' वाजपेयींचे विश्वासू ते भाजप विरोधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार : यशवंत सिन्हांचा राजकीय प्रवास असा का झाला?

वाजपेयींचे विश्वासू ते भाजप विरोधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार : यशवंत सिन्हांचा राजकीय प्रवास असा का झाला?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी संपत आल्यानंतर पुढचा उमेदवार कोण हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडणे स्वाभाविक आहे. रामनाथ कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती. यापूर्वी प्रतिभा पाटील या एकमेव महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. आता यानंरचा राष्ट्रपती निवडण्यासाठी ही निवडणूक होईल. अर्थातच जेव्हा निवडणूक असते तेव्हा ती प्रतिस्पर्धी तगडा असेल तर थोडी रंगतदार होते.

शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांनी या निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ही लढत आता केवळ दोनच उमेदवारांत होईल. या वेळी सत्ताधारी पक्षाने द्रौपदी मुर्मू यांचे नांव जाहीर केले आहे तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांचे नांव जाहीर झाले आहे.

 

Draupadi Murmu-marathipizza00

 

कोण आहेत हे यशवंत सिन्हा? नवीन पिढीला हे नांव फारसे माहीत नसेल. पण आज जो सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी या पार्टीचे ते खंदे नेते होते. पक्षप्रवक्ता ही मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

६ नोव्हेंबर १९३७ मध्ये पाटणा येथे यशवंत सिन्हा यांचा जन्म झाला. राज्यशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर पाटणा विश्वविद्यालयात त्यांनी याच विषयाचे शिक्षक म्हणू काम केले. आणि मग भारतीय नागरी सेवा म्हणजे आयएएसची परीक्षा देऊन यशवंत सिन्हा थेट प्रशासकीय सेवेत दाखल झाले. संपूर्ण देशातून यशवंत सिन्हा यांनी १२ वा क्रमांक मिळवला होता. खूप महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले.

भाजपमध्ये प्रवेश :

१९८४ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावाने त्यांनी निवृत्त होण्यास १२ वर्षे बाकी असताना नोकरीचा राजीनामा दिला. आणि जनता दलासोबत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. त्यानंतर त्यांचा कामाचा झपाटा पाहून १९८६ मध्ये त्यांना जनता दलाचे अखिल भारतीय महासचिव म्हणून नियुक्त केले गेले.

१९८८ साली त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त केले गेले.नंतर जेव्हा चन्द्रशेखर भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पदभार मिळाला. केवळ सात महिन्याची कारकीर्द असलेले हे पद त्यांनी भूषवले. अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते.

 

yashvant sinha im

 

१९९६ मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्त झाले. मार्च १९९८ मध्ये त्यांना परत एकदा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्त केलं गेलं. भारतीय अर्थ व्यवस्थेमध्ये खूपशा सुधारणा त्यांच्यामुळेच झाल्या. काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. 

व्याज दारात कपात करणे, कर्जफेडीवर करात सूट देणे दूरसंचार क्षेत्र खाजगीकरण, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यासाठी निधी गोळा करणे, पेट्रोलियम उद्योग नियंत्रण मुक्त करणे असे महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी मोदींवर कयामच टीका केली आहे. त्यांच्याविरोधात राफेल प्रकरणात त्यांनी सरकारविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आणि भारतीय जनता पक्ष सोडला.

 

narendra modi featured inmarathi

“हा” इतिहास सिद्ध करतो की बंडखोर शिंदेंची गद्दारी नव्हे तर – ‘खुद्दारी’…!

बंडखोर आमदारांची छावणी झालेल्या हॉटेलची “अंदर की बात”…!

२०१८ मध्ये त्यानी घोषणा केली की, ते आता राजकीय संन्यास घेणार आहेत आणि विशेष म्हणजे २०२१ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि तेथे ते पक्षाचे उपाध्यक्ष बनले.

आपल्या ३८ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत यशवंत सिन्हा यांनी पक्ष बदलले. विविध प्रकारची पदे भूषवली.अर्थ, परराष्ट्र अशी महत्वाची खाती सांभाळली. आता भारतातील सर्वोच्च मानले जाणारे राष्ट्रपती हे पद यशवंत सिन्हा भूषवू शकतील का? याचे उत्तर येता काळच देईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?