' कोवळ्या वयात ब्रिटिशांच्या तावडीत सापडलेली, स्वातंत्र्यासाठी १४ वर्ष तुरुंगवास भोगणारी अज्ञात राणी

कोवळ्या वयात ब्रिटिशांच्या तावडीत सापडलेली, स्वातंत्र्यासाठी १४ वर्ष तुरुंगवास भोगणारी अज्ञात राणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आसाम राज्यातील एक लहानसं गाव, हरंगुम नावाचं. निसर्गसौंदर्याने नटलेलं, मात्र अत्यंत दुर्गम असं. हे गाव इतकं दुर्गम आहे, की त्याच्यापर्यंत पोहचणं सुद्धा फार कठीण मानलं जातं. मात्र भारताच्या सुवर्ण इतिहासात या गावाचा उल्लेख असलेला आढळतो.

१९३२ साली झालेल्या हंगरूम युद्धातून सहीसलामत वाचण्यासाठी क्रांतिकारी राणी गायदिन्ल्यु हिच्यामुळे हे नाव इतिहासात अजरामर झालं आहे.

या छोट्याशा गावातून बाहेर पडून सुखरूप मणिपूरला पोचणारी राणी नेमकी कोण होती? काय आहे या गावाचा इतिहास? चला आज जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हंगरूमचं युद्ध….

राणी या गांधीवादी विचारसरणीच्या होत्या. त्यांनी ब्रिटिश सरकराचा विरोच करण्यासाठी अंहिसेचा पुरस्कार केला. करभरणा न करता हा विरोध भक्कमपणे दाखवून द्यायला हवा असं त्यांचं मत होतं.

सरकार नियुक्त पोलिसांची दमदाटी, त्यांच्याद्वारे दिली जाणारी अयोग्य वागणूक, अनेक जाचक आणि अयोग्य नियम, आणि त्याद्वारे आकारण्यात येणारा दंड अशा गोष्टींचा विरोध राणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यांच्या या आंदोलनाला पूर्वोत्तरमधील असहकार आंदोलन म्हटलं जातं.

वयाच्या १७ व्या वर्षीच त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. १८ मार्च १९३२ रोजी हंगरूम गावातील ५०-६० तरुणांनी पोलीस ठाण्याच्या वरच्या परिसरात असणाऱ्या टेकडीवर पोचून पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्याचा परिपाक म्हणून पोलिसांनी या तरुणांवर गोळीबार सुरु केला.

धनुष्यबाण आणि भाल्यांसारखी शस्त्र घेऊन येणाऱ्या तरुणांना पोलिसांचा प्रतिकार करणं शक्य झालं नाही. या हल्ल्यानंतर राणी यांनी मणिपूर गाठलं आणि त्या भूमिगत झाल्या असा उल्लेख इतिहासात दिसतो.

१९३२ च्या ऑक्टोबर महिन्यात मात्र राणी यांना अटक झाली. कॅप्टन मॅक्डोनाल्ड यांनी गावावर अचानक धाड टाकून ही कारवाई केली होती. तिथून त्यांना थेट इंफाळला नेण्यात आलं आणि त्यांच्यावर खटला दाखल केला गेला.

हायतेचा आरोप ठेवण्यात आलेल्या या खटल्यानंतर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

कोण होती राणी गायदिन्ल्यु?

 

freedom fighter im

 

२६ जानेवारी १९१५ रोजी मनुपिरमधील नूंगकाओ या गावात राणीचा जन्म झाला. त्यांचं अधिकृत शालेय शिक्षण झालेलं नव्हतं. मात्र भारतीय आणि स्वदेशी पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं होतं.

राणी गायदिन्ल्यु ही नागा जमातीची होती. या समुदायासाठी क्रांतिकार्य करण्यात तिचा मोठा वाटा होता.

आजही आसाम, नागालँड, मणिपूर परिसरात राहणाऱ्या नागा लोकांची संस्कृती जपणं हे तिचं प्रथम लक्ष्य होतं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आपला चुलत भाऊ हायपो जादोनंग याचं नेतृत्व पाहून त्या प्रेरित झाल्या.

संस्कृतीच्या विरोधात जाऊन धर्म परिवर्तन करू इच्छिणाऱ्या चुलत भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन तिनं सुद्धा या कार्यात उडी घेतली. या दोघांना समाजात मोठा मान होता. मोठ्या आशेनं त्यांच्याकडे पाहिलं जाई.

तिला देवीचा अवतार मानलं जात असे. वयाच्या तेराव्या वर्षीच सामाजिक आणि धार्मिक लढाईचं नेतृत्व स्वीकारणारी राणी युवा समाजासाठी किती महत्त्वाची होती हे यातून अगदी सहजपणे दिसणं येतं.

१९२७ साली जादोनंग याने सुरु केलेलं हेरेका आंदोलन हे तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं पाऊल ठरलं. पुढे चार वर्षांनी म्हणजेच १९३१ साली जादोनंग याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.

मणिपूरी व्यापाऱ्यांच्या हत्येत सहभागी असण्याचा आऱोप सुद्धा त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आंदोलनाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी राणी गायदिन्ल्यु हिच्यावर येऊन पडली.

 

…आणि अशाप्रकारे ती राणी झाली.

१९३७ साली जवाहरलाल नेहरू यांनी मणिपूर मधील तुरुंगात तिची भेट घेतली. एवढंच नाही तर तिला तिथून सोडवण्याचं वचनही दिलं. त्याचवेळी नेहरू यांनी तिला राणी ही उपाधी दिली. पुढे नेहरूंनी तिच्या सुटकेसाठी बरेच प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं.

संसद सदस्य लेडी एस्टर हिच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतरही राणीची सुटका झाली नाही. ब्रिटिश सरकारचं असं स्पष्ट मत होतं, की तिची सुटका झाल्यास, ती पुन्हा एकदा सरकार विरोधात उभी राहील.

सुटकेनंतर…. 

चौदा वर्षांचा तुरुंगवास भोगून झाला आणि १९४७ साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी राणीची तुरुंगातून सुटका झाली. त्यांनतर त्यांनी आपलं समाजकार्य पुन्हा सुरु केलं.

त्यांनी नागा समाजातील लोकांसाठी वेगळ्या प्रदेशाची मागणी सुद्धा केली, मात्र याच समाजातील काही बड्या नेत्यांमुळे त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. एवढंच नाही, तर १९६० साली पुन्हा एकदा भूमिगत होण्याची नामुष्की तिच्यावर उद्भवली.

नागालँड, आसाम आणि मणिपूर या तीन राज्यांना स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात यावा यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व तिने केलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी यासंदर्भात तिने अनेकदा चर्चा केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

स्वातंत्र्यलढ्यातील तिच्या योगदानाला सलाम म्हणून, १९७२ साली ताम्रपत्र, १९८२ साली पद्म भूषण, १९८३ साली विवेकानंद सेवा पुरस्कार आणि मरणोत्तर बिरसा मुंडा हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

१९९६ साली पोस्टाचं तिकीट आणि २०१५ मध्ये स्मरण म्हणून नाणं अशा गोष्टींनी सुद्धा तिला सन्मानित करण्यात आलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?