' ब्रह्मास्त्र सिनेमाचं VFX बघून थक्क झालात? याच क्षेत्रातील करियरच्या संधी जाणून घ्या

ब्रह्मास्त्र सिनेमाचं VFX बघून थक्क झालात? याच क्षेत्रातील करियरच्या संधी जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अलिकडेच ब्रह्मास्त्र या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि याबाबत नेटकर्‍यांच्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया आल्या. काहीजणांना भारतीय पौराणिक कथेला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत सुपर हिरोपट बनविणं प्रचंड आवडलं आहे तर काहीजणांना हॉलिवुडच्या मार्व्हलपटांची ही कॉपी वाटत आहे.

एका गोष्टीवर  मात्र एकमत आहे, ती म्हणजे, कथेपेक्षाही बुलंद आणि नजरेत भरणारं VFX. अलिकडल दशकात हा शब्द सातत्यानं कानावर येत असून नव्या पिढीसाठी हे क्षेत्र करियरचा उत्तम पर्याय बनू शकेल.

ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलिज झाला आणि हा एक दुय्यम कथा असणारा VFX पट असल्याचं बहुतेकांचं मत आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेंव्हा अर्थातच अभिनय आणि कथेपेक्षाही यातल्या स्पेशल इफ़ेक्टसचं मूल्यमापन जास्त होईल. त्याचीच चर्चा जास्त होईल.

 

brahmastra IM

 

याशिवाय ही त्रिचित्रमालिका असणार असल्यानं केवळ हाच नाही तर पुढचे दोन चित्रपटही या तंत्रज्ञानाचा अविष्कार असणार आहेत. अयान मुखर्जीनं या त्रिचित्रमालिकेच्या निमित्तानं Astraverse ची निर्मिती केलेली आहे. जर का या त्रिचित्रमालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं तर हॉलिवुडमधील मार्वल आणि डिसी पटांप्रमाणे या मालिकेचेही वर्षानुवर्षं सिझन बनत रहातील.

यापूर्वीही बॉलिवुडमधे हे तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहेत. शिवाय, बाहुबली अशा चित्रपटातले VFX विशेष चर्चिले गेले. बाहुबली हा त्याच्या भव्यतेसाठी तर शिवाय या चित्रपटाच्या निमित्तानं निर्माता, अभिनेता अजय देवगण यानं भारताच अशा प्रकारचा स्टुडिओ निर्माण करुन त्याद्वारे स्वनिर्मिती असणार्‍या शिवायचे VFX केले. दशकभरापूर्वी अशा प्रकारचे स्पेशल इफ़ेक्ट हवे असत तर परदेशी तंत्रज्ञ आणि लॅब यांच्यावर भिस्त ठेवावी लागत असे.

यामुळे अर्थातच चित्रपटाचं बजेटही प्रचंड वाढत असे. आता मात्रा भारतातच अशा प्रकारच्या लॅब असल्यानं किमान हा खर्च आटोक्यात आला आहे. दुसर्‍या बाजूला या क्षेत्रात भारतीय युवकांना करियरच्या संधीही निर्माण झालेल्या आहेत.

VFX vs ॲनिमेशन :

काहीजणांना VFX म्हणजेच ॲनिमेशन वाटतं. मात्र प्रत्यक्षात दोन्हीमधे खूप फ़रक आहे. ॲनिमेशन ही एक चित्रण प्रक्रिया आहे. यामधे डिझाईन केलेल्या आकृत्या एका विशिष्ट गतीत एकत्र केल्या जातात.

हे काम साधारणपणे 2D मधे होतं. यासाठी पेंटिंग्ज आणि स्केचेस यांचा वापर केला जातो आणि ओव्हरलॅपिंग पध्दतीनं त्या सादर होतात. मात्र VFX ही प्रक्रिया सामान्य जीवनातील घटना अधिक परिणामकारक पध्दतीनं दाखवते.

अगदी एखादा वय झालेल्या अभिनेत्याला पडद्यावर तरूण, दमदार दाखविण्याचं कामही VFX च्या मदतीनं लिलया करता येतं. पडद्यावर अस्सल वाटणार्‍या खोट्या प्रतिमा आणि दृश्यांच्या निर्मितीसाठी या तंत्राचा वापर केला जातो. यासाठी ॲनिमेशनप्रमाणे 2D , 3D शिकण्याची गरज नसते.

 

vfx im

 

हे दोन्ही अभ्यासक्रम स्वतंत्र आहेत. ढोबळपणे सांगायचं तर ॲनिमेशन हा VFX मधील फ़क्त एक भाग आहे. ॲनिमेटर्सना त्यांच्या कामासाठी संगणक आणि इतर उपकरणांची गरज लागते मात्र VFX मधे क्रोमा कीईंग सॉफ़्टवेअर तंत्र वापरण्याची शिफ़ारस केली जाते. क्रोमा कीईंग हा यातला महत्वाचा भाग आहे.

ॲनिमेटर्स आणि VFX तंत्रज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक चित्रपटांची आणि त्यातील विस्मयकारक प्रतिमांची निर्मिती होते. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा चित्रपटाची किंवा एखाद्या टीव्ही शो ची प्लॉटलाईन वास्तविक जीवनात अनुकरणीय नसते किंवा लिहिलेला प्रसंग चित्रीत करणं धोकादायक असणार असतं तेव्हा या दोन क्षेत्रातल्या तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागते.

या क्षेत्रातील जाणकारांच्या मते २०१५ पर्यंत जागतिक VFX मार्केट ट्रेंड २३, ८५४ दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच भविष्यातला खात्रीनं हा एक उत्तम करियर पर्याय असणार आहे. VFX ॲनिमेटर म्हणून तुम्हाला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात-

बजेट-

जेव्हा client आपलं काम घेऊन म्हणजेच खरंतर कल्पना घेऊन समोर येतो तेंव्हा त्याला अपेक्षित परिणाम साधण्यासाठी काय खर्च येऊ शकतो याचा अंदाज देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला ते काम कितपत क्लिष्ट आहे याची कल्पना असणं गरजेचं आहे.

नियोजन – बजेट आणि क्लायंटच्या गरजेनुसार उत्तम दर्जाचे व्हिज्युअल तयार करणे. हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे.

संकल्पना – आवश्यक त्या स्पेशल इफ़ेक्टसची योजना करुन त्यानुसार डिझाईन बनविणे.

 

budget im 1

 

समन्वय – हे एक टीमवर्क असल्यानं अनेकजणांसोबत काम करावे लागते. हे एक क्रिएटिव्ह आणि त्याचबरोबर तांत्रिक क्षेत्र असल्यानं या दोहोंचा मेळ घालत निर्मिती करण्याची गरज असते.

संपादन – नुसतीच निर्मिती करून भागत नाही तर त्याचं योग्य ते (कथा आणि वेळ यांचा मेळ घालणारं) संपादनही करावं लागतं.

सर्जनशिलता – मोठा अथवा लहान स्क्रिनवर परिणामकारण पध्दतीनं प्रसंग कसा दिसेल याची कल्पना करता येण्यासाठी सक्षम असणं हा सर्वात महत्वाचा गुण आहे.

तपशिल बारकाईनं टिपणं-

एखादं पात्र, प्रसंग काल्पनिक अवकाशात जिवंतपणे उभा करायचा तर त्यासाठी तपशिलात विचार करण्याची सवय असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर तुमच्या पात्रानं केसांचा पोनीटेल बांधला असेल आणि तो प्रचंड उंचीवरून जमिनीकडे झेपावत असेल तर त्याच्या पोनीटेलमधून केस बाहेर अस्ताव्यस्तपणे येणं अपेक्षित आहे. इतक्या सूक्ष्म पातळीवर तपशिल टिपण्याची क्षमता असण्याची गरज असते. आवड-तुम्हाला चित्रपट, व्यंगचित्रं, रेखाचित्रं आणि स्टोरीटेलिंग यात रुची असलीच पाहिजे.

 

deadpool-3-vfx-inmarathi02
foxmovies.com

 

हे वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की VFX ॲनिमेटरची भूमिका सर्जनशिल आणि व्यवस्थापकीय दोन्ही आहे. असंख्य विभागात VFX चं काम चालतं. कला विभाग, प्री व्हिज्युअलायझेशन विभाग, मालमत्ता विभाग, संशोधन आणि विकास, मॅच मुव्ह, व्हिएफ़एक्स सिम्युलेशन, प्रकाशयोजना आणि उत्पादन यांचा यात समावेश होतो.

आता महत्वाचा मुद्दा हा की कोणती पदवी घेतली असता या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता योतो?

तर याचं उत्तर आहे, VFX साठी अजूनतरी ठराविक अशी पदवी नाही. जर तुम्ही मास मिडिया, मिडिया टेक्नॉलॉजी, ग्राफ़ीक डिझाईन किंवा फ़ोटोग्राफ़ीचा अभ्यास केला असेल तर तुम्ही सहजपणे व्हिएफ़एक्स शिकू शकता.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही विषयात विशेष पदवी असण्याची गरज सध्यातरी नाही. कला (ॲनिमेशन, डिझाईन, चित्रकला, छायाचित्रण), भौतिकशास्त्र, गणित आणि संगणशास्त्राचे शालेय स्तरावरील ज्ञान देखिल यासाठी उपयुक्त ठरू शकते.

 

computer games inmarathi

व्हिएफ़एक्स ॲनिमेटरसाठी लागणारी तांत्रिक कौशल्य तुम्ही शिकू शकता मात्र या क्षेत्रात उत्तम करियर घडवायचं असेल तर काही विशिष्ट व्यक्तिमत्व गुण आत्मसात करण्याची गरज आहे. जगभरात कामाच्या संधी असल्यातरिही प्रामुख्याने, टोकियो, माद्रिद, पॅरिस, सोल, शांघाय, हॅम्बर्ग, बेंगलोर आणि मुंबई या शहरांचा यात मोठा वाटा आहे.

ही पदवी घेतल्यानंतर या क्षेत्राशी थेट संबंधीत काही नोकर्‍यांचाही तुम्ही विचार करु शकता. जसे की, मल्टिमिडिया तज्ज्ञ, जाहिरात कला दिग्दर्शक, संगीत निर्माता, प्रॉडक्शन डिझायनर, चित्रपट दिग्दर्शन, चित्रपट/व्हिडिओ संपादक, टिव्ही उत्पादन समन्वयक/ निर्माता.

पगारपाणी :

भारतातील vfx artist ना २ लाख ते ७ लाख पर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळतं. बाहेरच्या देशांमध्ये या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने साहजिकच तिकडे पगार देखील जास्त मिळणार.

 

salary inmarathi
the financial express

 

भारतात कायमच व्हाईट कॉलर नोकरी म्हणून आयटी क्षेत्राकडे बघितलं जातं. आयटी क्षेत्रात कायमच नोकर भरती चालू असते. नोटबंदी, कोरोनाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. सध्या vfx क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर देशात परदेशात मागणी आहे त्यामुळे  ज्यांना यात करियर करायचे असल्यास त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?