' अज्ञात इतिहास : एक शहर फक्त एका दिवसासाठी भारताची राजधानी झालं होतं – InMarathi

अज्ञात इतिहास : एक शहर फक्त एका दिवसासाठी भारताची राजधानी झालं होतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नायक या हिंदी चित्रपटामधून आपण ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ पाहिला. एक दिवसाचा हा मुख्यमंत्री काय काय करू शकतो हेदेखील पाहिलं. ही एक चित्रपटातील घटना झाली, मात्र एखाद्या राज्याच्या राजधानीच्या बाबतीत सुद्धा हा असा बदल केला जाऊ शकतो का?

इतिहासात डोकावून पाहिलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून रायगडावर आपली राजधानी हलवली होती. मुघल राजा तुघलक याचा राजधानी बदलण्याचा तुघलकी निर्णय सुद्धा बऱ्याचदा माहित असतो, मात्र इतिहासात अशी आणखी एक रंजक घटना घडली होती, जिथे चक्क एका शहराला एका दिवसासाठी संपूर्ण देशाची राजधानी बनवलं गेलं होतं. चला जाणून घेऊया ही रंजक कथा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फक्त दिल्लीच नाही तर…

‘अब दिल्ली दूर नहीं’, हा वाक्प्रचार आपल्या तोंडावर अगदी सहजपणे असतो. मात्र भारतभूमीची राजधानी अशी दिल्लीची आज ओळख असली, तरी ती सुरुवातीपासून नव्हती. वेगवेगळ्या शहरांना भारतभूमीची राजधानी होण्याचा मान मिळाला.

पूर्व मध्यकाळात कन्नोज या शहराला भारताची राजधानी होण्याचा मान मिळाला होता. याशिवाय इतिहासात वेगवेगळी छोटी छोटी राज्यं भारतवर्षात पाहायला मिळत होती. त्या त्या राज्याची वेगळी राजधानी असणं हेदेखील साहजिक आहे.

शहराचं महत्त्व अनन्यसाधारण…

प्रयागराज हे नाव ऐकलं असेल ना तुम्ही? होय होय, उत्तरप्रदेशातलं तेच शहर ज्याचं नाव विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बदललं. पूर्वाश्रमीचं अलाहाबाद हे शहर आजही उत्तरप्रदेशातील आणि भारतातीलसुद्धा एक महत्त्वाचं शहर आहे.

 

prayagraj im

 

या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इथे भरणारा कुंभमेळा हा तर जगभरातील चर्चेचा विषय असतो. हे शहर जगप्रसिद्ध आहे, असं म्हटलं तरी ते अजिबात चुकीचं ठरत नाही.

अलाहाबादचं एवढंच महत्त्व नाही. इतिहासात सुद्धा त्याला फार मोठं महत्त्व असल्याचं मानलं जातं. या शहराची स्थापना १८५३ साली मुघल राजा अकबर याने केली होती.

‘अल्लाचं शहर’ असं म्हटलं जात असल्याने या शहराचं नाव अलाहाबाद असं पडलं आहे. अर्थात, असं असलं तरी हिंदू धर्मात सुद्धा या शहराला मोठं धार्मिक महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं. आजही कुंभ मेळ्याच्या रूपात ते पाहायला मिळतं.

अकबरच्या काळाच्याही आधी १७ व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा या शहराला मोठं महत्त्व असल्याचं इतिहासात स्पष्ट आहे. जहांगीर बादशाहने सुद्धा १५९९ ते १६०४ या काळात या शहराला राज्याचं मुख्य शहर मानलं होतं.

इतिहासात अलाहाबादला आणखी एक महत्त्व आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील एक महत्त्वाचं कुटुंब असणाऱ्या नेहरू धरण्यासाठी हे महत्त्वाचं शहर आहे. मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरू या पिता पुत्रांचं मूळ गाव म्हणून अलाहाबादची ओळख आहे.

 

allahabad im

 

….म्हणून झालं एक दिवसाची राजधानी

ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश सरकारकडे १८५८ साली भारताचा कारभार सुपूर्त केला. ही ऐतिहासिक घटना अलाहाबादमध्ये घडली होती. त्याकाळात उत्तर प्रदेशची राजधानी अशी सुद्धा या शहराची ओळख होती.

एक उत्तम शिक्षण केंद्र आणि न्यायव्यस्थेचं महत्त्वाचं स्थान म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने या शहराचं महत्त्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच ब्रिटिशांनी अलाहाबाद या शहराला एका दिवसाची राजधानी केलं होतं.

सरकारचा कारभार हस्तांतरित होत असताना, या शहराला राजधानी होण्याचा बहुमान मिळाला होता. ब्रिटिश राज्यकाळातच अलाहाबाद शहरात विश्वविद्यालय आणि हायकोर्टची स्थापना केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?