंगचे काम करत होती. दोघे मिळून महिन्याला ९०० रुपये कमवत असत. पण ते पैसे पुरेसे नव्हते.

टॅक्सी ऑपरेटर म्हणून काम करत असताना एकदा रेणुका यांना विदेशी पर्यटकांना फिरवण्याची संधी  मिळाली. त्यांच्या कामावर खुश झालेल्या त्या विदेशी पर्यटकांनी त्यांना डॉलरमध्ये भरगच्च टीप दिली.

हा पैसा चांगल्या कामासाठी वापरात यावा असा विचार करून रेणुका यांनी ते पैसे प्रायव्हेट फंडमध्ये जमा केले. त्यातून मिळालेल्या पैश्यातून रेणुका यांनी पुन्हा एक नवीन व्यवसाय सुरु करण्याचा चंग बांधला.

त्यातून उदय झाला ‘शहर सफारी’ कंपनीचा!

या वेळेस मात्र त्यांना नशिबाची साथ मिळाली. व्यवसाय उत्तम सुरु होता. ज्यावेळी त्यांच्या ताफ्यात तीन कार्स जमा झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या ‘शहर सफारी’ कंपनीची ‘प्रवासी कॅब्स’ या नावाने अधिकृत नोंदणी केली.

 

renuka-aaradhya-marathipizza03
theweekendleader.com

२००६ मध्ये त्यांनी तोट्यामध्ये असलेली ‘इंडियन सिटी टॅक्सी कंपनी’ खरेदी केली. या कंपनी मध्ये ३० पेक्षा अधिक कॅब्स होत्या. रेणुका यांना ती कंपनी खरेदी करताना आपल्या सर्व कार्स विकाव्या लागल्या. पण त्यांचा व्यवसाय मात्र कित्येक पटींनी वाढला होता.

व्यवसाय वृद्धीच्या प्रवासात त्यांना खूप संकटांचा सामना करावा लागला. ओला आणि उबेर  सारख्या प्रस्थापित प्रतिस्पर्ध्यांशी सामना करताना त्यांना आपल्या २०० कॅब्समागे तोटा सहन करावा लागला. इंग्रजी येत नसल्यानेही बऱ्याच उत्तमोत्तम डील्स त्यांच्या हातातून निसटल्या. परंतु त्यांनी स्वतःच्या अनुभवाने प्रत्येक संकटाला तोंड दिले. आज ते उत्तम इंग्रजी बोलतात. आज त्यांच्या कंपनीमध्ये १००० पेक्षा कार्स आहेत.

 

renuka aradhya 2 InMarathi

 

त्यांचे पहिले ग्राहक अॅमेझॉन इंडिया हे होते.

“आपण अॅमेझॉन इंडियाशी जोडले गेलो आणि त्यानंतरच व्यवसायाची प्रगती होत गेली”

– हे वाक्य ते नेहमी बोलून दाखवतात. हळूहळू त्यांनी वॉलमार्ट, अकमाई, जनरल मोटर्स आणि इतर कंपन्यांना आपल्यासोबत जोडण्यास सुरुवात केली. या सर्व बड्या कंपन्यांना त्यांनी कोणत्याही मार्केटिंग आणि सेल्स टीम शिवाय कन्व्हिन्स केले हे विशेष!

 

renuka-aaradhya-marathipizza04
theweekendleader.com

आज त्यांची कंपनी कार सेवा देणारी भारतातील एक नावाजलेली कंपनी आहे. या व्यवसायाव्यतिरिक्त इतरही अनेक व्यवसायात रेणुका आपले पाय रोवू पाहत आहेत आणि आपण त्यात यशस्वी होऊच असा त्यांना ठाम विश्वास आहे.

अशी आहे ही रेणुका आराध्य यांची प्रेरणादायीगाथा…जी प्रत्येक सामान्य माणसाला असामान्य गोष्टींच्या मागे धावण्यासाठी प्रेरणा देते. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?