' पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या या गावातील प्रत्येक घरातली एक व्यक्ती देशासाठी लढत आहे

पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या या गावातील प्रत्येक घरातली एक व्यक्ती देशासाठी लढत आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सैनिक हो तुमच्यासाठी, कर चले हम फिदा जानो तन साथियो अशी सैनिकांसाठी लिहिलेली गाणी ऐकताना उर अभिमानाने भरून येतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला दिल्लीमधील सैनिकांची परेड बघताना, राष्ट्रगीत ऐकताना अंगावर शहारा येतो.

सैनिकांचे कठोर प्रशिक्षण, उणे तापमानात देशाच्या रक्षणासाठी घरदार सोडून सीमेवर पहारा देत राहणे, जीव तळहातावर ठेवून सैनिक जगतो, हे सारे काही सैनिकांचा अभिमान वाटायला लावते.

तरुणांमध्ये सैन्यात भरती होण्याची महत्वाकांक्षा, धडपड, जिद्द आजही तशीच आहे. देशाच्या कामी येणारे २०-२५ वर्षाचे तरुण बघताना त्यांच्याबद्दल आदर , अभिमान वाढतो. आजही अशी काही गावे आहेत, जिथे सैनिक असण्याची परंपरा आहे. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे हे गाव असेच जवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. याचे नावच मिलिटरी अपशिंगे. कशी मिळाली या गावाला ही पदवी?

 

hrithik featured IM

 

माणूस आणि युद्ध यांचे नाते पूर्वापार आहे. सत्ता संपत्ती याच्या पायात जगात कित्येको युद्धे लढली गेली. काही वेळा सक्तीने सैन्यात भरती करून लोकांना युद्धात सहभागी व्हायला लावले होते. जगभरात या गोष्टींचे दाखले दिले जातात.

भारतावर देखील इंग्रजांचे राज्य होते तेव्हा अशी सैन्य भरती झाली होती. अशाच भरतीत जोशाने सहभागी झालेले लोक पण होते. अशा जोशिल्या लोकांचे गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे. अवघे साडेतीनशे उंबऱ्यांचे गाव. लोकवस्ती केवळ ३ हजार पण तरीही मिलिटरीमध्ये भरती होण्याचा जोश आजही या गावात आहे.

या गावाला सैन्य भरतीचा इतिहास आहे. फार पूर्वीपासून या गावातील लोक सैन्यात भरती होतात. अगदी पहिल्या दुसऱ्या महायुद्धात पण इथून सैनिक म्हणून लोक गेले होते . पहिल्या महायुद्धात ४६ सैनिक धारातीर्थी पडले. ब्रिटीशांनी याच कारणाने या गावाचे नांव मिलिटरी अपशिंगे असं ठेवलं होतं. या गावात ब्रिटीशांनी त्यांच्या पराक्रमाची खूण म्हणून या गावात विजयस्तंभ बांधला आहे.

दुसऱ्या महायुद्धात पण या गावातील चार सैनिक कामी आले. आजदेखील ही परंपरा कायम आहे. १९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात आणि १९६५, व १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात येथील जवान शहीद झाले आहेत. आणि तरीही येथील तरूण सैन्यात भरती व्हायला कचरत नाहीत. त्याच जोशाने भारतमातेची सेवा करायला सीमेवर जातात. सातारा जिल्ह्यातून कित्येक तरुण सेना आणि सुरक्षा दलात भरती होतात.

 

world war 2 IM

 

मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, इंजिनिअर रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट या रेजिमेंटमध्ये हे जवान मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. केवळ यातच नव्हे तर नौसेना, वायुसेना, बीएसएफ, सीआरपीएफ, आणि इतर सैन्य दलात हे जवान म्हणून दाखल होतात.

अग्नीवीर या योजनेला इतक्या प्रचंड प्रमाणात लोक विरोध करत आहेत. जाळपोळ दगडफेक असे हिंसक मार्ग चोखाळणारा समाज पाहून या गावाचे वेगळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. या गावातील घरटी एक तरूण स्वेच्छेने अंत:प्रेरणेने सैन्यात जातोच.

साधारणपणे आपल्याकडे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनीअरचा मुलगा इंजिनीअर होतो त्याचप्रमाणे अपशिंगे मध्ये सैनिकाचा मुलगा सैनिकच होतो. काही घरातील सहा-सहा जण सैन्य दलात भरती झालेले आहेत. या गावाचे ब्रीदवाक्य आहे येथे घडती वीर जवान. या ब्रीदाला जागून सैन्यात भरती होण्याची उज्वल परंपरा आजही जपली जाते.

याची सुरुवात या गावात शालेय जीवनापासूनच केली जाते. अपशिंगे गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात मुलांना परेड, ड्रिल यांचा सराव दिला जातो. शाळेपासूनच त्यांची सैन्यभरतीची शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेतली जाते. देशासाठी वीरमरण पत्करण्याची परंपराही इथे कायम आहे.

 

upshinge im

 

या गावचे सरपंच सरकारच्या अग्निपथ योजनेला जाहीर पाठींबा देतात. केवळ तेच नव्हे तर गावातील अनेक माजी सैनिकांनी या योजनेला पाठींबा दर्शवला आहे. त्यांच्या मते कोविडमुळे या दोन वर्षात कितीतरी तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

या योजनेमुळे बेकार हातांना काम तर मिळेलच पण त्या कामाला एक सन्मान असेल, प्रतिष्ठा असेल, अभिमान असेल. ग्रामीण भागातील तरुणांना तर ही योजना वरदानच आहे.

अग्निपथ योजनेतून निवृत्त झाल्यानंतर इतर सरकारी कामात देखील या तरुणांना नोकरी मिळू शकेल. त्यामुळे चार वर्षानंतर काय? हा प्रश्न गौण आहे. ते तरुणांना या योजनेचे फायदे सांगत आहेत. त्यासाठी मार्गदर्शन पण करायची त्यांची तयारी आहे. सैन्यातील शिस्त या तरुणांना योग्य वळण लागेल.

निवृत्तीनंतर सुभेदार संदीप निकम हे उत्तम शेती तर करतातच, शिवाय सैन्य भरती प्रशिक्षण देणारी संस्था चालवतात. त्याचप्रमाणे अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेले सैनिक चार वर्षानंतर पोलिस दलात काम करू शकतील.

ज्यांच्यामध्ये उत्तम नेतृत्व क्षमता आहे ते विविध आपत्तीमध्ये उत्तम रीतीने काम करू शकतील. सैन्यात मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पण होईल.

 

upshinge im 1

शाळेतून झाला बेदखल पण ७००० रु लिटरने गाढविणीचं दूध विकून बाबू झालाय श्रीमंत!

काहीतरी ‘हटके’ करियर करायचंय, पण कळत नाहीये? हे १० बेस्ट करियर ऑप्शन्स बघाच

आता थोडं त्रयस्थपणे पाहूया, सरकारने ही योजना अकस्मात जाहीर केल्यामुळे लोकांनी खूप तीव्र प्रतिक्रिया द्यायला सुरु केल्या आहेत. लोकांना विश्वासात घेऊन ही योजना जाहीर करायला हवी होती. त्याने असं काय फरक पडणार होता?  त्यावरून इतका हिंसाचार, जाळपोळ करून सरकारची संपत्ती खराब केल्याने काय होणार आहे? याच गोष्टी सामोपचाराने, अहिंसेच्या मार्गाने पण विचारता आल्या असत्या.

बसेस जाळल्या दगडफेक करून फोडल्या याने सरकारचे नुकसान केले असे या लोकांना वाटत असेल पण एक सांगा, या संपत्तीसाठी सेवांसाठी कर सरकार देते की सामान्य जनता? मग नुकसान सरकारचे? की जनतेचे?

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कोणताही प्रश्न एकाच बाजूचा विचार करून सुटत नाही. एकांगी भूमिका घेऊन कधीच योग्य निर्णय घेता येत नाही. त्यामुळे अपशिंगे गावचे माजी सैनिक असलेले लोक अग्निपथ या योजनेचा पुरस्कार करताना दिसतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?