' पावसाळी चप्पल चावू नये यासाठी लगेचच हे उपाय करा – InMarathi

पावसाळी चप्पल चावू नये यासाठी लगेचच हे उपाय करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या कित्येक दिवसांपासून आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. आता अखेरीस पाऊस सुरु झाल्यामुळे वातावरणात नवा उत्साह आला आहे. उकाडा पूर्णपणे जाऊन हवेत थंडावा आला आहे.

पावसाळ्यात हमखास उद्भवणारी एक समस्या म्हणजे चप्पल चावणे. आपल्या नेहमीच्या वापरातले सँडल्स पावसाळ्यात उपयोगाचे नाहीत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे घरोघरी एव्हाना पावसाळी चपला बाहेर काढल्या गेल्या असतील किंवा नव्या विकत घेतल्या असतील.

काही दिवसांतच आपल्या याच नव्या-जुन्या पावसाळी चपलांचा आपल्याला त्रास जाणवायला लागेल. चप्पल चावल्यामुळे फोड येणे, त्यात पाणी भरून ते फोड ठुसठुसत राहणे हे सगळं सुरु होईल,  पण असं होण्यापूर्वीच यादृष्टीने आपल्याला काळजी घेणं शक्य आहे. पावसाळी चप्पल चावायला नको असेल तर हे उपाय कराच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. योग्य मापाच्या पावसाळी चपला/सँडल्स घ्या :

पावसाळी चप्पल/सॅन्डल चावणं टाळायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे योग्य मापाच्या पावसाळी चपला/सँडल्स खरेदी करा.

थोडे दिवसांनी चपला सैल होतील असा विचार करून आपण बऱ्याचदा थोड्याशा घट्ट होणाऱ्या चपला किंवा सँडल्स घेतो, पण तसं न करता योग्य मापाच्या चपला/सँडल्स घ्याव्यात.

२. पाय घासले जाणं टाळण्यासाठीचे उपाय :

पावसाळी चप्पल, सँडल्समुळे पाय घासले जाणं टाळायचं असेल तर तुम्ही पायांमध्ये सॉक्स घालून त्यावर चपला/सँडल्स घालू शकता. टो प्रोटेक्टर/ टो कॅप्स घालू शकता, शु पॅड्स किंवा इन्सोल्स घालू शकता.

३. फोडावर सर्जिकल टेप किंवा बँड एड्स लावा :

 

shoe bite im

 

चप्पल चावायला नको असेल तर आधीच किंवा त्यातूनही चप्पल चावलीच तर त्यावर सर्जिकल टेप किंवा बँड एड्स लावा.

४. नव्या चपला/सँडल्स सवयीचे होण्यापूर्वी घ्यायची काळजी :

बरेचदा पावसाळी चपला/सँडल्स नवे असतात म्हणूनही चावतात. त्यामुळे त्या वापरायला आपण कम्फर्टेबल होण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी आपल्याला घेता येईल. शु शेपर्स ऑनलाईन मिळतात.

लाकडाचा किंवा प्लास्टिकचा शु शेपर वापरून आदल्या रात्री तुम्ही तुमच्या चपला, सँडल्स थोड्या खेचू शकता.

चपलांच्या ज्या कडांमुळे पाय घासले जाऊन जखम होते त्या कडांमध्ये तेल लावलं तर थोड्याच दिवसांत तुमच्या चप्पल/सँडल्स मऊ पडतील आणि त्या घालायला तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल.

नव्या चपलांची सवय होण्यापूर्वी तुमच्या बोटांमध्ये आणि चपलेला टॅलकम किंवा बेबी पावडर लावा.

५. उब द्या :

तुमच्या चपला/सँडल्समध्ये जाड मोजे घाला आणि जिथे जिथे ते घट्ट असतील तिथे तिथे ३० सेकंद हेअर ड्रायर फिरवा. चप्पल/सँडल्सना उब असतानाच चाला. एकदा तुम्हाला चपला/सँडल्स ठीक वाटू लागल्या की मोजे काढून टाका आणि चपला/सँडल्स घाला.

 

shoe bite im1

 

६. चप्पल/सॅंडल पायात घालून पाण्यात पाय घाला :

तुमच्याकडे जर पट्ट्यापट्ट्यांच्या पावसाळी सँडल्स असतील तर त्या पायात घाला, एका बादलीत पाणी घ्या आणि त्यात तुमचे पाय बुडवा. नंतर त्यावर टॉवेल टाका, पण सँडल्स ओलसरच ठेवा आणि मग काही तास तशाच ओलसर सँडल्समध्ये चाला.

सँडल्स पाण्यात पूर्णपणे बुडवण्याआधी सॅन्डलचा थोडाच भाग पाण्यात बुडवून काय होतंय हे बघायचं असा प्रयोग तुम्ही करू शकता.

७. काही घरगुती उपाय :

चप्पल चावल्या असतील किंवा पायाला फोड आला असेल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. जखम झालेल्या भागावर तुम्ही हळुवारपणे मध लावू शकता. मधामध्ये अँटी वायरल आणि जळजळ कमी करणारे गुणधर्म असतात.

कोरफडीतदेखील जळजळ कमी करणारे आणि जखम बरी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही जखम झालेल्या/ फोड आलेल्या भागावर कोरफडही लावू शकता. याशिवाय, पेट्रोलियम जेलीमध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे जिथे चप्पल चावलीये त्या भागावर तुम्ही पेट्रोलियम जेलीही लावू शकता.

 

vaseline in marathi

 

हे काही मोजके उपाय केल्यास पायांना चप्पल/सँडल्स चावणं तुम्हाला टाळता येईल आणि चप्पल/सँडल्स चावल्या, फोड आले तरीही ते पटकन बरे होतील. पण एवढ्यावरच निभावलं नाही आणि जखम जास्त चिघळली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांकडे जा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?