' मविआला पुरून उरणारे, आरएसएसचे कार्यकर्ते असलेले भगतसिंग कोश्यारी आहेत तरी कोण?

मविआला पुरून उरणारे, आरएसएसचे कार्यकर्ते असलेले भगतसिंग कोश्यारी आहेत तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारची अवस्था दोलायमान झाल्याचं चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे राजीनामा देतील का या चर्चांना उधाण आलंय. सातत्याने नव्यानव्या बातम्या समोर येत आहेत. पुढचे काही दिवस तरी ही परिस्थिती अशीच राहणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

सत्तेवर आपल्यापासूनच मविआ सरकारविषयी बऱ्याच उलटसुलट चर्चा सगळीकडून केल्या गेल्या होत्या. हे सरकार लवकर पडेल असंही म्हटलं गेलं होतं. सध्याचं एकूणच वातावरण पाहता काय होईल काहीच सांगता येत नाही. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी पूर्ण लॉकडाऊनचा काळ आणि त्यानंतरचाही बराच काळ हे सरकार टिकून आहे. पण आता शिवसेनेतूनच बंडखोरी केली गेल्यानंतर मविआ सरकारला चांगलाच दणका बसल्यासारखं झालंय.

 

eknath shinde 2 IM

 

याच मविआ सरकारला कायम टक्कर देणाऱ्यांमध्ये पुढे येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि आरएसएसचे कार्यकर्ते भगतसिंग कोश्यारी. आपण मविआसाठी ठकास महाठक ठरू शकतो हे भगतसिंग कोश्यारी यांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे. मात्र, त्यांच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर याच भगतसिंग कोश्यारी यांचा आजवरचा जीवनप्रवास थोडक्यात जाणून घेऊ.

कोण आहेत भगतसिंग कोश्यारी?

१ सप्टेंबर २०१९ पासून भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आले. भगतसिंग कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ ला उत्तराखंडच्या पालनधुरा या गावात झाला. लहानपणापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करायला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी १९६४ साली अलमोरा विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असताना ते कॉलेजचे सरचिटणीस म्हणून निवडून आले होते. ते शिक्षक आणि पत्रकारही होते.

१९७९ ते १९९१ या काळात ते कुमाऊँ विद्यापीठाचे काउन्सिलर होते. आणीबाणीविरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि १९७५ ते १९७७ या काळात तुरुंगवासही भोगला होता. १९९७ साली युपीच्या विधानसभेवर भगत सिंग कोश्यारी यांची निवड झाली. उत्तर प्रदेशाचं विभाजन झाल्यानंतर ते २००० साली ऊर्जा आणि सिंचन खात्याचे मंत्री झाले. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते.

 

bhagatsingh koshyari inmarathi

 

२००१-०२ या कालावधीत त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. नित्यानंद स्वामी यांच्या जागी ते मुख्यमंत्री झाले होते. २००२ ला निवडणुक हरल्यावर ते २००२ ते २००७ या काळात उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते.

२००८ साली ते उत्तराखंडच्या राज्यसभेचे सदस्य झाले आणि २००८ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेचं खासदारपद भूषवलं. २०१४ साली ते नैनिताल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. ते अविवाहित होते. त्यांनी ‘पर्वत पियुष’ नावाचं एक साप्ताहिक काढलं आणि चालवलं. “उत्तरांचल प्रदेश क्यों?” आणि “उत्तरांचल संघर्ष एवं समाधान” ही दोन पुस्तकंदेखील त्यांनी लिहिली. भाजपाचे वरिष्ठ नेते असलेल्या भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटही लागू केली होती.

 

rajyasabha 1

मोठी माणसं म्हटली की ती नेहमी चर्चेत असणार असा एक समज असतो. सर्वसाधारणपणे त्यांच्या कारकिर्दीपासून ते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापर्यंत बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला असते. पण प्रत्येक वेळी हे असं असेलच असं नाही.

मोठ्या पदांवर असलेल्या आणि आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या काही बड्या मंडळींची कधीकधी जुजबी माहितीही आपल्याला नसते. अगदी नेमक्या कारणांसाठी कायम चर्चेत राहिलेल्या भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबतीतही असंच म्हणता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?