' पिवळी हळद गुणकारी आहेच, पण 'काळ्या हळदीचे' हे औषधी गुण कमी लोकांना माहितीयेत!

पिवळी हळद गुणकारी आहेच, पण ‘काळ्या हळदीचे’ हे औषधी गुण कमी लोकांना माहितीयेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हेडिंग वाचून आणि फोटो बघून चक्रावून जाण्यासारखं काहीच घडलेलं नाही. आपण जी पिवळी हळद वापरतो तिचीच एक बहीण म्हणजे काळी हळद.

आपल्या नेहमीच्या पिवळ्या हळदीमध्ये जसे औषधी गुण असतात, तसेच या काळ्या हळदीमध्येही अनेक औषधी गुण असतात. या काळ्या हळदीचा रंग नावाप्रमाणं काही काळाकुट्ट नसतो. तो फोटोत जसा दिसतोय तसाच काळसर निळा असा असतो.

 

black turmeric im

 

ही हळद मुख्यतः ईशान्येकडची काही राज्यं आणि शक्यतो मध्य प्रदेशात आढळते. या काळ्या हळदीचं शास्त्रीय नाव Curcuma caesia आहे पण तिला black zedoary असंही एक नाव आहे.

एका बारमाही औषधी वनस्पतीपासून आपल्याला काळी हळद मिळते. या वनस्पतीला लालसर किनार असलेली फिकट पिवळी फुलं असतात.

या काळ्या हळदीचा फोटो असलेलं एक ट्विट IFS अधिकारी श्वेता बोड्डू यांनी केलं आणि काही वेळातच ते प्रचंड व्हायरल झालं. ज्यांना ज्यांना या हळदीबद्दल माहिती होती, त्यांनी त्याखाली माहिती दिली, आपल्या काही टिपिकल भारतीयांनी ‘ज्ञान’ पाजळलं, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या नेहमीच्या पिवळ्या हळदीप्रमाणं या काळ्या हळदीची लागवड केली जाते आणि ही हळद ताजी आणि पावडर स्वरूपात मिळते.

मणिपूर आणि इतर काही राज्यातल्या आदिवासी लोकांमध्ये या काळ्या हळदीला फार महत्त्व आहे. तिथं साप किंवा विंचू चावल्यावर किंवा जखमेवर काळ्या हळदीची पेस्ट लावली जाते. याचे इतरही काही औषधी गुणधर्म आपण पाहूया.

काळी हळद किती औषधी?

काळी हळद ही पिवळ्या हळदीप्रमाणं एक औषधी वनस्पती आहे जिचा आयुर्वेदामध्येही उपयोग होतो.

अ‍ॅंटीफंगल, अ‍ॅंटीअस्थमा, अ‍ॅंटीऑक्सीडेंट, एनाल्जेसिक, लोकोमोटर, डिप्रेसेंट, अ‍ॅंटीकॉन्वेलसेंट, अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी अल्सर, मांसपेशींना आराम देणारा प्रभाव, चिंताजनक आणि सीएनएस डिप्रेशन दूर करणारे गुण यांसारख्या असंख्य औषधी गुणांचा अमावेश काळ्या हळदीमध्ये होतो.

 

black turmeric im1

 

१. मासिक पाळीमध्ये उपयोगी –

अनियमित मासिक पाळीचा त्रास अनेक महिलांना होतो. यावर उपाय म्हणून गरम दुधाबरोबर काळी हळद पावडर घेतल्यास फायदा होतो.

२. ऑस्टिओआर्थरायटिससाठी लाभदायी –

या आजारामध्ये सांधेदुखी होते, संधीवात होतो. मात्र काळ्या हळदीमध्ये असलेलं इबुप्रोफेन हे दुखणं रोखण्यात गुणकारी ठरतं.

३. यकृत आणि संबंधित रोगांवर गुणकारी –

यकृत आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. काळी हळद यकृताला डिटॉक्स करण्याचं काम करते. शिवाय काळ्या हळदीमुळं यकृतासंबंधित अनेक रोगांना आळा बसतो आणि अल्सरची कटकटदेखील दूर होते.

४. फुप्फुसाच्या आजारावरचा इलाज –

अँटी इंफ्लेमेट्री गुणांमुळं काळी हळद श्वसनासंबंधी आजारांमध्ये खूप गुणकारी ठरते.

५. मायग्रेनवर रामबाण –

मायग्रेनमध्ये मोठा आवाज आणि तीव्र प्रकाश सहन होत नाही. अशी तक्रार असलेल्यांनी जर काळ्या हळदीचा लेप करून कपाळावर लावला तर त्याचा फायदा होतो.

६. उत्तम पचन होण्यास मदत –

खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, बिघडलेलं रुटीन यामुळं अनेकांना ऍसिड रिफ्लक्स, गॅस, सूज, उचकी, अपचन, अल्सर आणि गॅस्ट्रिक इश्यू यासारखे रोग होतात. यावेळी पाण्यासोबत घेतलेल्या काळ्या हळदीमुळं फायदा होतो.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?