' ‘कुवत नसताना खुर्चीवर बसले’ असा आरोप करणाऱ्यांनी त्यांची कामं एकदा तपासून पहा – InMarathi

‘कुवत नसताना खुर्चीवर बसले’ असा आरोप करणाऱ्यांनी त्यांची कामं एकदा तपासून पहा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ एवढाच त्यांचा परिचय नाही तर तर एक मनस्वी कलाकार,नामांकित छायाचित्रकार म्हणून ही ते परिचित आहेत. पण त्याही पेक्षा ते परिचित आहेत पुरोगामी महाराष्ट्राचे ‘बेस्ट सीएम’ म्हणून!. महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे श्री. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या श्री. ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.

मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवण्याआधी आपण त्या व्यक्तीचे कर्तुत्व देखील पहिलं पाहिजे असा एक अलिखित प्रोटोकॉल आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे वारे वाहते आहे त्या वार्‍याची दिशा उद्धव यांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याकडे आहे. तेव्हा त्या टीकेची कारणे जाणून घेण्याआधी आपण उद्धव यांचे कर्तुत्व देखील जाणून घेतले पाहिजे.

 

uddhav thackrey inmarathi

 

उद्धव ठाकरे परिचय :

२७ जुलै १९६० रोजी मुंबईमध्ये जन्म झालेले उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे तिसरं अपत्य.जे जे. स्कूल ऑफ आर्टस् चे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे.

राजकारणात येण्यापुर्वी उध्दव ठाकरेंना पर्यावरणाची आवड होती आज देखील त्यांनी काढलेल्या वन्यप्राण्यांच्या फोटोग्राफला पाहुन आपल्याला याची प्रचिती येते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली असली तरी त्याच्या मुळाशी कायम एका कलाकाराचा आत्मा होता.

शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या श्री. ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली, तेव्हा उद्धव त्यांच्या “दैनिक सामना” चे कामकाज पहात असत व शिवसेनेच्या निवडणुकीसंदर्भात कामकाजात लक्ष घालत असत.

 

uddhav im

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आल्यावर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्व गुण दिसून आले.

२००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे असुन मुलांची नावे आदित्य आणि तेजस आहेत. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष असून पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि दुसरा मुलगा तेजस अमेरिकेत शिक्षण घेत आहे.

महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली आहे.

 

uddhav im 2

केंद्रात सरकार आलं तर PM म्हणून या दोघांपैकी कोण चांगलं? शिवसेना खासदाराचं उत्तर!

रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

वयाच्या मोठ्या टप्प्यावर राजकारणात प्रवेश केल्यामुळे, त्यांना त्यांच्या पक्षासाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी कमी कालावधी मिळाला आहे. त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षाने अनेक स्थानिक आणि राज्यांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला. सामाजिक कार्यामुळे त्यांचा पक्ष जिनिअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवू शकला.

पावसाळ्यात मुंबईतील खड्डे भरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुंबईत आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी अनेक इस्पितळे बांधून ती कार्यरत करण्यात आली आहेत. ठाकरे यांनी मुंबईत रक्तदान महाशिबिराचे आयोजीत करून अभिनव सामाजिक कार्याची सुरुवात केली. मलेरिया आजारावर उपचार केंद्र सुरु केली.  .

महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांसाठी यशस्वी कर्जमुक्ती मोहिमेचे आयोजन करून राज्य आणि केंद्र सरकार बदल घडवून आणण्यात अपयशी ठरले असताना  उद्धव ठाकरे यांनी पाऊल उचलले आणि त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी काम केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची प्रतिमा एका सुसंघटित परिपक्व राजकीय रचनेत बदलण्यात यश मिळवले आहे, ज्याला राज्य आणि त्याच्या कल्याणाची मनापासून काळजी आहे.

एक संघटित आणि सुसज्ज राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न खर्च करण्याचे निवडून श्री उद्धव ठाकरे यांनी एक चांगला आणि पुढे जाणारा पक्ष अशी शिवसेनेची निर्माण केली आहे. हे होते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे…आता ते मुख्यमंत्री पदावर राहतील का? हे काही दिवसात कळेलच…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?