' दातांची ट्रीटमेंट घेताना एक साधी चूक या अभिनेत्रीसारखी तुमची गत करू शकते!

दातांची ट्रीटमेंट घेताना एक साधी चूक या अभिनेत्रीसारखी तुमची गत करू शकते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘रूट कॅनल’ ही दातांवर केली जाणारी एक आवश्यक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये दातांमध्ये झालेला किटाणूंचा हल्ला हा इतर दातांपर्यंत पोहोचू नये याची तरतूद केली जाते. रूट कॅनल हा उपचार करणं सोपं नाहीये. पण, हा उपचार आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचं वैद्यकीय शास्त्र सांगतं.

बहुतांश वेळेस योग्य होणाऱ्या या उपचाराची चूक होण्याची देखील शक्यता असते. कन्नडा अभिनेत्री ‘स्वाती सतीश’वर करण्यात आलेली रूट कॅनल उपचार हे चुकल्याची बातमी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

 

swati im

 

दात हा आपल्या शरीरातील सर्वात मजबूत अवयव आहे. दात दुखत असतील तर कोणतंही काम करणं हे अवघड होत असतं. दातांवरचे उपचार हे नेहमीच नाजूक आणि खर्चिक असल्याचं आपण नक्की ऐकलं असेल किंवा अनुभव घेतला असेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

दातांवर उपचार हे एक तर एखाद्या अंतर्गत आजारामुळे केले जातात किंवा दातांमधील अंतर कमी करणे किंवा दात एकसारखे करून ‘स्माईल’ सुंदर करणे अशा कारणांसाठी केले जातात. दातांमधील अंतर हे काहींसाठी कमी आत्मविश्वास असल्याचं कारण देखील ठरतं, त्यावर खूप मोठा खर्च केला जातो, जे की कटाक्षाने टाळलं पाहिजे.

‘रूट कॅनल ट्रीटमेंट’ चुकते म्हणजे काय होतं ? त्याचे काय लक्षणं आहेत ? रूट कॅनल करत असतांना प्रत्येकाने कोणती काळजी घेतली पाहिजे ? जाणून घेऊयात.

रूट कॅनल चुकण्याची लक्षणं ?

१. दातांवर सूज येणं हे रूट कॅनल चुकल्याचं सर्वात प्रमुख लक्षण आहे. स्वाती सतीश या अभिनेत्रीने दातांवर आलेली सूज दुसऱ्या कारणांमुळे आली असावी हे समजून २० दिवस दुर्लक्षित केली आणि नंतर तो एक मोठा आजार म्हणून समोर आला.

२. रूट कॅनल चुकलं असल्याचं इतर लक्षण म्हणजे दात दुखणं, दातांमध्ये ओढल्यासारखं वाटणं हे पुन्हा एकदा किटाणूंचा दातांमध्ये शिरकाव झाल्याचं लक्षण आहे.

 

tooth ache inmarathi

 

३. दात तुटून पडणं हे देखील चुकीच्या रूट कॅनलमुळे होऊ शकतं, जे की प्रचंड वेदनादायी असतं.

४. दातांजवळ एखादा न दुखणारा दाण्यासारखा आकार तयार होणे हे देखील चुकीच्या झालेल्या रूट कॅनलचं लक्षण मानलं जातं.

रूट कॅनल चुकलं तर काय होऊ शकतं ?

१. ज्या व्यक्तींना ‘सायनस’चा त्रास आहे त्यांनी रूट कॅनल करतांना विशेष काळजी काळजी घ्यावी लागते. कारण, ‘सायनस’चं शरीरात पसरणं हे एखाद्या दातांच्या दुखण्याप्रमाणेच वाटू शकतं. रूट कॅनल करतांना जर हा उपचार ‘सायनस’च्या रेषेमध्ये पोहोचतो तेव्हा अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

२. रूट कॅनल चुकलं तर काही वेळेस दातांमध्ये एक अंतर तयार होतं आणि त्यामध्ये फोड येतो ज्यामुळे दात हलण्याची, आपल्या जबड्यावर सूज येण्याची शक्यता असते. यापैकी कोणतं जरी लक्षण जाणवलं तरी त्वरित आपल्या डॉक्टरांना संपर्क साधला पाहिजे.

 

tooth
the frenso bee

 

३. रूट कॅनल मध्ये चूक झाली तर दातांमध्ये पिवळसरपणा किंवा निळसरपणा येण्याची देखील शक्यता असते. योग्य वेळी उपचार न केल्यास दातांचा रंग नेहमीसाठी बदलू शकतो.

४. दातांमध्ये झालेल्या फोडावर आपल्याही नकळत इतर दातांचा त्यावर आघात होतो आणि त्यातून खारट चवीचं एक द्रव्य दातांमध्ये पसरत असतं जे की दातांच्या बळकटीसाठी हानिकारक असतं.

५. रूट कॅनल करत असतांना तोंडामध्ये एक इंजेक्शन दिलं जातं. तोंडातील ज्या भागावर हे इंजेक्शन दिलं आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भागात जर दुखत असेल तर ते रूट कॅनल चुकल्याचं लक्षण सांगितलं जातं. किटाणूंचं संक्रमण सुरू झाल्याचे ते चिन्ह आहे.

 

injuction im

 

६. रूट कॅनल करणे म्हणजे त्रास होणाऱ्या सर्व पेशींना दातांपासून वेगळं करणे. ते झाल्यानंतर पुन्हा कोणताही त्रास होणं अपेक्षित नसतं.

जर रूट कॅनल केल्यानंतर देखील काही थंड किंवा गरम खाल्ल्यावर दातांमध्ये तीव्र सणक येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित डॉक्टरांसोबत संपर्क साधावा. अन्यथा हा त्रास कायमचा होऊ शकतो.

७. रूट कॅनल केलेल्या तोंडाच्या बाजूला उपचार सुरू असतांना भूल दिलेली असते. त्याचा प्रभाव कमी झाल्यावर जर आपल्या हाताचा धक्का लागताच तोंडात दुखत असेल आणि हे दुखणं जर एका आठवड्यानंतरही आपली साथ सोडत नसेल तर त्याबद्दल त्वरित आपल्या डॉक्टरांना सांगितलं पाहिजे.

८. रूट कॅनल केल्यानंतर काहीच त्रास न होणे किंवा जाणीव न होणे हे देखील एक प्रकारचं लक्षण आहे. एक आठवडा झाल्यानंतर आपण आपल्या डॉक्टरांकडे दात तपासायला गेलं पाहिजे जेणेकरून भविष्यात उदभवू शकणाऱ्या एखादा त्रास टाळला जाऊ शकतो.

 

dentist im

 

रूट कॅनल केल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे ?

१. काय खाऊ नये ?
– सुपारी, पान, खैनी, कोणतंही कडक फळ जसं की गाजर किंवा मुळा, चॉकलेट, कुकीज खाऊ नये. त्याशिवाय दारूचं सेवन करणं देखील टाळलं पाहिजे.

२. काय खावे ?
– रूट कॅनल केल्यानंतर प्रोटीनयुक्त खाणं खायला पाहिजे. क्रीम, सूप, चीझ, दही, मिल्कशेक, शिरा, मासे सारख्या अधिक उर्जा देणाऱ्या पदार्थांचं सेवन करण्याचा डॉक्टर सल्ला देत असतात.

रूट कॅनल केल्यानंतर किमान दोन आठवडे वरील खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे लागतात.

रूट कॅनल करण्याआधी प्रत्येक व्यक्तीने जर या सर्व गोष्टींचा अभ्यास केला तर त्याला नंतर होऊ शकणाऱ्या त्रासापासून वाचता येऊ शकतं. प्रत्येकाची शरीर प्रकृती ही वेगळी असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोणताही उपाय करावा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?