' 'काली-पिली' : टॅक्सीच्या नाव-रंग-रूपामागे एक वेगळंच कारण आहे!

‘काली-पिली’ : टॅक्सीच्या नाव-रंग-रूपामागे एक वेगळंच कारण आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या बऱ्याच जणांकडे आज आपली स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहनं असतात. नसतील, तर भविष्यात ती घेण्याच्या दृष्टीने आपलं प्लॅनिंग असतं, पण तरीही आपली सार्वजनिक वाहनांची गरज पूर्णतः कमी झालेली नाही आणि होणारही नाही. लोकल, टॅक्सी, रिक्षा ही अशीच काही वाहनं.

आता ओला, उबर सारखे पर्याय आले असले तरीही आजही आपल्याला मोठ्या प्रमाणावर नेहमीच्या टॅक्सी आणि रिक्षा दिसतात. पण या सगळ्यात एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात आली असेल. ती म्हणजे टॅक्सीला कायम असणारे पिवळा आणि काळा हेच दोन रंग.

टॅक्सीला हे असेच रंग देण्यामागे काही कारण असेल का असा प्रश्न कदाचित आपल्याला आजवर पडलाही नसेल. पण बऱ्याच सार्वजनिक वाहनांना विशिष्ट रंग दिले जाण्यामागे काही कारणं असतात. टॅक्सी नेहमी काळ्या-पिवळ्या रंगाचीच का असते यामागचं कारण जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९०७ साली जॉन हर्ट्झ या सेल्समनने टॅक्सीचा व्यवसाय सुरु केला. ‘शिकागो विद्यापीठा’च्या एका सर्वेक्षणातून पिवळा रंग हा सहज लक्ष वेधून घेणारा रंग असल्याचं समोर आलं. टॅक्सी उठून दिसावी म्हणून टॅक्सीला पिवळा रंग देण्यात आला.

अगदी दुरूनही हा रंग लोकांना चटकन आकर्षित करेल म्हणून टॅक्सीला विचारपूर्वक पिवळा रंग देण्यात आला. रस्त्यावर अगदी कमी उजेड असला तरी पिवळा रंग पटकन दिसतो. सगळ्या रंगांमध्ये पिवळा रंग सगळ्यात जास्त भडक दिसतो. त्यामुळे काळ्या-पिवळ्या रंगाच्या टॅक्सीकडे लोकांची नजर पटकन जाते.

हर्ट्स यांची ‘शिकागो यल्लो कॅब कंपनी’ ही आता आपल्याला दिसणारी टॅक्सी वापरात आणणारी पहिली कॅब सर्व्हिस कंपनी होती. इतकंच नाही, तर १९५३ साली हर्ट्स यांनी जेव्हा ‘हर्ट्स कॉर्पोरेशन’ सुरु केली तेव्हा त्याचा लोगोही पिवळ्याच रंगाचा होता.

टॅक्सीला पिवळा रंग देण्यामागे लॅटरल पेरिफेरलचंही महत्त्वाचं योगदान आहे. लॅटरल पेरीफेरल व्हिजनद्वारे कुठला रंग डोळ्यांना जास्त आकर्षित करतो हे समजतं.

 

taxi IM

 

लाल रंगाच्या तुलनेत पिवळ्या रंगाची लॅटरल पेरिफेरल व्हिजन १.२४ पट जास्त असते. याच कारणामुळे टॅक्सी बरोबरच लहान मुलांना शाळेत सोडायला आणायला जाणाऱ्या वाहनांनाही पिवळाच रंग असतो.

कधीकाळी काळ्या-पिवळ्या रंगाची टॅक्सी मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणांची एक ओळख होती, मात्र २०१३ साली सरकारने वाढतं प्रदूषण पाहून वीस वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेली वाहनं हटवण्याचे आदेश दिल्यानंतर काळ्या-पिवळ्या रंगाच्या टॅक्सींची संख्या कमी झाली.

ओला-उबर मुळे झाला बदल :

आधी फक्त अशी काळ्या-पिवळ्या रंगाची टॅक्सीच असायची. पण आता वेगवेगळ्या रंगांच्या ओला-उबर आल्या आहेत. पण तरीही बऱ्याच क्षेत्रांमध्ये आजही टॅक्सीचा रंग पिवळाच ठेवला आहे. मुंबई आणि बंगालमधल्या टॅक्सी सर्व्हिसेसचा यात समावेश आहे.

 

taxi im

 

सार्वजनिक वाहनांना दिलेले रंग हा आपल्यादृष्टीने अगदीच बिनमहत्त्वाचा मुद्दाही असेल. कुठलाही रंग दिला तरी काय फरक पडतो असं आपल्याला वाटू शकेल. पण अगदी सार्वजनिक वाहनांना दिले जाणारे रंग ठरवण्यामागेही सखोल विचार झालेला असतो हेच यातून आपल्या लक्षात येतं.

आता हे कारण कळल्यावर यापुढे जेव्हा आपण टॅक्सी पाहू तेव्हा ती काळ्या-पिवळ्या रंगाचीच का असते हे आपल्या पटकन लक्षात येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?