' कपडे घालण्याचा कंटाळा म्हणून अंगभर टॅटू! विकृती की विचित्रपणा...?

कपडे घालण्याचा कंटाळा म्हणून अंगभर टॅटू! विकृती की विचित्रपणा…?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अभिनेत्री-मॉडेल्सनी तोकडे कपडे घालणं ही गोष्ट काही नवी नाही.

 

urfi im

 

मॉडेलिंगचं क्षेत्रं म्हटलं की आकर्षक दिसण्यासाठी मॉडेल्सना ठराविक प्रकारे स्वतःला कॅरी करावं लागतं. आपल्या इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्त्व करावं लागतं. त्यामुळे बांधेसूद असणं, त्वचेची, केसांची काळजी घेणं या गोष्टी त्यांच्यासाठी केवळ स्वतःपुरत्याच मर्यादित नसून त्या त्यांच्या व्यवसायाचाच भाग असतात. पण याच मॉडेल-अभिनेत्रींच्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्याइतकीच आणखी एक गोष्ट नेहमीच आपलं लक्ष वेधून घेते आणि ती म्हणजे त्यांनी गोंदवून घेतलेले टॅटूज.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नुसतीच आवड ते अगदी आधीच्या प्रियकराची आठवण अशा विविध कारणांसाठी सेलिब्रिटीज टॅटूज गोंदवून घेतात. तो नुसताच एक टॅटू न राहता त्यांच्याच ओळखीचा भाग झालेला असतो. एखाद् दुसरा टॅटू गोंदवून घेणं ही गोष्ट नॉर्मल आहे. पण एखाद्या मॉडेलने आवड म्हणून चक्क अंगभर टॅटूज गोंदवून घेतल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? हेही कमीच की काय म्हणून एखाद्या व्यक्तीला, त्यातही एखाद्या मॉडेलला चक्क कपडेच घालायचा कंटाळा येतो असं?

या दोन्ही गोष्टी ऐकायला आणि वाचायला कितीही विचित्र वाटल्या तरी केर्स्टिन ट्रिस्टन या प्रसिद्ध जर्मन मॉडेल बाबतीत त्या खऱ्या आहेत. मॉडेल म्हटल्यावर ती तरुण असेल असं आपल्याला वाटेल. पण ही मॉडेल चक्क एकी ५० वर्षांची आजी आहे आणि याही वयात तिच्या शरीरावर अंगभर टॅटूज आहेत.

 

tatoo im

 

टॅटूंनीच अंग झाकलंय तर कपडे कशाला घालायचे असा भलता विचार ती करते. काय आहे हा सगळा प्रकार? जाणून घेऊ.

५० वर्षांची असून याही वयात फिट असलेल्या केर्स्टिन ट्रिस्टनने तरुणींनाही लाजवेल अशा आपल्या सौंदर्याने अनेक तरुणांना भुरळ घातली आहे.

अगदी पूर्वीपासून तिला स्वतःच्या शरीरावर टॅटूज गोंदवून घ्यायची आवड होती. पण ही नुसतीच आवड न राहता ही मॉडेल टॅटूजच्या इतकी आहारी गेली आहे की गेल्या ५ वर्षांमध्ये तिने संपूर्ण शरीरभर टॅटू गोंदवून घेतले आहेत आणि अजूनही आपल्या शरीरावर कुठे टॅटू गोंदवायला जागा आहे का हे ती शोधत आहे.

सहा वर्षांपूर्वी तिने @tattoo_butterfly_flower या नावाने इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट उघडलं होतं. तिने आपला ३० वर्षांपूर्वीचा, ८ वर्षांपूर्वीचा आणि आणि आताच फोटो या अकाउंटवर शेअर केला आहे. तिच्यात होत गेलेले बदल या फोटोंतून आपल्याला दिसतात.

 

tatoo 2 im

 

सोशल मीडियावर या मॉडेलची चांगलीच हवा आहे. तिने पानांचे, फुलांचे, पक्षांचे, फुलपाखरांचे आणि आणखी वेगवेगळ्या डिझाइन्सचे टॅटूज आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत. पण हे टॅटूज गोंदवून घेण्यामागचं कारण आपल्याला कळतं तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेनासं होतं.

तिला अगदी पहिल्यापासून अंगभर कपडे घालायचाच कंटाळा यायचा. तिला कपडे घालणं कटकटीचं वाटायचं आणि यावरचा तोडगा म्हणूनच तिने अंगभर टॅटूज गोंदवून घेतले, जेणेकरून टॅटूंनी शरीर झाकलं गेल्यामुळे तिने अगदी थोडे कपडे घातले तरी काही प्रॉब्लेम नसेल.

आश्चर्य म्हणजे, केर्स्टिनने आजवर केवळ आपल्या टॅटूजवरच तब्बल २५ हजार पाउंड्स म्हणजेच जवळपास २४ लाख रुपये खर्च केले आहेत. ती नेहमीच आपल्या टॅटूजचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. केवळ या फोटोजद्वारे ती लाखो रुपयांची कमाईही करते. सध्या तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला २ लाख लोक फॉलो करतात. तिचे नवे फोटोज बघायला तिने चाहते वेडे असतात.

इतकं वय झालेलं असतानाही केर्स्टिन अजूनही तरुण कशी दिसते असा प्रश्न तिला विचारला गेल्यावर तिने टॅटूंमुळेच आपण इतके सुंदर दिसत असल्याचं म्हटलं.

ती म्हणते, “माझ्या अंगावरील टॅटूंनी माझ्या सौंदर्याला चार चांद लावले आहेत. आजही माझ्या मागे तरुण पोरांची रांग असते. याचं कारण माझ्या अंगावरचे टॅटू. हे टॅटू माझ्यावरची नजर ढळू देत नाहीत. मला याचा अभिमान आहे!” आपल्याला या टॅटूजमुळे ऊर्जा मिळते असंही ती म्हणते.

शरीरावर जिथे जिथे जागा आहे तिथे तिला अजूनही टॅटू गोंदवायचे आहेत. पण आता तिच्या शरीरावर कुठेही टॅटू गोंदवायला जागा राहिलेली नाही.

 

tatoo 1 im

 

एखाद्या तरुण मॉडेलने जरी हे केलं असतं तरीही तितकंच अजब वाटलं असतं. पण तरी तरुण असण्याच्या जोशात तिने अविचाराने ही कृती केलीये असं एकवेळ म्हणता आलं असतं. पण एका ५० वर्षांच्या मॉडेलने अशी कृती आणि विचार करणं म्हणजे अक्षरश: कहर आहे.

आपल्याला व्यक्तीस्वातंत्र्य आहे म्हणून काहीही केलेलं चालेल का याचं भान काही जणांना नसतं हेच खरं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?